🔭 *वैज्ञानिक दृष्टिकोन* 🔭
*मन मनाचे आजार: भूताने झपाटने, देवीचे अंगात येणे*
*भूत म्हणजे काय?*
भूताने झपाटणे अथवा भूत दिसणे या बाबीचे प्रामुख्याने दोन प्रकार करता येतात. एक म्हणजे भासाचे भूत आणि दुसरे म्हणजे मनोरुग्णतेतुन निर्माण झालेल्या वर्तनालाही भुताने झपाटले आहे असे मानले जाते. समाजातील सर्व वयोगटात, स्त्री पुरुषात शहरी ग्रामीण भागात, सुशिक्षित अशिक्षित, गरीब श्रीमंतांमध्ये भूत ही कल्पना आढळते. ही कल्पना कशी निर्माण होते ? या देशातील पारंपरिक विचार असे मानतो की, 'आत्मा' असतो. माणूस मेल्यावर हा आत्मा अतृप्त असेल, तर तो सूक्ष्म रूपाने सर्वत्र वावरतो. स्वतःच अतृप्त जीवनवासना पूर्ण करण्यासाठी तो कोणा ना कोण्या देहाची निवड करतो. त्या व्यक्तीला तो झपाटून टाकतो. भूतबाधेबद्दलचे ज्ञान आपणाकडे सर्वत्र आणि विपुल प्रमाणात मिळते. कुणाला कशी भूतबाधा होते आणि या पुस्तकातील मंत्राने ती कशी दूर करता येईल याची रसभरीत वर्णने अशा पुस्तकात असतात. भूत, प्रेत, पिशाच्चापासून मुक्ती हवी असेल तर, 'ऊ कं कल्याणं शोभनाभ्याम् न: ॥' या मंत्राचा जप रोज १००८ वेळा करावा. भूताने झपाटलेल्याला म्हणता येत नसेल, तर त्याच्या शेजारी बसून एखाद्याने म्हणावा. मंत्र म्हणताना तांब्याच्या किंवा चांदीच्या भांड्यात पाणी ठेवून मंत्र म्हणून झाल्यावर कुलदैवताचे नाव घेऊन ते पाणी तीर्थ म्हणून प्यावे. टेपरेकॉर्डरवर हा मंत्र ब्राम्हणाच्या आवाजात टेप करून ऐकवला तरी चालेल. अशा भरपूर माहितीने ही पुस्तके खच्चून भरलेली असतात.
मरण कोणाला चुकत नाही. परंतु काहींचा खून होतो. कोणी आत्महत्या करतो. कोणाला अचानक ह्रूदयविकाराचा झटका येऊन जीवनयात्रा संपवावी लागते. कोणी स्त्री बाळंतपणात मरते. अचानक मृत्यूने गाठलेल्या या जीवांची इच्छा अपुरी राहते; म्हणूनच असे मानले जाते की, त्यांचे आत्मेही अतृप्त राहिले असणार. मग ते कोणते तरी झाड पकडतात आणि स्वतःची वासना पूर्ण करण्याचा प्रयत्न करतात. या स्वरूपाच्या विचारांचा संस्कार लहानपणापासून झालेला असतो. भूते आहेत. वेताळ, खवीस, हडळ, मुंजा असे त्यांचे अनेक प्रकार आहेत. स्त्री बाळंतपणात मेली तर तिची हडळ होते. ब्राह्मणाचा खून झाला तर त्याचा ब्रह्मराक्षस होतो. ब्राह्मण धनलोभी असेल तर त्याचा ब्रह्मसमंध होतो. पाणवठे, मसणवटे, मोडके वाडे, पडके बुरुज, वड, पिंपळ या ठिकाणी भुते रहातात. अमावस्येला मध्यरात्री ती हमखास भटकतात. त्यांना लिंबू, पिवळा भात, कोंबडे यांचा उतारा लागतो. या भूतांना डोके नसते. त्यांचे डोळे छातीवर असतात. त्यांची सावली पडत नाही. त्यांचे प्रतिबिंब दिसत नाही. त्यांचे पाय उलटे असतात. रामनाम म्हटल्यानंतर ते भूत पळते. हे सर्व काही लहानपणीच मनावर ठसवलेले असते. या संस्कारांच्या प्रभावाखाली भासाचे भूत धुमाकूळ घालते.
चार कारणांमधून ही बाब घडून येते. त्या बाबी म्हणजे ढोंग, संस्कार, माणसाचा सूचना स्वीकारणारा स्वभाव आणि इंद्रियजन्य भ्रम. या सर्वांतून सुटे सुटे किंवा एकत्रितपणे भूत या कल्पनेची निर्मिती होते.
*क्रमश:*
*तिमिरातूनी तेजाकडे* या पुस्तकातून

No comments:
Post a Comment