*मोहनजोदारो – विहंगम दर्शन*
लहानपणापासून आपण इतिहासाच्या पुस्तकात हरप्पा व मोहनजोदारो या दोन सिंधू सभ्यतेच्या संदर्भातल्या जागांविषयी वाचलेलं असतं. इतिहास अनेकांना रुक्ष विषय वाटतो तर कित्येकांना त्यात अत्यंत रुची असते. मला इतिहासाबद्दल फारसं प्रेम नव्हतं कधी, तरीही मोहनजोदारोविषयी एक सुप्त आकर्षण होतं, आहे.
मी कामाचा भाग म्हणून जल वायू परिवर्तन (climate change) या विषयावर नेहमी लिहिते (मी निवेदिता खांडेकर, एक पत्रकार). त्यासंदर्भात काहीतरी आंतरजालावर शोधत असताना मला अचानक हरप्पा संबधित एक संकेतस्थळ सापडलं. जितकं अचानक हे संकेतस्थळ सापडलं तितकंच अचानक त्यात एक विडीओ सापडला ज्यामध्ये मोहनजोदारोच्या जीर्णावषेशांचे ड्रोनच्या सहाय्याने हवेतून केलेलं चित्रण आहे. आपल्यापैकी अनेकांना पाकिस्तानात जाऊन हि जागा प्रत्यक्ष बघायची संधी मिळेल का याची शंकाच आहे. म्हणून, जर घरी बसल्या बसल्या छान सैर होतं असेल तर तो आनंद बाकीच्यांना पण मिळावा या उद्देशांनी पुढील दुवा शेअर करतेय.
https://www.harappa.com/video/drone-view-mohenjodaro
(८.५७ मिनिटे फक्त)
बघून नक्कीच थक्क होतो आपण, त्याकाळची नगर रचना बघून. स्वतः आनंद घ्या, इतरांना पण द्या, दुवा शेअर करा.
@ निवेदिता खांडेकर, दिल्ली
आपल्यापैकी जे शिक्षक असतील त्यांनी आप-आपल्या विद्यार्थ्यांना जरूर दाखवा.

No comments:
Post a Comment