लहानपणी सक्तीने एरंडेल पाजले जायचे.
बुळबुळीत लागले तरी गिळावे लागायचे.
नंतर लोटापरेड होणे अनिवार्य असायचे.
आज उतारवयातही पचनशक्ती उत्तम आहे
*त्या एरंडेलाचे महत्त्व आता जाणवतेय (१)*
लहानपणी पाढे तोंडपाठ करावे लागायचे.
कविता, श्लोक घोकावेच लागायचे.
सणावळ्यांनाही विशेष महत्त्व असायचे.
आज उतारवयातही स्मरणशक्ती उत्तम आहे.
*त्या पाठांतराचे महत्त्व आता जाणवतेय (२)*
लहानपणी शाळेत पायी जावे लागायचे.
कॉलेजसाठी सायकलशिवाय वाहन नसायचे.
सगळे खेळही भरपूर धावपळीचे असायचे.
आज उतारवयातही अंगकाठी सडसडीत आहे.
*त्या पायपिटीचे महत्त्व आता जाणवतेय. (३)*
लहानपणी जेवणात आवड-निवड नसायची.
वरण, भात, भाजी, पोळी खावीच लागायची.
ताजे ताक, फोडणीच्या पोळीचीही सक्ती व्हायची.
आज उतारवयातही भूक, बीपी, शुगरचा त्रास नाही.
*त्या चौरस आहाराचे महत्त्व आता जाणवतेय. (४)*
लहानपणी तिन्हीसांजेला सायंप्रार्थना असायची.
पंधरावा अध्याय म्हणायची सक्ती व्हायची.
रामरक्षा, भीमरूपीपासून तर सुटकाच नसायची.
आज उतारवयातही मन अत्यंत निर्भय आहे.
*त्या भीमरूपीचे महत्त्व आता जाणवतेय. (५)*
लहानपणी खोटे बोलायची शामत नसायची.
फुकटचे काही घेतले तर शिक्षाच व्हायची.
उधारी-उसनवारी लाजीरवाणी वाटायची.
आज उतारवयातही स्वाभिमानाने जगतो आहे.
*त्या शिकवणीचे महत्त्व आता जाणवतेय. (६)*
लहानपणी अभ्यास स्वतः करावा लागायचा.
ट्यूशन, गाईड, कॉपीचा तर विटाळच असायचा.
कमी मार्क मिळाल्यावर मार खावा लागायचा.
आज उतारवयातही बुद्धी भ्रष्ट झाली नाही.
*त्या स्वाध्यायाचे महत्त्व आता जाणवतेय. (७)*
लहानपणी मोठ्यांचा मान राखावा लागायचा.
उलट उत्तर देण्याचा तर प्रश्नच नसायचा.
मग रागावलेला माणूसही आशीर्वाद देऊनच जायचा.
आज भरल्या घरात अत्यंत सन्मानाने राहतोय.
*त्या संस्कारांचे महत्त्व आता जाणवतेय. (८)*
लहानपणी शिस्तीसाठी आईचा धपाटा खाल्ला.
किशोरवयात त्यासाठीच वडिलांकडून खाल्ला.
शाळेत प्रत्येक चुकीला शिक्षकांकडूनही खाल्ला.
आज उतारवयातही शिस्तबद्ध जीवन जगतोय.
*त्या खाल्लेल्या माराचे महत्त्व आता जाणवतेय. (९)*
लहानपणी एकत्र कुटुंबपद्धती असायची.
घरोघरची आई 'श्यामची आई' च असायची.
वडिलांची करडी नजर प्रेमापोटीच असायची.
आज त्याची उणीव ठायीठायी जाणवतेय.
*त्यांच्या वात्सल्याचे महत्त्व आता जाणवतेय (१०)*
लहानपणी वाढदिवस साधेपणाने साजरा व्हायचा.
एखादेच चॉकलेट, पण मोठ्यांचा आशीर्वाद मिळायचा.
आई-बाबा- आजी-आजोबांचा हात मस्तकावरून फिरायचा.
आज अमृतमहोत्सवाकडे आरामात वाटचाल करतोय.
*'आयुष्मान भव' चे महत्त्व आता जाणवतेय. (११)*
ही पोस्ट कोणाची आहे, त्यांनी नाव दिले नाही. मला आवडली म्हणून पोस्ट केली आहे.

No comments:
Post a Comment