👨🏼⚕ *स्टेथोस्कोपमुळे डॉक्टरांना काय समजते ?* 👨🏼⚕
*********************************
स्टेथोस्कोप नसलेल्या डॉक्टरची कल्पनाही आपण करू शकत नाही. किंबहुना एखाद्या डॉक्टराने रुग्णाची तपासणी करताना स्टेथोस्कोप वापरला नाही तर रुग्णाच्या कपाळावर नक्कीच आठ्या पडतात व "काहीच तर तपासले नाही" असे उद्गारही तो काढतो. याचाच गंमतशीर प्रकार खेड्यात बघायला मिळतो. गुडघा दुखला तर गुडघ्यालाही स्टेथोस्कोप लावण्याची बिकट अवस्था डॉक्टरवर येऊ शकते वा क्वचित व्यवसायाच्या दृष्टीनेही तो तसे मुद्दाम करतो. या स्टेथोस्कोपमुळे डॉक्टरांना नेमके काय कळते, असा प्रश्न अनेकदा तुम्हाला पडला असेल. स्टेथोस्कोपमुळे डॉक्टरांना खूप काही कळते, हे जरी खरे असले तरी सगळेच काही कळते असे नाही.
स्टेथोस्कोपचा छातीला लावण्याचा भाग, नळ्या व कानात ठेवायचे प्लग्ज असे तीन भाग पाडता येतील. छातीला लावण्याच्या भागास धातूची एक उघडी चपटी डबी व त्यावर एक पातळसा पडदा बसवलेला असतो. हा पातळ पडदा आवाजाची तीव्रता अनेक पटींनी वाढतो व त्यामुळे शरीरात निर्माण होणारे आवाज डॉक्टरांना ऐकू येतात. हृदय आकुंचन प्रसरण पावत असताना येणारे हृदयाचे ठोके, श्वास घेताना व सोडताना येणाऱ्या श्वसनाचे आवाज स्टेथोस्कोपच्या सहाय्याने ऐकता येतात. त्यांच्याच झालेल्या बदलामुळे हृदयाच्या झडपांचे आजार, फुप्फुसाचा न्युमोनिया, क्षयरोग, दमा अशा आजारांचे निदान करता येते. याखेरीज पोटाला स्टेथोस्कोप लावल्यास आतड्यांच्या आकुंचन प्रसरणामुळे येणारे आवाज ऐकता येतात. या आवाजामुळे आतडय़ांत अडथळा (obstruction) निर्माण झाला असल्यास त्याचे निदान होऊ शकते. गर्भवती स्त्रीच्या पोटावर स्टेथोस्कोप ठेवून तिच्या गर्भाशयातील बाळाच्या हृदयाचे ठोकेही मोजता येतात. मूल जिवंत आहे वा नाही, त्याला पुरेसा रक्तपुरवठा होतोय वा नाही हेही स्टेथोस्कोप ने कळू शकते. यावरून लक्षात येईल की स्टेथोस्कोपने अनेक रोगांचे निदान करता येते; पण डोके दुखण्यास डोक्याला, गुडघा दुखल्यास गुडघ्याला वा मान लचकल्यास मानेला स्टेथोस्कोप लावून काहीच उपयोग होणार नाही !
*डॉ. जगन्नाथ दीक्षित*
*डाॅ. अंजली दीक्षित*
यांच्या 'मेडिकल जनरल नॉलेज' या पुस्तकातून
मनोविकास प्रकाशन
०२० ६५२६२९५०

No comments:
Post a Comment