यकृत बलवान करण्यासाठी निसर्गोपचार
यकृत म्हणजेच लिव्हर आपल्या प्रत्येक इंद्रियांना जी काम करण्यासाठी एन्झाइमस लागतात ती निर्माण करण्याचे काम करते. उदाहरणार्थ मेंदूला योग्य निर्णय घेण्याकरता जी एन्झाइमस लागतात ती यकृत तयार करते. म्हणून यकृताचे आरोग्य चांगले राहणे खूप महत्वाचे असते. निसर्गाने आपल्याला एवढे मोठे यकृत दिलेले आहे की त्यातील ८०% जरी निकामी झाले तरी उरलेल्या २०%च्या आधारे ती व्यक्ती जिवंत राहू शकते. यकृत हा एकमेव शरीरातील असा अवयव आहे जो स्वतःची निर्मिती स्वत: करू शकतो. म्हणजेच जर यकृताचा भाग कापून टाकावा लागला तर कालांतराने ते पूर्वी ज्या आकाराचे होते तसे पूर्ववत बनते. १५ सेंटीमीटर आकार असलेले हे यकृत १०००० हुन अधिक एन्झाइमस (वितरे) तयार करते. आपल्या शरीरात सतत काम करत असलेला अवयव म्हणजे यकृत.
असे हे यकृत तंदुरुस्त ठेवण्यासाठी निसर्गोपचारामध्ये अत्यंत सोपा आणि बिन खर्चाचा प्रयोग आहे. हा प्रयोग दिवसातून तीन वेळा करावा. जर शक्य नसेल तर दोन वेळेला करा आणि दोन वेळेला जमलं नाही तर एकदा करा परंतु हा प्रयोग नियमितपणे करा आणि तुमचा तुम्हीच अनुभव घ्या.
अनेक लिव्हर डॅमेज झालेले रुग्ण माझाकडे आले त्यांना या प्रयोगामुळे फायदा झाला आहे. आपल्याला कित्येक विकार असतात ते त्या शरीराच्या भागातील पेशींना लागणारे एन्झाइमस यकृत पुरवू न शकल्यामुळे सुद्धा असू शकतात. आता गुडघे दुखी आहे ती काही वेळा होते कारण त्यातील काही पेशी असतात त्यांचे काम असते वंगण तयार करायचं. पण ते वंगण तयार करू शकत नाहीत. जर का यकृत पुन्हा सक्षम झाले तर या पेशींना वंगण तयार करण्याकरता लागणारे एन्झाइमस त्यांना मिळू लागेल आणि गुडघे दुखी नाहीशी होईल. काहींना जमिनीवर मांडी घालून बसता येत नव्हतं त्यांना हा प्रयोग नियमित केल्याने फायदा झाला आणि ते तासंतास आता खाली बसू शकतात.
प्रयोग विधी -
आपल्या प्रत्येकाकडे फ्रिज आहे. एक हात पुसायचा जाडा टर्किश टॉवेल घ्या आणि तो पाण्यात भिजवून ओला करा. त्यातील जादा पाणी पिळून काढून टाका. हा टॉवेल आता डीप फ्रिझर मध्ये आपण पापड वाळत घालायला जसा कागद किंवा प्लास्टिक पसरवून ठेवतो तसे हा टॉवेल पसरवून ठेवा. अर्धा एक तास किंवा दोन तास (प्रत्येक फ्रिजवर अवलंबून) नंतर म्हणजेच टॉवेल मधील पाण्याचे बर्फात रूपांतर झाल्यानंतर (तो टॉवेल एकदम कडक होईल) फ्रिजमधून काढून तुमच्या पोटावर डायरेक्ट त्वचेला स्पर्श होईल असा पसरवा. पोटाचा जास्तीत जास्त भाग त्याखाली झाकला जाईल असे बघा आणि आडवे पडून रहा. टॉवेलचा थंडावा संपेस्तोवर त्याला काढू नका (जवळपास अर्धा तास). दिवसभरात कोणत्याही कालावधीत व कोणत्याही वयोगटातील व्यक्ती हा प्रयोग करू शकते. दिवसातून तीन वेळा केला तर उत्तम आहे पण किमान एकदा कराच. या प्रयोगाचे साईड इफेक्ट्स शून्य आहेत.
आता या प्रयोगाने यकृत तर बलवान होतेच पण त्या सोबत पोटाचा घेर कमी होतो वजन कमी होते हे ऐकून आश्चर्य वाटेल. हा प्रयोग तीन ते चार महिने नियमित केल्यानंतर पोटाचा घेर अडीच ते तीन इंचाने कमी झाला. याचे शास्त्रीय कारण असे आहे की शरीर शास्त्राच्या नियमानुसार संपूर्ण शरीराचे तापमान सारखेच ठेवले जाते. जेव्हा एकदम थंड टॉवेल तुम्ही पोटावर ठेवता तेव्हा तेथील तापमान कमी होते अशा वेळी मेंदूकडून सुचना मिळतात की येथील तापमान पूर्ववत आणले पाहिजे आणि म्हणून कॅलरी जाळून तेथे उष्णता निर्माण केली जाते.
- निसर्गोपचार तज्ञ डॉ अजय तायवाडे (9766371223)

No comments:
Post a Comment