📙 *व्यक्तीचं वय कसं ओळखतात ?* 📙
बीजिंग येथे पार पडलेल्या ऑलिम्पिक सामन्यांच्या वेळी जिम्नॅस्टिक्स स्पर्धांमध्ये भाग घेतलेल्या चीनी मुलींच्या वयासंबंधी वाद निर्माण झाला होता. ऑलिंपिक सामन्यांच्या घटनेनुसार १६ वर्षांपेक्षा लहान व्यक्तीला सामन्यात भाग घेता येत नाही; आणि काही चिनी मुलींचं व त्यापेक्षा कमी असल्याची शंका इतर देशातील स्पर्धकांनी किंवा अधिकाऱ्यांनी व्यक्त केली होती. चिनी व्यक्तीची चण पाश्चात्यांपेक्षा लहानखुरी असते; पण ते ध्यानात घेऊनही काही मुली १६ वर्षांच्या असणार शक्य नव्हतं.
स्त्रियांच्या स्पर्धांमध्ये भाग घेऊन त्या जिंकणाऱ्या रशियन किंवा पूर्व जर्मनीच्या मुलींबद्दलही त्या आधीच्या ऑलिंपिक सामन्यांच्या वेळी त्या स्त्रियाच आहेत की काय अशी शंका उत्पन्न केली गेली होती; आणि त्याचा निवाडा त्या मुलींच्या रक्तातील पेशी घेऊन त्यातील गुणसूत्रांच्या आधारावर केला गेला होता. तसंच एखादी स्पर्धा जिंकणाऱ्या व्यक्तींना अधिक ताकद मिळवण्यासाठी किंवा स्नायूंची मूलभूत क्षमता वाढविण्यासाठी उत्तेजक पदार्थ घेतले आहेत की नाही याचाही निवाडा वैज्ञानिक चाचण्या घेऊन केला गेला आहे. त्याच्याच आधारे बेन जॉन्सनचं सोल ऑलिम्पिकमधलं १०० मीटर धावण्याच्या शर्यतीतलं विजेतेपद हिसकावून घेतलं होतं.
तशाच प्रकारे चिनी मुलींच्या वयाचा प्रश्नही सोडवता येईल का ? असा सवाल केला गेला होता. गुन्ह्याच्या तपासात पोलिसांना मदत करणारे वैज्ञानिक, कलेवराच्या हाडांची आणि दातांची परीक्षा करून त्यावरुन त्या मृत व्यक्तीचं वय ओळखतात. कारण आपल्या कवटीच्या मध्यभागी दोन बाजूंची सपाट हाडं शिवल्यासारखी सांधली जातात. या शिवणीचं स्वरूप पाहून त्या व्यक्तीचं वय ओळखता येतं. तसंच बरगड्या जिथे मधल्या हाडाला जोडल्या जातात तिथल्या बरगड्यांच्या टोकाची तपासणी करूनही वयाचा अंदाज बांधता येतो. कारण सुरुवातीला ही टोकं पसरलेली आणि गोलसर असतात; पण जसजसं वय वाढत जातं तसतशी वापरामुळेही टोकं खडबडीत होऊ लागतात.
जन्म होण्यापूर्वी आईच्या पोटात असल्यापासूनचं वय व्यक्तीच्या हाडांची तपासणी करून ओळखण्याची पद्धत या वैज्ञानिकांनी विकसित केली आहे. त्यानुसार निरनिराळ्या वयात निरनिराळ्या हाडांच्या वैशिष्टय़ांचा उपयोग होतो.
तसंच निरनिराळे दात येण्याचं वयही निरनिराळं असतं. दुधाचे दात साधारणत: सहाव्या महिन्यांपासून यायला सुरुवात होते. ते पडून जे जेव्हा पक्के दात येतात त्यांचा कालखंडही वेगवेगळा असतो. अक्कल दाढ तर विसाव्या वर्षांनंतर येते. तरीही या सर्व दातांच्या जडणघडणीची तयारी जन्मल्यापासूनच होत असते, त्यामुळे त्या दातांच्या स्थितीवरून व्यक्तीचं वय ओळखणं शक्य होतं.
पण या सर्व चाचण्या अचूक वयनिदान करू शकत नाहीत. त्या चाचण्यांवरून केलेलं निदान दोन वर्षांनी चूक असू शकतं. म्हणजेच या चाचण्यांमधून एखाद्या चिनी मुलीचं वय सोळा आहे असा निष्कर्ष काढला गेला असेल, तर तिचं वय चौदा ते अठरा या पट्ट्यात असू शकतं. म्हणजेच सोळा असं जिच्या वयाचं निदान झालं आहे अशी मुलगी प्रत्यक्षात चौदा वर्षांची असू शकते.
*बाळ फोंडके यांच्या 'कसं ?' या पुस्तकातून*

No comments:
Post a Comment