Saturday, 17 June 2017

(#)जीएसएलव्ही एमके-3' चे यशस्वी प्रक्षेपण :-----

⭕भारतीय अवकाश संशोधन संस्थेने (इस्त्रो) तयार केलेल्या जीएसएलव्ही एमके-3 या आतापर्यंतच्या सर्वांत मोठ्या प्रक्षेपकाचे (रॉकेट) श्रीहरीकोटा येथून यशस्वी प्रक्षेपण झाले.

⭕जीएसएलव्ही एमके-3 हा पूर्णपणे स्वदेशी बनावटीचा उपग्रह प्रक्षेपक असून, त्यात भारतीय बनावटीच्या क्रायोजेनिक या शक्तिशाली इंजिनाचा वापर करण्यात आला आहे.

⭕सतीश धवन केंद्राच्या दुसऱ्या तळावरून सायंकाळी 5 वाजून 28 मिनिटांनी हा प्रक्षेपक अवकाशात झेपावला.⭕ या प्रक्षेपकाद्वारे 3.13 टन वजनाचा 'जी सॅट-19' हा दळणवळण उपग्रह अवकाशात पाठविण्यात आला असून, प्रक्षेपनानंतर 16 मिनिटांनी तो अवकाशात सोडण्यात आला.

⭕तसेच आगामी काळात या प्रक्षेपकाद्वारे अंतराळवीरांना अवकाशात पाठविणेही शक्‍य असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

⭕या यशस्वी प्रक्षेपणामुळे चार टन वजनाचे उपग्रह स्वबळावर अवकाशात पाठविण्याची भारताची क्षमता सिद्ध झाली असून, यापूर्वी 2.3 टनापेक्षा अधिक वजनाचे उपग्रह अवकाशात पाठविण्यासाठी भारताला इतर देशांची मदत घ्यावी लागत होती, मात्र, हे अवलंबित्व आता संपुष्टात आले आहे.
(#)रायगडावर महाराजांचा शिवराज्याभिषेक दिन सोहळा :-----

⭕छत्रपती शिवाजी महाराजांचा शिवराज्याभिषेक दिन सोहळा मंगळवार, 6 जून रोजी किल्ले रायगडावर साजरा करण्यात येणार आहे. सोहळ्याला राज्यभरातून हजारो शिवभक्त उपस्थित राहणार आहेत.

⭕अखिल भारतीय शिवराज्याभिषेक दिन महोत्सव समितीच्या वतीने गडावर 5 व 6 जून रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

⭕युवराज छत्रपती संभाजीराजे यांच्या मार्गदर्शनाखाली होणाऱ्या या कार्यक्रमाची सुरुवात गडपूजनाने होणार आहे.

⭕6 जूनला पहाटे गडावरील नगारखान्यासमोर ध्वजारोहण, त्यानंतर संभाजीराजे यांच्या उपस्थितीत मुख्य राज्याभिषेक सोहळा होणार आहे.

👇👇👇

No comments:

Post a Comment