📙 *पुरातन हाडांची ओळख कशी पटवतात ?* 📙
कधी कधी पोलिसांना एखाद्या ठिकाणी अनपेक्षितपणे काही पुरलेली हाडं सापडतात. पुरातत्त्वशास्त्रज्ञांनी केलेल्या उत्खननात तर नेहमीच अशी हाडं सापडत असतात. ती कोणाची, म्हणजेच माणसाची की एखाद्या प्राण्याची हे ठरवण्याचे काम मग करावं लागतं; आणि प्राण्याचीच असली तर नेमक्या कोणत्या प्राण्याची याचाही छडा लावावा लागतो. माणसाच्या किंवा प्रायमेट्स म्हणजे वानर प्रजातीच्या प्राण्यांची हाडं इतर प्रजातीच्या प्राण्यांच्या हाडांपेक्षा वेगळी असतात. एक तर दोन पायांवर उभं राहण्यासाठी हाडांच्या रचनेत काही बदल व्हावा लागला. तसाच बदल कवटीच्या आणि हातापायांच्या बोटांच्या हाडांमध्येही दिसून येतो. त्यामुळे सापडलेली हाडं जनावरांची आहेत, पक्ष्यांची आहेत की प्रायमेट जातीच्या प्राण्यांची आहेत हे ओळखणं कठीण जात नाही.
पण इतर प्रायमेट प्राण्यांपासून माणसांची हाडं वेगळी ओळखायची तर माणसाच्या हाडांमध्ये काही वेगळेपण असण्याची आवश्यकता आहे. तशा अनेक वैशिष्ट्यांची ओळख आता पटली आहे. त्यांचाच वापर करून मग सापडलेली हाडं कोणाची आहेत याचा छडा लावला जातो.
सुरुवात कवटीच्या हाडापासूनच करायला हरकत नाही. माणसाचा मेंदू इतर वानरांच्या मेंदूपेक्षा फारच मोठा आहे. माणसाचा सर्वात जवळचा उत्क्रांतीतील पूर्वज चिम्पांझी याचा मेंदूही कितीतरी लहान होता. त्यामुळे चिंपांझीच्या कवटीचं घनफळ केवळ ४०० घनसेंटीमीटर असतं, तर माणसाच्या कवटीचं १४०० घनसेंटिमीटर. माणसाचे सुळे स्त्री आणि पुरुष दोघांतही लहान असतात पण चिंपांझी नराचे सुळे मादीपेक्षा मोठे असतात. चिंपांझी झाडांवर सहजगत्या चढू शकतात तसंच हाताच्या बोटांच्या पेरांवर तोल सांभाळत चालू शकतात. त्यामुळे चिंपांझीच्या हाताच्या बोटांची हाडं माणसाच्या हाताच्या बोटांपेक्षा लांब असतात. माणुस आपला अंगठा समोरासमोरुन इतर बोटांना लावू शकतो. माणूसपणाचं हे एक खास लक्षण आहे. त्यामुळे माणसाच्या हाताच्या अंगठ्याचं हाड लांब असतं आणि त्यांच्या हालचालींसाठी तो अनेक स्नायूंना जोडण्याची व्यवस्था असते. चिंपांझींच्या खांद्याचे हाडं म्हणजे कॉलरबोन वरच्या दिशेला झुकलेली असतात. माणसाची सरळ किंवा खालच्या दिशेला झुकलेली असतात. ताठ उभं राहणं शक्य होण्यासाठी माणसाचा कणा वक्राकार असतो. चिंपांझीचा सरळसोट असतो. त्यामुळे दोन पायांवर उभा राहिला तरी तो ताठ होऊ शकत नाही. पोक आल्यासारखा वाकलेलाच राहतो. याच कारणासाठी माणसाच्या कमरेच्या हाडांमध्येही बदल झालेला आहे. शिवाय स्त्रियांमध्ये प्रसूतीच्या वेळी मुलाचं डोकं बाहेर यावं यासाठी ही हाडं एकमेकांपासून थोडी अलग होऊन तिथलं क्षेत्रफळ वाढु शकतं. त्यामुळे या हाडांचे सांधे लवचिक असतात. माणसाच्या पायांची बोटंही चिंपांझीच्या पायाच्या बोटांपेक्षा लहानखुरी असतात.
इतरही बारीकसारीक अनेक फरक आहेत. त्या सर्वांची परीक्षा करून मिळालेली हाडं माणसाचीच आहेत की नाहीत याचा निर्विवाद निवाडा करता येतो.
*बाळ फोंडके यांच्या 'कसं ?' या पुस्तकातून*

No comments:
Post a Comment