Sunday, 18 June 2017

श्री आनंद कुमार

या बातमीकडे कुणाचेच लक्ष नाही।
पटना ,बिहार  येथील  *'सुपर  ३०'* हा,  श्री आनंद कुमार चालवत असलेल्या क्लास मधील सर्वच्या सर्व म्हणजे ३० विद्यार्थी IIT साठी पात्र ठरले आहेत.

पटना येथील बुद्धिवंत शिक्षक आनंद कुमार यांनी २००३ साली *सुपर ३०* क्लासची सुरुवात केली.
पहिल्याच वर्षी ३० पैकी १८ मुलं IIT साठी पात्र ठरले.
हे सर्व विद्यार्थी अत्यंत गरीब घरचे असतात.  शेत मजुर , दुकानातील कामगार ,अगदी भिकाऱ्याच्या मुलांनासुद्धा आनंद कुमार शिकवतात.
एक रुपयाही विद्यार्थ्यांकडून घेत नाहीत.
हा निवासी क्लास आहे.
आनंद कुमार यांच्या पत्नी व ईतर नातेवाईक या विद्यार्थांना स्वयंपाक करुन खायला घालतात.

त्यांनी रामानुजन स्कुल ऑफ मॅथेमँटिक्स या संस्थेची स्थापना केली व त्याच्या ऊत्पन्नावर सुपर ३० चालवतात। त्यांचे विद्यार्थी जगभर आहेत।
ते आनंद कुमार यांना देवच मानतात । ते सुद्धा देणगी देतात।

गेली नऊ वर्ष त्यांचे १००% विद्यार्थी IIT साठी पात्र ठरत आहेत। या महान व्यक्ती बद्दल आपल्याकडे फारशी माहिती नव्हती।
ओबामांनी त्यांचा एक विशेष दुत आनंद कुमार यांची भेट घेण्यासाठी पाठवला, तेव्हा ते चर्चेत आले.

श्री आनंद कुमार यांच्या कार्याला सलाम.
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

No comments:

Post a Comment