Monday, 24 April 2017

ब्रँडेड औषधांच्या नावाखाली डॉक्टर लुटतात, असं ज्यांना वाटतं, त्यांनी हॉटेलात गेल्यावर मिनरल वॉटर ऐवजी नळाचं पाणीच् मागावं..
किंवा जर ड्रिंक्स घेत असाल तर ब्रँडेड दारूऐवजी 'देशी दारू' प्यावी.. दोन्हीत एकच molecule असतो.. दोन्हीही 42.8%v/v  Ethyl alcohol च् आहेत.. मग उगीच कशाला महाग महाग दारू पिऊन पैसे वाया घालवायचेत.? हो ना?

जो फरक टपरीवर भजी खाण्यात आणि मोठ्या हॉटेलात भजी खाण्यात असतो तोच फरक जेनेरिक आणि ब्रँडेड मेडिसिनमध्ये असतो.. टपरीवरची भजी स्वस्त असली चविष्ट वाटली तरी ती बनवताना raw मटेरियल किंवा तेल काय प्रतीचं वापरतात हे आपल्यालाही माहिती आहेच..

Molecule जेनेरिक आणि ब्रँडेड औषधामध्ये एकच असले तरी efficacy मध्ये प्रचंड फरक असतो .. Ceftum च्या ४ गोळ्यात इन्फेकशन कंट्रोलला येते .. पण जेनेरिक च्या १० गोळ्या घेतल्या तरी ओ की ठो फरक पडत नाही ..नंतर डॉक्टर्सच्या औषधाला गुण नाही म्हणून डॉक्टर्सनाच बडवायला मोकळे..

मुख्य raw मटेरियल काय quality चे वापरतात यावर results ठरतात .. ब्रँडेड चे raw मटेरियल युरोप किंवा इतर ठिकाणावरून आयात केलेले असते त्यामुळे महाग असते पण दर्जेदार असते, त्यात परत त्या औषधाचा research चा खर्च ऍड होतो..

सरकारने जेनेरिक ची सक्ती केल्यास sub-standard मालाची भारतात एक मोठी बाजारपेठ तयार होईल..

ज्या लोकांकडे पैसे आहेत त्यांना दर्जेदार औषधाचा लाभ का घेऊ देऊ नये ? ..ज्यांना जेनेरिक हवे, त्यांनी जेनेरिक घ्यावी .

चौकात डोसा ३० रुपयाला मिळतो .. 'वैशाली'त १०० रुपयाला मिळतो ..डोसा हा डोसा च आहे ना ? ..मग 'वैशाली'त जास्त पैसे घेऊन लोकांना लुटले जाते का? ..Qualityचा विषय पण पैशाच्या पलीकडे जाऊन असतो, हा विचार व्हावा..

बरं ..औषधांच्या किंमती सरकारच्याच नियंत्रणाखाली असतात ना? मग ४ रुपयांची गोळी ४० रुपयाला मिळते म्हणून डॉक्टर्सना शिव्या घालण्यात काय अर्थ आहे ..४० रुपये किंमत डॉक्टर्सनी ठरवलीय का ?

आणि प्रत्येक गोष्ट किंमती वरच जज् करायची झाली तर आपल्याकडे नवीन संशोधन येणारच नाही.. कारण त्याची पण किंमत कॉस्ट मध्ये add होते .. जेनेरिकची सक्ती करून लॉन्गटर्म मध्ये आपण आपले नुकसान करून घेतो आहोत..

**

तोंडाच्या अल्सर साठी Neurobion forte ही व्हिटॅमिन बी कॉम्प्लेक्स ची गोळी द्यायची असेल तरी डॉक्टरला खालील prescription द्यावे लागेल-
1.thiamine mononitrate 10 mg
2. riboflavin 10 mg
3. pyridoxine hydrochloride 3 mg
4. cyanocobalamin 15 mcg
5. nicotinamide 45 mg
6. calcium pantothenate 50 mg.

गमतीचा भाग जाऊ द्या पण जर सरकारने डॉक्टरांना जेनेरिक प्रिस्क्रिप्शन लिहिण्याची सक्ती केलीच, तर त्यात शेवटी एक ओळ आवर्जून टाकावी.

*"हे प्रिस्क्रिप्शन जेनेरिक असून रुग्णाला कुठल्या कंपनीचे, ब्रँडचे अथवा क्वालिटीचे औषध मिळेल, यावर डॉक्टरांचे काहीही नियंत्रण नसून, गुण न आल्यास कृपया औषध कंपनीशी संपर्क साधावा."*

किंवा खालील प्रमाणे consent घ्यावी..

I Dr ________, would like to inform you that I am prescribing you medicines in the generic
name  according to the guidelines of the MCI , WHO and various govt bodies etc in your best interest and to my best knowledge.
I would like to inform you that there are basically two types of  drugs manufactured one innovator or research molecule and the other group called generic drugs.
I would also like to inform you that there is one innovator drug Brand and many generic brands .
The innovator drugs are generally expensive if it is not in the essential drug  price control.
I would like to also inform you that I am not liable for the side effects ,reaction etc which these drugs may cause other than the known side effects.
I am also not liable-
For the efficacy of

No comments:

Post a Comment