🔭 *वैज्ञानिक दृष्टिकोन* 🔭
*मन मनाचे आजार: भूताने झपाटाणे, देवीचे अंगात येणे*
*एक खरेखुरे नाटक*
*अ २)अंगात येणे - हिस्टेरिकल डिसोसिएशन*
आपल्या समाजात देवदेवस्कीच्या नावाने भगत, मांत्रिक, देवऋषी हा धंदा करणारे स्त्री अथवा पुरुष या वास्तवाचा फायदा उठवतात आणि स्वतःच्या अंगात देवीचा संचार झाला आहे असे भासवतात. त्याचप्रमाणे मनोरुग्णतेच्या कारणाने घुमणाऱ्या व्यक्तीस बाहेरची बाधा झाली आहे असे सांगून लोकांची दिशाभूल करतात. दोन्ही प्रकार हे फसवणुकीचे व शोषणाचे आहे. ज्या ठिकाणी या प्रकारातून पद्धतशीरपणे धंदा उभा राहिला आहे त्या ठिकाणी हा प्रकार फसवणुकीचा आहे याची कल्पना देणे आणि त्याविरुद्ध लोकजागृती करणे, संघर्ष करणे व ढोंगबाजी बंद पाडणे हेच करावे लागते. हे प्रकार हल्ली बरेच कमी झाले आहेत अथवा कमी होत चालले आहेत.
बहुतेक वेळा अंगात येण्याचे कारण काय असते ? एक बाब म्हणजे अनेक काळापर्यंत मनात ताण साठत गेलेले असतात व व्यक्तीला अस्वस्थ करत असतात; किंवा काही वेळेस एखाद्या विशिष्ट प्रसंगी प्रचंड ताण निर्माण होतो, जो मनाचे तात्पुरते विघटन करतो. हे असे का घडते, हे समजून घेण्यासाठी तुडुंब भरलेल्या धरणाचे रूपक वापरता येईल. प्रचंड पावसाने धरण पूर्ण भरते; त्यामध्ये आणखी पाणी साठविण्यासाठी जागा राहत नाही. अशा वेळेला धरणाचे दरवाजे उघडावे लागतात. पाणी बाहेर सोडावे लागते. अन्यथा पाण्याच्या प्रचंड दबावाने धरण फुटण्याचा धोका असतो. याचप्रकारे व्यक्तीच्या मनातील दुःखाचे धरण पूर्णपणे भरते. आपल्या देशात ही प्रक्रिया स्वाभाविकपणे स्त्रियांच्या बाबतीत अधिक होते. अनेक प्रकारचे दुय्यमत्व, असुरक्षितता यांना त्यांना सामोरे जावे लागते. बहुतेक वेळेला जे वाट्याला येते ते निमूटपणे सोसावे लागते. त्या दुःखावर उपाय शोधणे व तो प्रत्यक्षात आणणे यांसाठी लागणारी क्षमता त्यांच्याकडे नसते. स्वाभाविकच दुःखाने भरलेल्या मनातील धरणाला वाट मोकळी करून देण्याचा प्रश्न येतो. ज्यावेळी देवी अंगात येते त्यावेळी मनातले हे ताणतणाव, राग, संताप बाहेर टाकले जातात. ते देवी अंगात येऊन घडते का मृतात्म्याच्या भूताने पछाडल्यामुळे घडते, हे तुलनेने गौण आहे. परंतु जागृत अवस्थेत जे कधीच बोलता आले नसते, तो नवरा किंवा सासू यांच्यावरील संताप, अंगात आलेल्या या अवस्थेत व्यक्त होतो. अजाणतेपणे अबोध मनाच्या पातळीवर हे घडते. दुःखाने तुडुंब भरलेल्या मनाच्या धरणातील प्रचंड दाब निर्माण करणारा ताण अंगात येण्याच्या प्रकाराने काहीसा कमी होतो. त्या दबावाखाली तुटू पाहणारे व्यक्तिमत्त्व अंगात येणे, घूमणे, बडबडणे या प्रक्रियेतून स्वतःला सावरते.
मानसशास्त्रीय भाषेत या प्रकाराला कॅथॅर्सिस असे म्हणतात. या प्रक्रियेतून मर्यादित प्रमाणात ताणाचा निचरा होतो आणि मनाला स्वतःला सावरून घ्यायला सवड मिळते. या स्वरूपाची गरज उघडपणे आपल्या देशात स्त्रियांना सर्वाधिक असते, म्हणून त्यांच्या अंगात जास्त येते.
*क्रमश:*
*तिमिरातुनि तेजाकडे* या पुस्तकातून

No comments:
Post a Comment