✂ *बायाॅप्सी म्हणजे काय ?* ✂
*********************************
रोगाचं किंवा व्याधीचं निश्चित निदान करण्यासाठी अनेक परीक्षांचा वापर केला जातो. स्टेथोस्कोपने फुप्फुसाची परीक्षा करणं, तापमापकानं शरीराचं तापमान मोजणे, रक्तदाब मोजणे यासारख्या परीक्षा सहज करता येतात. त्यावरून निदान होत नसेल तर मग रक्त, मूत्र, विष्ठा, थुंकी यासारख्या शरीरद्रवांची परीक्षा केली जाते. त्याही पुढे जाऊन क्ष-किरण परीक्षा, ईसीजी, अल्ट्रासाऊंड, सिटी स्कॅन, एमआरआय यासारख्या परीक्षाही केल्या जातात. त्याच्या मदतीनं शरीरातील काही अवयवांमध्ये बिघाड झाला आहे अशी शंका आल्यास मग त्या अवयवाचा एक छोटासा तुकडा काढून त्यातील पेशींची सूक्ष्मदर्शकाच्या मदतीनं परीक्षा केली जाते. पॅथालॉजिस्ट ही परीक्षा करतात. त्याच्या साहाय्यानं मग त्या पेशी निरोगी अवस्थेत आहेत की त्यांच्यात काही बदल झाले आहेत हे ठरवलं जातं; आणि बदल झाले असेलच तर ते भद्र आहेत की अभद्र आहेत याचा निर्णय केला जातो. अवयवाचा नमुना परीक्षेसाठी काढून घेण्याच्या या पद्धतीलाच बायाॅप्सी असं म्हणतात. एखाद्या अवयवाची असामान्य वाढ झालेली असली किंवा तिथे एखादी गाठ आलेली असली तर ती कर्करोगाची आहे की नाही हे ठरवण्यासाठी सहसा बायाॅप्सीचाच वापर केला जातो; परंतु काही वेळा कर्करोगाव्यतिरिक्त इतर व्याधींच्या निदानासाठीही बायाॅप्सी केली जाते.
बायाॅप्सी करण्याच्या अनेक पद्धती आहेत. रोगनिदानासाठी केल्या जाणाऱ्या बायाॅप्सीला इन्सिजनल बायाॅप्सी असं म्हणतात. पण काही वेळा त्या गाठीचा किंवा वाढलेल्या भागाचा तुकडाच न घेता संपूर्ण गाठच काढून टाकली जाते. त्याला एक्सिजनल बायाॅप्सी असं म्हणतात. रोगनिदानासाठी केल्या जाणाऱ्या बायाॅप्सीसाठीही निरनिराळय़ा पद्धती वापरल्या जातात. अतिशय मऊ अवयव असले तर केवळ घर्षणाचा वापर करून नमुना मिळवला जातो. यासाठी कापूस गुंडाळलेल्या काठीचा, कॉटन बडचा वापर होतो. तोंडाच्या आतल्या भागात तंबाखूच्या सेवनाने कर्करोग होण्याची भीती असते. त्या रोगाचा प्रत्यक्ष प्रादुर्भाव होण्यापूर्वी काही पूर्वलक्षणं दिसतात. ती पाहण्यासाठी कॉटन बड तिथं जोरानं घासून तिथल्या पेशी मिळवता येतात. त्यांचं निरीक्षण करून कर्करोग होण्याच्या शक्यतेचं निदान केलं जाऊ शकतं. काही अवयवांच्या पेशी मिळवण्यासाठी बारीक सुई त्याच्यात घुसवून तेथील पेशी खेचून बाहेर काढल्या जातात. काही वेळा मोठ्या परिघाची सुई वापरून त्या अवयवाच्या गाभ्यातला भाग कोरून काढला जातो, तर काही वेळा सरळ सरळ चाकू लावून लहानशी शस्त्रक्रिया करून तो तुकडा कापून काढला जातो.
*बाळ फोंडके यांच्या 'काय ?' या पुस्तकातून*

No comments:
Post a Comment