📙 *आपल्याला वासांची आठवण कशी राहते ?* 📙
""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""
डोळे, नाक, त्वचा, कान आणि जीभ या आपल्या पंचेंद्रियांकडून आपल्या आसपासच्या जगाविषयीची माहिती मिळत असते. या इंद्रियांचे बाह्य भागांमध्ये निरनिराळ्या प्रकारच्या संवेदनांचं ग्रहण करण्याची शक्ती असते. म्हणजे डोळे प्रकाशलहरींच्या रूपात येणाऱ्या संवेदनांना दाद देतात. कान ध्वनीलहरींना प्रतिसाद देतात. तसंच नाक हे निरनिराळ्या गंधांना दाद देतं.
संदेश कोणत्याही रूपातला असला की त्याला दाद देणाऱ्या ग्राहक पेशी तो संदेश त्यांच्याशी जोडलेल्या मज्जातंतुंकडे सोपवतात. तिथं त्या संदेशाचं विद्युतरासायनिक लहरींमध्ये रूपांतर होतं आणि तो संदेश मेंदूतल्या विवक्षित केंद्राकडे पोहोचतो. तिथं त्यांचं वाचन होऊन त्याची नोंद स्मरणकोशात ठेवली जाते. तसंच त्या क्षणी त्या संदेशाला दाद देणारा उलटा संदेश पाठवायचा असल्यास त्याचीही तजवीज केली जाते. स्मरणकोशात साठवून ठेवलेल्या त्या संदेशाच्या नोंदीचा वापर परत जेव्हा त्याच प्रकारचा संदेश येतो त्यावेळी केला जातो. त्या नोंदीच्या आधारावरून मग तो त्यापूर्वीही आल्याची जाणीव होते. म्हणजेच आपली आठवण जागी होते.
कोणताही वास म्हणजे गंध हा त्या पदार्थातून हवेत सहज उडून जाणाऱ्या रसायनांच्या रूपात वावरत असतो. न्हाणीघराच्या कोपऱ्यात ठेवलेली रूम फ्रेशनरची वडी तिथलं वातावरण सुगंधित करते, कारण त्या वडीतून उडून जाणारे त्या गंधाच्या रसायनांचे रेणू हवेत वावरत असतात. त्यांचा संयोग आपल्या नाकामधल्या त्या रसायनांना दाद देणाऱ्या ग्राहक रेणूंशी होतो. तसा तो झाला की मग त्यापायी निर्माण झालेला विद्युतरासायनिक स्पंद मेंदूकडे पोहोचतो. स्मृतीकोशात साठवून ठेवला जातो.
सुगंध विविध असतात. मात्र त्या सुगंधाच्या रसायनांमध्ये एकाहून अधिक रेणू असू शकतात. तसंच या रसायनांचे रेणू मोठ्या आकाराचे असू शकतात. त्यात वेगवेगळे घटक असू शकतात. त्या निरनिराळ्या घटकांना दाद देणारे निरनिराळे ग्राहक रेणू नाकाच्या पेशींमध्ये असतात. त्यांना अोलफॅक्टरी रिसेप्टर्स म्हणतात. त्यांच्याकरवी मिळालेले संदेश स्मृतिकोशात साठवलेले असतात. नव्यानं जेव्हा एखाद्या सुगंधी रसायनाचे रेणू हवेत विहरत आपल्या नाकपुड्यांमधल्या या ग्राहक रेणूंशी दंगामस्ती करू लागतात, तेव्हा त्या निरनिराळ्या घटक रेणूंनी चाळवलेले मज्जातंतु मेंदूकडे ती माहिती पोहोचवतात. त्या माहितीच्या तुकड्यांचं एकत्रीकरण करून मेंदू त्या सुगंधाची आठवण जागवतो. म्हणून तर उडतउडत आलेला सोनचाफ्याचा सुवास केवळ त्या गंधाचीच नव्हे, तर त्या गंधाशी निगडित असलेली दुसरी एखादी रम्य आठवणही जागवतो.
*बाळ फोंडके यांच्या 'कसं ?' या पुस्तकातून*

No comments:
Post a Comment