Wednesday, 21 June 2017

नातं टिकवायचा असेल तर ...

नातं टिकवायचा असेल तर...

"सुन अशी हवी की चारचौघीत उठुन दिसावी,बायको अशी हवी संस्कारांची मुर्ती , शिक्षण तर हवच किमान पदविधर तरी ,स्वयंपाक यायलाच हवा नव्हे नव्हे माझ्या अाई सारखी सुगरणच हवी,आमच्या घरी सतत पाहुण्यांची ये जा असते तेव्हा घर निटनेटकं हवच तेव्हा होणाऱ्या  बायकोला/सुनेला घरकामाची आवड हवी, मोठ्यांचा मान राखणं कुळाचार सांभाळनं सगळं काही यायलाच हवं......
अबब !! केवढ्या ह्या अपेक्षा...मुलगी हवी की रोबोट?
अरे एखादी मुलगी चारचौघात उठुन दिसणारी नसेलही पण शिकलेली असेल तर काय हरकत आहे? एखादी घरकामात तरबेज नसेल पण इतर कला गुणांनी संपन्न असेल तर काय हरकत आहे?
दिवसभर नोकरी करून दमलेल्या तीला पाहूण्यांकडे नाही लक्ष देता आलं पण मनापासुन हसुन बोलुन वेळ प्रसंगी बाहेरून आणुन खाऊ घातलं तर काय हरकत आहे?
बरं गृहिणी म्हणुन दिवसभर घरात काम करणाऱ्या स्त्रिया घर आणि बाहेरची कामं लिलया पार पाडतात गरज असते थोडी मोकळीक आणि विश्वासाची,
रात्रंदिवस बायकोचा पान उतारा करणारे चार चार तास अमरदेवीच्या दर्शना साठी रांगेत उभे रहातात, कशासाठी हो?
कामाच्या रगाड्यातुन कधीतरी बाहेर निघालेली बायको छान साडी किंवा ड्रेस घालते तेव्हा तीच्याकडे डुंकूनही नं बघणारा नवरा ,रस्त्यावर लावलेल्या जाहीराती मधल्या मुलीचं तोंड भरून कौतुक डोळे भरून दर्शन घ्यायला आजीबातच विसरत नाहीत...
जितक्या अपेक्षा बायको कडुन करत असतो तेवढेच लायक आपणही आहोत का याचाही विचार करायला हवा... नवऱ्याने  ही करावा..
जन्मदात्याचं घर कायमचं सोडुन तुमच्या घरात येणारी मुलगी, नविन नात्यांना आपलंसं करणारी मुलगी,सासर माहेरच्या नाजुक नात्यांमधली कडी असलेली मुलगी,लाडात वाढलेली असतानाही एक उंबरठा ओलांडुन एक जबाबदार स्त्री म्हणुन नावारूपाला येणारी मुलगी,अाई वडीलांना दोष लागू नये म्हणुन स्वतःला सिद्ध करण्यासाठी धडपडणारी ही मुलगीच ,
किती रुपं किती किती रंग तीचे...
म्हणूनच की काय,निसर्गाने मातृत्वाचं वरदान तीला दिलंय,मुळात स्त्रिया सोशीक असतात,आईच्या भुमिकेत येताना त्या आणखी सहनशिल बनतात...
कोणत्याही कठिण प्रसंगी नवरा,मुलांच्या पाठीशी खंबीर पणे उभ्या रहातात,
ती कोणी चमत्कारी देवी नाही,तुमच्या सारखीच हाडामासाची बनलेलेली आहे, तीलाही वेदना होतात. मुलं जन्माला घालणं ही तर स्त्रीची शारीरिक व मानसिक पडझड होत असते..तिच्या त्रासात काळजी घ्या .दोन शब्द प्रेमाने बोला...बस् अजून काय हवंय !!
मग बघा ती वाघीण कशी उठुन उभी रहाते कुटूंबाच्या रक्षणा साठी.....

एक दार पलिकडच....!!
या लघुकथेतुन

आवडलं तर प्रतिक्रिया द्या 

No comments:

Post a Comment