Sunday, 20 May 2018

खरंच का स्त्री... चाळीशीत ( च ) सुंदर दिसते???



घरात तिचा जन्म झाला की, सोन्याची "राजस बाळी' जन्माला येते.... नन्तर तीच "कोवळी कळी' होते.... पुढं तिचं रूपांतर "कोमल कमलिनी' रती मध्ये होते..

मग कुणीतरी राजकुमार तिला लग्न करून घेउन जातो...मोरपंखी दिवसात त्याला ती जणु परीच भासते....  नवलाईत दोघे असे वागतात की ते जन्मलेच एकमेकांसाठी...!

अन ती सोनपाऊली एक दिवस आई ची प्रभावळ गाली घेऊन वावरते...  पण नवलाई ओसारलेली असते... सततचा मानसिक ताण ,  सतत काही तरी खावे वाटणे आणि मळमळ होणे, ... , नऊमहिने अडीच किलोपर्यंत वाढणारी पिशवी हातात घेऊन वावरणे शक्य आहे का ????  पण "आई बनणार' या एका कल्पनेने ती आनंदात सर्व सहन करते....पुढे मरणांत कळा  ... त्यातही नॉर्मल चा दबाव....!!!!!  अन अंती बाळाचं क्यां .... कॅ...  ती धन्य होते ..... !!!

तर जागरण अन  ती पिचून जाते....   बरेचदा या वेळी जेष्ठ मदतीला असतात असे नाही....   या वेळी मात्र तिच्या ढासळणार्या तब्येत आणि सौंदर्यावर कुणाचंच लक्ष जात नाही कारण ती तिचे कर्तव्य बजावत असते.... !!!!!


हळूहळू मुले मोठी होतात.... तिचं तेल लावणं ,makeup करणं , ब्रँडेड कपडे घालणं  , सण समारंभात मुरडण सारं सारं बंद होतं ... अन अचानक ती सर्वांना " गबाळी  ...'  भासू लागते. तरीही ती त्याकडे लक्ष देत नाही कारण तिचं मातृत्व तिला तसं करू देत नाही...  अजूनही तिला मुलांची  जबाबदारी असते....!!!!


हळूहळू पुरुषवर्गाला अशी गबाळी बायको माहेरी जाण्यात सुख वाटू लागत....   तिचं साधेपणही खुपायला लागतं..

.काही मंडळींना इतर बायका सुंदर वाटायला लागतात... अन कर्तव्य बजावणारी बायको आणि मुक्त फिरणाऱ्या बायका यात तुलना सुरू होते...   
पण तरीही ती याकडे दुर्लक्ष करून मुलांच्या वाढीवर लक्ष केंद्रित करते... आतून ती मनाला काळजीने स्वतः च वाळवी बनुन पोखरत असते....     !!

आणि तिची पस्तिशी उलटते अन अचानक ती अतिशय सुंदर भासू( ?)  लागते.... तिचे टॅलेंट नजरेत दिसू लागते.., तिचं आधुनिक राहणीमान , सुरेख hairstyle , नितळ त्वचा , मनमोकळं हसणं  , वागणं ,घरातला सहज सुंदर वावर.., विविध स्पर्धा जिंकणं , रेसिपीत आवड निर्माण करणं,   सर्वात मिसळण्याची कला ... सार सारच सुंदर वाटू लागतं..! 

पण खरंच ती चाळिशीतच।  सुंदर दिसते का???? 

खरं तर सगळ्या जबा बदार्या पार पाडताना होणारी फजिती कमी होते,  बाळाच्या शी शु तुन ती मुक्त होते ... 

सारं गेलेलं आयुष्य नव्याने उभारण्याची इच्छा जागृत होते ... अन मनापासून तिला स्वतः साठी जगावस वाटतं...!!! पुनः तरुण व्हावे असे वाटते...

आपण गबाळी , गावंढळ कधीच नव्हतो फक्त कर्तव्य पार पाडायला प्राधान्य दिले होते, हे कळून चुकले अन तिने" कात '  टाकली .

 इतकं सहज सोपं गणित आहे ते.. मला वाटतं .
.नवं  स्त्री जातक बाळ ते वयस्कर आजी सर्वच सुंदर असतात ...

 होतो तो आजूबाजूच्या दृष्टीकोनात बदल ...!

कॉलेज ची अल्लड तरुणी सुंदर नसते का??

 पतींची वाट बघत असणारी घायाळ हरिणी सुंदर नसते का???

चंदेरी बट  सावरीत अन तोल जाऊ नये म्हणून तुरुतुरु चालणारी आजीबाई सुंदर नसते का???   

झाडाला फुल येण्यासाठी सुद्दा काही काळ जाऊ द्यावा लागतो ..

 मग इतक्या प्रचंड बदलातून जाणारी स्त्री एका रात्रीत कशी बर बदलेल??? 

आणि

 तिने स्वतः च्या दिसण्यावरच भर दिला तर बाळाचं संगोपन तितके चांगले होइल का??

म्हणून च बायको गेली माहेरी वगैरे फालतू , रिकामटेकडे जोक्स तर तिच्या बाईपणाचाच अपमान आहे...

 त्यातून महिण्याला कमी होणारे कॅलसियम, hermonal changes अन बदलते mood सांभाळून ती बदलून घेते स्वतःला ...

मग आपण ही तिला साथ देऊन, वेळ देऊन ,तिच्या मातृत्वाला किंमत देऊन स्वतःला बदलून घेतले तर संसार आनंदात होईल यात वाद नाही...

तिचा आत्मविश्वास वाढलेला असतो म्हणून ती या वयात छान दिसते .


. पण दृष्टी स्वच्छ असेल तर ती all time smart दिसते

No comments:

Post a Comment