Sunday, 23 April 2017

*समर कैंप च्या निमित्ताने.*..


आता नुकतेच समर कैंप चे वारे वाहु लागले आहेत . यात dance ,sports, basic maths, yoga, drawing, personality development यासारखे उपक्रम घेण्याची तयारी चाललेली आहे.समर कैंप च्या नावाखाली काही प्रश्न स्वतः ला विचारा...

(१ )वर्षानुवर्षे लागनारी personality development अवघ्या १५ दिवसातच होनार का ?
(२ )सुरुवाती पासूनच कच्चे असलेले maths १५ दिवसातच पक्के होनार का ?
(३)  वेदपठण ,डांस हे वर्षभरच चालतात. मग १५ दिवसातच मुलांना यात पांडित्य  प्राप्त होइल  का?
(४ )पाठ आणि पोट एकच झालेल्या पोराना भर उन्हात पाठवून आणखी कुपोषित करनार का ?


*याऐवजी हे करा*....
(१)शाळेच्या धाकामुळे झोप न होणाऱ्या पोरांना निवांत सकाळी ८ पर्यंत झोपू द्या.
(२)मुलांना स्वतः जवळुन निदान दोन महिने तरी दुर करु नका.त्यांना प्रत्येक गोष्टीत सहभागी करुन घ्या.
(३) जुन्या पुरान्या पुस्तकातुन चित्र त्यांना कैची ने कापु द्या .
(४) १५ दिवसात २०००खर्च करन्यापेक्षा २०० रुपयाचे कोरे कागद,
ओतीव कागद ,रंगकांड्या, गोष्टीची पुस्तके, क्ले (माती)इत्यादी आणून, त्यांच्या पुढ्यात  टाका.
(५)घरी बिनधास्त उड्या मारू द्या,खोड्या करु द्या ,मनसोक्त बागडु द्या.
(६ )मामाचे ,मावशीचे गाव लोप पावले असले तरी चार दिवस आवश्य जाऊ द्या.
(७)रात्री घराच्या गच्चीवरच का असेना,अंथरूण टाकून रात्रीचं चांदनं न्याहाळु द्या.

आणि सर्वात शेवटी एक प्रश्न नक्कीच विचारा ..

*शेजारच्याने कैंप ला पाठवले म्हणून मी सुद्धा  पाठवले पाहिजे च का*?

No comments:

Post a Comment