Saturday, 17 June 2017

(#)SEBI कॉर्पोरेट प्रशासन समितीचे अध्यक्ष: उदय कोटक:------

⭕सिक्युरिटीज अॅण्ड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (SEBI) ने भारतीय कंपन्यांमधील कॉर्पोरेट प्रशासनासंबंधी मुद्द्यांवर SEBI ला सल्ला प्रदान करण्यासाठी 21 सदस्यीय समिती नेमली आहे.
ही समिती कोटक महिंद्र बँकचे उदय कोटक (MD) यांच्या अध्यक्षतेखाली आहे.
(#)चीनमध्ये जगातील सर्वात वेगवान लिफ्ट:----

⭕चीनच्या गगनचुंबी इमारतीत जगातील सर्वात वेगवान लिफ्ट प्रस्थापित केले आहे. मिनिटाला 1,260 मीटर गतीने ही लिफ्ट धावते.
⭕ही लिफ्ट जपानची कंपनी हिताची ने विकसित केली आहे.
(#)NCR क्षेत्रात घनकचर्‍याचे वर्गीकरण मोहिमेला सुरुवात:-----

⭕4 जून 2017 रोजी शहर विकास मंत्री एम. व्यंकय्या नायडू यांनी राष्ट्रीय राजधानी प्रदेशातील दारातच कचर्‍याचे वर्गीकरण मोहिमेचे उद्घाटन केले आहे.
⭕घर, हॉटेल्स, उपहारगृह इत्यादींसारख्या ठिकाणी दारातच महापालिका घनकचर्‍याचे वर्गीकरण केले जाईल. यात ओला कचरा हिरव्या रंगाच्या कचर्‍याच्या डब्यात तर कोरडा कचरा निळ्या रंगाच्या डब्यात गोळा केला जाईल. ....👇👇👇

No comments:

Post a Comment