*डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांचे शिक्षण विषयक विचार*
*1 ) प्राथमिक शिक्षण हा राष्ट्रीय प्रगतीचा पाया आहे :-*
6 मे 1929 रोजी आयोजीत शिक्षण परिषदेत अभ्यास पुर्ण भाषण दिले. बाबासाहेब म्हणतात " प्राथमिक शिक्षणाचा प्रसार हा राष्ट्रीयदृष्ट्या अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे. प्राथमिक शिक्षणाचा प्रसार हा सर्वांगीण राष्ट्रीय प्रगतीच्या इमारतीचा पाया आहे. केवळ लोकांच्या खुशीवर हा प्रश्न सोपविलयास प्राथमिक शिक्षणाचा सार्वत्रिक प्रसार होण्यास कैक वर्ष लागतील. म्हनून प्राथमिक शिक्षणाचा सक्तीचा कायदा करावा लागतो. ज्यांना शिक्षणाचे महत्व कळत नाही व जे तया बाबतीत उदासीन असतात त्यांच्याकरिताच सक्तीच्या कायद्याची आवश्यकता असते. म्हणून या देशात शिक्षणामध्ये मागासलेले जे वर्ग आहेत त्यांच्यासाठी शिक्षण हा जिव्हाळ्याचा प्रश्न आहे. "
*2 ) जनतेला शिक्षण देणे हे सरकारचे आद्य कर्तव्य व जबाबदारी आहे :-* बाबासाहेब सरकारला बजावतात "लोकांना साक्षर करणे , निरक्षरतेला हद्दपार करणे ही प्रांतिक सरकारची जबाबदारी आहे . ती त्यांना केंव्हाही टाळता येणार नाही. ज्या सरकारला आपल्यावरील या जबाबदारीची , आपल्या हया पवित्र कर्तव्याची जाणीव आहे ते सरकार अशी टाळाटाळ केंव्हाही करणार नाही. सार्वत्रिक शिक्षणाचा प्रश्न हा तुटक-तुटक रीतीने सोडविण्याचा प्रश्न नव्हे. तो एकसूत्री धोरणानेच सोडविण्यात आला पाहिजे. सर्व प्रांताची समप्रमाणात शिक्षण प्रगती झाली पाहिजे. त्यामुळे प्रांतीक सरकारने सर्व जबाबदारी आपल्या अंगावर घेण आवश्यक आहे."
*3 ) शिक्षणाच्या अंमलबजावणीत सरकारची भूमिका महत्वाची :-* बाबासाहेब आंबेडकरांनी खालील अपेक्षा व्यक्त केल्या आहेत.
अ ) मागासलेल्या वर्गाला उच्चशिक्षणाची सोय व शिक्षणविषयक सवलती दिल्या पाहिजेत.
ब ) सामान्य माणसाला शिक्षण सुलभ होईल अशी व्यवस्था केली पाहिजे. खालच्या वर्गाला उच्चशिक्षण ही फार खर्चाची बाब होता कामा नये.
क ) प्राथमिक शिक्षणावर अधिक खर्च करावा.
ड ) शुल्क आकारून शिक्षणावर होणार खर्च वसूल करणे म्हणजे शिक्षणाचे व्यापारीकरण होय. शिक्षण सर्वांना सहज उपलब्ध होणे आवश्यक आहे. शिक्षण खात्याचा कारभार उत्पन्न व खर्चाच्या ताळेबंदीच्या आधारावर चालविला जाऊ नये.
*4 ) सर्व सामाजिक दुखवण्यावर उच्चशिक्षण हेच औषध आहे :-* शिक्षण हे सामाजिक परिवर्तनाचे शस्त्र आहे अशी डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांची धारणा होती. शिकलेला मनुष्य समाजात अनुकूल बदल घडवून आणू शकतो. समाजाची मने क्रांतीप्रवण बनविण्यासाठी शिक्षणाशिवाय दुसरे माध्यम नाही अशी बाबासाहेबांची ठाम भूमिका होती. यामुळेच बाबासाहेब आंबेडकर देशातील दबलेल्या , पीडलेल्या , मागासलेल्या समाज घटकाला उच्चशिक्षित होण्याचे आवाहन करतात.
*5 ) शिलाशिवाय शिक्षणाची किंमत केवळ शून्य आहे :-* दिनांक 3 जून 1953 रोजी रावळी कॅम्प येथे केलेल्या भाषणात बाबासाहेब म्हणतात, " शिक्षणाचे महत्व आहे. मात्र शिक्षणाबरोबरच माणसाचे शीलही सुधारले पाहिजे. शिलाशिवाय शिक्षणाची किंमत केवळ शून्य आहे. ज्ञान हे तलवारीसारखे आहे. समजा एखाद्या माणसाच्या हाती तलवार आहे तर तिचा सदुपयोग की दूरूपयोग करायचा हे तया माणसाच्या शीलावर अवलंबून आहे. तो त्या तलवारीने एखाद्याचा खून ही करील किंवा एखाद्याचा बचाव करील. ज्ञानाचेही तसेच आहे. एखादा शिकलेला माणूस त्याचे शील चांगले असेल तर आपल्या ज्ञानाचा उपयोग लोकांच्या कल्याणासाठी करील परंतू त्याचे शील चांगले नसेल तर तो आपल्या ज्ञानाचा उपयोग लोकांचे अकल्याण करण्यासाठी खर्च करील.
*6 ) शिक्षण हीच जीवनातील सर्वात महत्वाची जबाबदारी होय :-* सुशिक्षातांनी आपल्या अशिक्षित बांधवाकडे योग्य लक्ष दिले नाही तर समाजाचा रास होईल. आपल्या दरिद्री व अज्ञानी बांधवांचे दारिद्रय आणि अज्ञान दूर करणे हे सुशिक्षितांचे पहिले कर्तव्य आहे. आपल्या मुलाबाळांची नीट निगा राखून पालकांनी त्याच्या शिक्षणाची व्यवस्था केली पाहिजे. शिक्षण हीच जीवनातील सर्वात महत्वाची बाब होय.
*7 ) शिक्षक व प्राध्यापकांनी विद्यार्थ्यांत स्वतंत्र प्रज्ञा व मौलिक विचारक्षमता निर्माण करावी :-* ज्ञानदानाचे पवित्र कार्य करणारा शिक्षक आणि प्राध्यापक कसा असावा? या बाबातही बाबासाहेब आंबेडकरांनी आपले विचार व्यक्त केले आहेत. मुंबई विद्यापीठ कायदा दुरूस्ती विधेयकावर मुंबई विधानमंडळात बोलताना दिनांक 27 जुलै 1927 रोजी बाबासाहेब आंबेडकरांनी खालील विचार मांडले आहेत.
अ ) महाविद्यालयातील प्राध्यापक आणि विद्यापीठातील प्राध्यापक यांच्यात सलोख्याचे संबंध असावेत ते जर तसे नसतील तर प्राध्यापकवर्ग स्वतःच्या आणि समाजहिताच्या दृष्टीने आवश्यक संशोधन व ज्ञानप्रवर्तनाचे कार्य करूच शकत नाही.
ब ) कामाच्या ओझ्याखाली दबलेला प्राध्यापक खऱ्या अर्थाने शिक्षक होऊच शकत नाही. त्यांच्याकडून कोणत्याही प्रकारच्या मौलिकतेची अपेक्षा करता येणार नाही. अशा शिक्षकापासून त्यांच्या विद्यार्थ्यांना कोणतही प्रेरणा मिळणार नाही.
क ) शिक्षणक्षेत्रात प्राध्यापकाचे व्यक्तिमत्व अत्यंत महत्वाचे असते. कारण प्राध्यापकांचे व्यक्तिमत्वच विद्यार्थ्यांत जिज्ञासा , प्रेरणा व विश्वास निर्माण करण्यास समर्थ असते. तसेच प्राध्यापकांचे व्यक्तिमत्व त्यांच्या सहकार्यात कार्याची प्रेरणा निर्माण करून त्यांना कृतीप्रवण बनविते. स्वतंत्र प्रज्ञा व मौलिक विचारक्षमता असणाऱ्या विद्वान प्राध्यापकांचा सहवास सर्वच प्रामाणिक विद्यार्थ्यांना लाभणे आवश्यक आहे.
ड ) शिक्षक हा वृत्तपत्रासारखा असतो आणि राजकिय पुढारी हा मतपत्रासारखा असतो. शिक्षकांनी वृत्तपत्रासारखे नेहमी अद्यावत असावे.
संदर्भ :- डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांचे शैक्षणिक क्रांतीचे तत्वज्ञान.
संकलन :- छगन शेटे

No comments:
Post a Comment