*२९ मार्च १९७४*
*मरिनर १० हे यान बुध ग्रहाच्या सर्वात जवळ पोहोचले*
२९ मार्च १९७४ व २१ सप्टेंबर १९७४ रोजी मरिनर-१० यानाने बुधाच्या जवळजवळ निम्म्या भागाची छायाचित्रे घेतली;तसेच वेधही घेतले. त्यांवरून बुधाच्या पृष्ठभागाची तपशीलवार माहिती आता उपलब्ध झाली आहे.
बुध चंद्रापेक्षा थोडा मोठा असून उभयतांच्या पृष्ठांवरील स्वरूपांमध्ये खूपच साम्य असल्याचे आढळले आहे; तसेच बुधाचे कवच वरवर पाहता पृथ्वी, मंगळ आणि चंद्र यांच्या कवचाप्रमाणे आहे. मरिनर-१० यानाने अवरक्त (दृश्य वर्णपटातील तांबड्या रंगाच्या अलीकडील अदृश्य) प्रारणाच्या साहाय्याने केलेल्या तापमापनाद्वारे कवच हे चांगले उष्णतानिरोधक असल्याचे आढळले. यावरून ते सच्छिद्र मृदेचे अथवा चंद्रावरील आवरणशिलेसारख्या (आधारशैलांना झाकणाऱ्या पदार्थांच्या राशीसारख्या) खडकांच्या चुऱ्याचे (केवळ खडकाचे नव्हे) बनवलेले असावे. बुधाचा ⇨ प्रतिक्षेप ०.०६ आहे म्हणजे त्याच्या पृष्ठावर पडलेल्या सूर्यप्रकाशापैकी ६ टक्के प्रकाशाचे परावर्तन होते, तर चंद्राचा प्रतिक्षेप ७ आहे. यावरून बुधाचा पृष्ठभाग चंद्राप्रमाणे खडबडीत व गडद रंगाच्या खडकांचा बनला असावा, असा अंदाज होता. मरिनर-१० ने केलेल्या निरीक्षणांनी हा अंदाज खरा ठरला असून बुधाचे पृष्ठ सिलिकेटी खडकांचे बनले आहे व त्यावर सिलिकेटी खनिजांची धूळ पसरलेली आहे. बुधाच्या पृष्ठावर ४ अब्ज वर्षांहून जास्त काळ अशनींचे (बाहेरून येऊन पडणाऱ्या खडकांचे) आघात होऊन खाचखळगे निर्माण झाले आहेत. तेथे वातावरण जवळजवळ नसल्याने ही भूवैज्ञानिक वैशिष्ट्ये बहुतांशी जशीच्या तशी टिकून राहिली आहेत. लहानमोठी विवरे, मैदाने, उंचवटे, कडे, द्रोण्या इ. येथील प्रमुख पृष्ठीय स्वरूपे आहेत.
*रडारने घेतलेले वेध आणि मरिनर-१० या अवकाशयानाने घेतलेली छायाचित्रे यांच्यावरून बुधाचा अक्षीय भ्रमणकाळ ५८.६५६ दिवस असल्याचे सिद्ध झाले म्हणजे बुधाच्या सूर्याभोवती दोन प्रदक्षिणा होतात तेव्हा स्वतःभोवती तीन फेऱ्या पूर्ण होतात.*
https://www.facebook.com/दिनविशेष-आणि-विज्ञान

No comments:
Post a Comment