🧠 *बुद्धिमत्ता कशी मोजतात ?* 🧠
***********************************
बुद्धिमत्तेचं मोजमाप ही एक अमूर्त कल्पना आहे. तरीही बुद्ध्यांकाच्या म्हणजेच इंटेलिजन्स कोशंटच्या रूपात बुद्धिमत्तेचं मोजमाप करण्यात येतं. त्यासाठी जी परीक्षा घेतली जाते तिच्यात अनेक प्रकारचे प्रश्न असतात. काही प्रश्न समस्यांवर मात करण्यासाठी मार्ग शोधण्याचे असतात. याला प्रॉब्लेम सॉल्व्हिंग असे म्हणतात. मिळवलेल्या ज्ञानाचा उपयोग प्रत्यक्षात येणाऱ्या काही समस्या सोडवण्यासाठी कसा केला जातो याची परीक्षा या प्रकारच्या प्रश्नांमधून केली जाते. केवळ घोकंपट्टी करून साठवलेल्या माहितीवर विसंबून न राहता तिच्या मदतीने स्वतंत्र विचार करून त्या माहितीचा समोरच्या समस्येचा उलगडा करण्यासाठी तर्कशुद्ध मार्ग शोधण्याची क्षमता या परीक्षेतून तपासली जाते. काही प्रकारचे प्रश्न स्मरणशक्तीशी निगडित असतात तर इतर काही समोरच्या माहितीच्या ढिगाऱ्यातून निरनिराळे रचनाबंध शोधून काढून त्या माहितीचा अर्थ लावण्याच्या क्षमतेची परीक्षा घेतात. काही प्रश्न अाकलनक्षमतेची कसोटी पाहणारे असतात. काही प्रश्न सोडवताना किती वेळ घेतला गेला याचीही तपासणी केली जाते. त्यातून स्वतंत्र विचार करण्याच्या वेगाची तपासणी केली जाते. काही परीक्षापद्धतींमध्ये विशिष्ट वेळात विशिष्ट संख्येने प्रश्न सोडवायचे असतात, तर इतर काही परीक्षांमध्ये एका विशिष्ट गटातल्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी घेतलेल्या वेळेचा विचार करण्यात येतो.
या सर्वांतून त्या विशिष्ट व्यक्तीचं मानसिक वय किती असेल याचा निवाडा करण्यात येतो. अल्फ्रेड बिने यानं आयोजित केलेल्या या परीक्षापद्धतीमध्ये मग या मानसिक वयाला शारीरिक वयानं भागून १०० नं गुणण्यात येतं. त्यातून मिळालेला आकडा हा त्या व्यक्तीचा बुध्यांक मानण्यात येतो. त्याच्या इंग्रजी नावांमध्ये इंटेलिजंस कोशंटमध्ये गुणोत्तर अभिप्रेत आहे. त्यानुसार मानसिक वय व शारीरिक वय यातील गुणोत्तर या परीक्षेतून काढण्यात येतं.
आता सुधारित पद्धतीमध्ये केवळ या अंकांवर विसंबून राहण्यात येत नाही, तर एखाद्या समाजातल्या बुद्ध्यांकाच्या वितरणाचा विचार केला जातो. एखाद्या घंटेसारख्या आकाराच्या या वितरणाला गॅास वितरण म्हणतात. त्याच्या मद्यावरच्या अंकाला १०० मानलं गेलं आहे. या शंभराच्या दोन्ही बाजूला ते वितरण पसरलेलं असतं. त्या वितरणात बिनेच्या पद्धतीनुसार मोजला गेलेला बुद्ध्यांक कुठलं स्थान पटकावतो हे बघून त्या व्यक्तीचा बुद्धय़ांक मोजण्यात येतो.
तरीही हे खरोखर बुद्धिमत्तेचे मोजमाप आहे कि काय याविषयी बराच वाद आहे. कारण हॉवर्ड गार्डनरनं दाखवून दिल्याप्रमाणे बुद्धिमत्ता भाषाविषयक, तार्किक, गणिती, अवकाशविषयक, शरीरविषयक, सांगीतिक, आत्मसंवादी व परीसंवादी अशा सात प्रकारची आहे; पण बुद्ध्यांक मोजण्याच्या परीक्षांमध्ये भाषाविषयक व तार्किक गणिती बुद्धिमंत्तांचीच कसोटी घेतली जाते. अलीकडच्या काळात त्यामध्ये रचनाबंध ओळखण्याची म्हणजेच मर्यादित प्रमाणात अवकाशविषयक बुद्धिमत्तेचीही चाचणी घेतली जाते; पण इतर बुद्धिमत्तांचा विचार या परीक्षांमध्ये केला जात नाही. त्यामुळे सर्वांच्याच बाबतीत बुद्ध्यांक हे बुद्धिमत्तेचं मोजमाप ठरू शकत नाही.
*बाळ फोंडके यांच्या 'कसं ?' या पुस्तकातून*

No comments:
Post a Comment