शेतीचे उत्पादन वाढीतील अडथळे
डॉ. ज्ञानेश्वर वाघचौरे
आंतरराष्ट्रीय शेतीतज्ज्ञ.
अश्वमेध ,कोपरगाव.
02423 225525
8411887008
शेतीचे उत्पादन वाढले पाहिजे असे प्रत्येकाला वाटते व ते वाढू शकते. परंतु त्यातील किरकोळ त्रुटी ह्या विचारात घेऊन त्यांचे निरसन केले पाहिजे. जसे सोयाबीनचे उत्पादन २ क्विंटल पासून ते १८ क्विंटल पर्यंत उत्पादन घेणारे शेतकरी मला भेटतात व त्यांच्याशी चर्चा केल्यानंतर जे काही मुद्दे समोर आले ते शेतकऱ्यांना मार्गदर्शक ठरावे म्हणून इथे नमूद करत आहोत. किती क्षेत्रावर पेरणी करत आहे. व बियांची त्या साठी लागणारी मात्रा किती लागते. ते तपासून पेरणी करावी.
१. ज्या क्षेत्रावर पेरणी करावयाची आहे त्याची योग्य मशागत व शेणखत ,सेंद्रीय खत पेरणी पूर्वीच दिले गेले पाहिजे.
२. एकरी रोपांची संख्या उत्पादन निश्चित करते. २५ टक्के रोपे कमी झाल्यास २५ टक्के उत्पादन तिथेच घटते.
३. खरिपातील पेरणी करताना जिवाणूंची बीज प्रक्रिया केल्याशिवाय पेरणी करू नये.
४. बीज प्रक्रिया केल्याशिवाय पेरलेले बियाणे ज्यादा किंवा कमी पावसामुळे मरते. व जवळपास २० ते २५ टक्के मर किंवा कमी जर्मिनेशन इथेच होते. आणि उत्पादनात घट येते.
५.बिज प्रक्रियामुळे रोपांचे बाळसे सुरुवातीपासूनच जोमदार असते ,त्यामुळे पिकांची रोग प्रतिकार शक्ती वाढून अपेक्षित उत्पादन मिळते . बीज प्रक्रियेत बायोटेक कीट चा वापर करावा. ते पाण्याशिवाय बियाण्यास चिकटते .
६. आंतर मशागत व तण नियंत्रण हे यंत्राने केल्याने उत्पादन खर्च कमी येतो .
७. तण नाशकांचा वापर शिफारशीत वेळेत व योग्य ओल असतांना केल्यास उत्पादनातील घट येत नाही .
८. हंगाम बियाण्याची जात व पेरणीचा काळ हे समीकरण जुळवून पेरणी करावी .
गणिती पद्धतीने अश्वमेधच्या माध्यमातून सोयाबीन पिकात गेल्या अनेक वर्षांपासून प्रयोग केलेल्या प्रयोगातून असे लक्षात येते की वरील मुद्दे विचारात घेऊन काटेकोरपणे पालन केल्यामुळे एकरी १८ क्विंटल पर्यंत सोयाबीन मध्ये शेतकऱ्यांना उत्पादन घेता आले. त्याचा तपशील खालीलप्रमाणे
१) सोयाबीन पेरणी भरपूर ओल झाल्यानंतर २५ जून ते २८ जुलै या कालखंडात करावी
२) एकरी ४० किलों बियाण्याची शिफारस .
३) बियाण्या चे जर्मिनेशन ७० % होत असल्यास उत्पादन ३० % इतकेच घटते म्हणून १० किलो बियाणे जास्त वापरले जाते.
४) अश्वमेध बायोटेक किट २५० ग्रॅम जिवाणू ४० ते ५० किलो बियाण्याला चोळून नंतर पेरणी करावी.
५) पेरणीचे अंतर १८ इंच ठेवावे. त्यामुळे अंतरमशागत कोळप्याने करता येते.
बियाण्याचे समीकरण- ६७ बियांचे वजन १० ग्रॅम , १ किलो मध्ये ६७०० बिया बसतात. ४० किलो मध्ये २लाख ६८ हजार बिया बसतात. एकरी रोपांची संख्या २ लाख ६८ हजार इतकी मिळते. १०० ग्रॅम प्रति रोप उत्पादन जरी पकडल्यास २६ क्विंटल एकरी उत्पादन गणिती पद्धतीने मिळते.
जितक्या चुका होत जातात तितके उत्पादन घटत जाते. २५ ते ३० दिवस वयाचे पीक असताना एक्सपोजरची १.५ किलो प्रति लिटर फवारणी घेतल्यास उत्पादनातील घट थांबते. व १२ ते १५ क्विंटल उत्पादन सहज घेता येते.
अगदी प्रत्येक पिकात शेतकऱ्यांनी वरील प्रमाणे गणिती पद्धत वापरल्यास आणि कीड रोग नियंत्रण वेळेत केल्यास खरीपातील पिकांचे चांगले उत्पादन घेणे सोपे होईल . असे मला वाटते आपल्या शेतीत हा प्रयोग कराच.
खरीप हंगामासाठी सर्व शेतकरी बंधूंना हार्दिक शूभेच्छा.

No comments:
Post a Comment