📙 *पृथ्वीवरून पाठविलेला संदेश मंगळावर पोहोचायला किती वेळ लागेल ?* 📙
***********************************
भारताने चंद्राभोवती प्रदक्षिणा घालण्यासाठी पाठवलेल्या 'चंद्रयान' या अवकाशयानाशी संपर्क तुटल्यामुळे तो प्रकल्प अर्धवट सोडून द्यावा लागला होता. तरीही जे नऊ महिने ते यान आपलं आखून दिलेलं काम इमानेइतबारे पार पाडत होतं, त्या काळात निर्धारित कामापैकी ९० टक्के काम पार पडल्याचं आपल्या अंतराळविज्ञान विभागानं जाहीर केलं आहे. साहजिकच त्या यानाशी संपर्क साधण्याची, दळणवळणाची व्यवस्था कार्यक्षम होती यात शंका नाही.
तरीही अशा यानाला जमिनीवरच्या नियंत्रण कक्षातून विशिष्ट कामगिरी पार पाडायचा आदेश त्याला मिळायला किती वेळ लागत असेल, हा एक उत्कंठा लावणारा प्रश्न मनात उभा राहतो. कारण एखादी कामगिरी त्या यानानं तात्काळ पार पाडावी असं वाटत असेल तर हा संदेश किती वेगाने त्याच्यापर्यंत पोहोचतो याला महत्त्व येतं.
चंद्र त्या मानाने पृथ्वीच्या जवळ आहे. पण मानवांनं आता मंगळ, शुक्र, गुरू, शनी एवढंच काय, पण नेपच्यूनसारख्या अतिदूर असणाऱ्या ग्रहांवरसुद्धा यानं पाठवली आहेत. त्यांचं नियंत्रण जमिनीवरूनच केलं जात आहे आणि त्या यानांनी मिळवलेली माहिती नियंत्रण कक्षाकडे संग्रहितही होत आहे. या साऱ्या दळणवळणाला किती वेळ लागतो ? या प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी आपल्याला दोन बाबींची माहिती हवी. या संदेशांच्या प्रवासाचा वेग आणि त्या याना किंवा ग्रहापर्यंतच अंतर.
जमिनीवरून संदेश पाठवले जातात ते रेडिओलहरींच्या माध्यमातून. उलट दिशेने येणारी माहितीही त्याच रूपात मिळवली जाते. आपल्या नजरेला भावणारा 'तानापिहिनिपाजा' या पट्टय़ातला दृश्य प्रकाश किंवा क्ष-किरणं किंवा मोबाइल फोनच्या दळणवळणासाठी वापरलं जाणारं मायक्रोवेव्ह प्रारण ही सर्व विद्युतचुंबकीय वर्णपटाचाच एक भाग आहेत. रेडिओलहरीही याच वर्णपटात मोडतात. त्यामुळे या सर्वांचा वेग सारखाच आहे. प्रकाशाचा वेग अचूक मोजला गेला आहे. तोच मग रेडिओलहरींचाही वेग ठरेल. तो आहे एका सेकंदाला तीन लाख किलोमीटर. त्या वेगाने हे संदेश आपली वाटचाल करत असतात.
पृथ्वी आणि मंगळ दोन्हीही सूर्याभोवती प्रदक्षिणा घालत असतात. या भ्रमणाचा दोन्हींचा वेगही वेगवेगळा आहे. त्यामुळे कधी हे दोन ग्रह सूर्याच्या दोन बाजूंना असतात, त्या वेळी त्यांच्यामधलं अंतर सर्वात जास्त असतं. इतर वेळेला तो ते सूर्याच्या एकाच बाजूला असतात, त्या वेळी त्यांच्यामधलं अंतर किमान असतं. मंगळ आणि पृथ्वी यांच्यामधलं किमान अंतर आहे ७.८ कोटी किलोमीटर. प्रकाशाच्या वेगाने पार करायला केवळ ४.३ मिनिटं लागतात; पण त्या दोघांमधलं कमाल अंतर आहे ३७.८ कोटी किलोमीटर. ते पार करायला मात्र रेडिओसंदेशांना तब्बल २१ मिनिटं लागतात.
*बाळ फोंडके यांच्या 'किती ?' या पुस्तकातून*

No comments:
Post a Comment