Sunday, 20 May 2018

अनेकदा आपण जेव्हा डॉक्टरकडे जातो तेव्हा डॉक्टर आपल्याला जीभ दाखवायला सांगतात*.

कधी तुम्ही हा विचार केला आहे का की तुमची जीभ पाहुण डॉक्टरला आजाराचं निदान कसं होत असेल. पण आम्ही तुम्हाला आज ही गोष्ट सांगणार आहोत की का डॉक्टर जीभ बघतो.

*जीभचा रंग हा तुमच्या शरिराच्या स्थितीचा अंदाज सांगतो. पाहा काय आहे जीभेच्या रंगामागचं खरं कारण. काय सांगते तुमची जीभ*

१. *गुलाबी रंग* - गुलाबी रंगाची जीभेवर जर कोणत्याही प्रकारचे डाग नसतील तर तुम्ही पूर्णपणे व्यवस्थित आहात.

२. तुमच्या जीभेवर जर सफेद रंगाचा थर असेल तर तुमच्या पचन क्रिया व्यवस्थित नाही. तुमच्यात अशक्तपणा आहे. काही वेळेस हे वायरल इंफेक्शनचा ही प्रकार असू शकतो.

३. *पिवळा रंग*- पिवळा रंग सांगतो की तुम्हाला सर्दी, वायरल इंफेक्शन किंवा तुमच्या शरिरात हिट वाढली आहे. काही वेळेस हा पचन न होण्याच्या समस्येचंही संकेत देतो.

४. *लाल रंग* - लाल रंगाची जीभ ताप, रक्तात उष्णता वाढणे किंवा अंतर्गत जखम आणि इंफेक्शनचं संकेत देते.

५. *कोरडी जीभ* - जीभ कोरडी पडणे आणि पिवळी पडणे म्हणजे काविळ, अशक्तपणा, कमी झोप, आतड्यांना सूज थकवा याचे संकेत देते.
अधिक वाचा
जीभेची कशी घ्याल काळजी?

६. *निळा रंग* - शरिरात विटामिन बी-2 ची कमतरता आणि महिलांना दुखणे याचा संकेत देते. कोणत्याही औषधाच्या साईड इफेक्टमुळे देखील जीभ निळी पडते.

७. जीभेचा सर्वात पुढचा भाग लाल होणं हा मानसिक समस्येचं संकेत देतो.

८. जीभेछ्च्यावर अनेकदा सफेद डाग तयार होतात हे इंफेक्शन आणि अधिक घाम येण्याचे संकेत असतात.
🌺🌼🌺🌼🌺🌼🌺🌼🌺🌼🌺

 *टवटवीत त्वचा मिळवण्यासाठी ही १० फळे आणि भाज्या खा !*

 आजकालच्या धकाधकीच्या जीवनात आपल्याला आपल्या त्वचेकडे लक्ष द्यायला वेळ मिळत नाही. त्यात प्रदूषणामुळे, तणावामुळे त्वचा खराब होते. त्यामुळे त्वचेचे आरोग्य सुधारण्याचा सर्वोत्तम उपाय म्हणजे पोषक आहार होय. त्यासाठी आपल्या आहारात ही १० फळे व भाज्या असणे आवश्यक आहे.

*आवळा*

फायदे –
आवळा व्हिटॅमिन ए ने परिपूर्ण असून तो त्वचा टवटवीत दिसण्यासाठी आवश्यक असणारे कोलॅजेन वाढवण्यास मदत करतो.
उपाय –
सकाळी रिकाम्या पोटी आवळ्याचे सरबत पिणे हा आवळा खाण्याचा सर्वोत्तम मार्ग आहे. यामुळे कोलॅजेन घटण्याचे प्रमाण कमी होते. ( त्वचेची कांती आणि केसांचे सौंदर्य वाढवणारा गुणकारी ‘आवळा’! )

*सफरचंद*

फायदे –
दररोज एक सफरचंद खाल्ले तर नक्कीच तुम्ही अकाली वृद्ध दिसणे लांबवू शकता. यातील व्हिटॅमिन सी मुळे त्वचा आरोग्यदायी होऊन त्वचेला अकाली सुरकुत्या पडण्याचे प्रमाणही कमी होते.
उपाय –
टवटवीत त्वचा मिळवण्यासाठी तुम्ही दररोज एक सफरचंद खा. याशिवाय तुम्ही त्याचा फेसपॅक म्हणूनही वापर करू शकता. सफरचंदाचा गर चेहऱ्याला लावून १० मिनिटांनी चेहरा धुवावा.

*बीट*

फायदे –
बीट खाल्याने शरीरातील अँटिऑक्सिडेंटचे प्रमाण वाढते. तुमच्या शरीरात जर अधिक अँटिऑक्सिडेंट असतील तर तुमची त्वचा अधिक टवटवीत दिसते. बीट हा अँथोसायानीनचा महत्त्वपूर्ण स्रोत आहे. यातील अँटिऑक्सिडेंट या घटकामुळे त्वचेला सुरकुत्या पडत नाहीत. बीट खाल्याने तुमची कांती उजळून त्वचेला टवटवीतपणा प्राप्त होतो.
उपाय –
कच्चे बीट पचनास जड असते. त्यामुळे बीट उकडून त्याचे काप करून खावेत. त्यावर लिंबू पिळून खाल्ले तर त्याची चवही छान व आरोग्यही सुधारते. बीट ओठांना लावले तर ओठ गुलाबी होतात.

*गाजर*

फायदे –
गाजरामध्ये मोठ्या प्रमाणात बीटा कॅरोटिन असते. त्यापासून शरीराला व्हिटॅमिन ए मिळते. त्यामुळे तुमच्या दररोजच्या आहारात गाजराचा समावेश असणे अत्यंत आवश्यक आहे. यामुळे तुमची त्वचा टवटवीत होण्याबरोबरच त्वचेचा सुरकुत्यांपासून बचाव होतो आणि त्वचा आरोग्यदायी होते.
उपाय –
तुम्ही गाजर सलाडमध्ये घालून किंवा त्याचे काप सँडविजमध्ये घालूनही खाऊ शकता. गाजराच रस प्यायल्याने त्यातील फायबरमुळे आपल्या सौंदर्यात भर पडते.

*लिंबू*

फायदे –
त्वचेवर चट्टे, पुरळ किंवा ब्लॅहेड्स असतील तर त्वचा निस्तेज दिसते. पण लिंबामुळे या सर्व समस्यांपासून आपला बचाव होतो. लिंबातील व्हिटॅमिन सी मुळे कोलॅजेनचे प्रमाण अनुकूल राहण्यास मदत होते.
उपाय –
एक ग्लास कोमट पाण्यामध्ये लिंबू पिळून ते पाणी सकाळी अनोशा पोटी प्यावे. यात तुम्ही एक चमचा मध घालूनही पिऊ शकता. किंवा सलाडवर लिंबू पिळून खाऊ शकता. मध, लिंबूपाण्याचे जादुई गुणधर्म तुम्हांला ठाऊक आहेत का?

*भोपळ्याच्या बिया*

फायदे –
एक मूठभर भोपळ्याच्या बिया खाणे हा त्वचेचा रंग उजळण्याचा खात्रीशीर उपाय आहे. या बीयांमधील झिंकमुळे नवीन त्वचापेशी निर्माण होण्यास मदत होते. तसेच यामुळे त्वचेचे तेलकटपाणापासूनही संरक्षण होते.
उपाय –
संध्याकाळच्या वेळी नाश्त्याला एक मूठभर भोपळ्याच्या बिया खाव्यात. तुम्ही आमटीवर सजावटीसाठी या बियांचा वापर करू शकता किंवा सँडविजमध्येही या बिया घालून खाऊ शकता.

*पालक*

फायदे –
पालकामधील अँटिऑक्सिडेंटमुळे त्वचेचा सुरकुत्या पडण्यापासून बचाव होतो. तसेच त्वचेच्या उती मजबूत होण्यास मदत होते. यातील दाहशामकतेमुळे शरीरातील विषारी घटक बाहेर पडून त्वचा नितळ आणि टवटवीत होते.
उपाय –
शिजवलेला पालक सलाडमध्ये घालून खातात किंवा त्याची भाजीही बनवतात. त्वचा आरोग्यदायी राहण्यासाठी पालकाचा रस अतिशय उपयुक्त आहे.

*स्ट्रॉबेरी*

फायदे –
स्ट्रॉबेरीमधील मॅलिक अॅसिड हा नैसर्गिक व्हाईटनिंग एजंट आहे. स्ट्रॉबेरीमध्येही अँटिऑक्सिडेंट ङा घटक असल्यामुळे त्वचा निरोगी राहते.
उपाय –
मूठभर स्ट्रॉबेरी खा किंवा स्ट्रॉबेरीची पेस्ट करून त्यात दही आणि मध घालुन हे मिश्रण चेहऱ्याला १० मिनिटे लावून ठेवा आणि धुवा. तुम्ही तुमच्या स्मूथीमध्येही स्ट्रॉबेरी घालून पिऊ शकता.

*रताळे*

फायदे –
रताळ्यामध्ये व्हिटॅमिन ए असल्यामुळे ते मुरुमं निर्माण करणाऱ्या जीवाणूंचा नाश होण्यास मदत करते. व्हिटॅमिन सी च्या अस्तित्वामुळे त्वचेचा रंग उजळतो आणि मुरुमांमुळे पडलेले डाग जाण्यास मदत होते.
उपाय –
केवळ उपवासालाच नव्हे तर मधल्या वेळी भूक लागल्यावरही म्हणून तुम्ही रताळे खाऊ शकता. रताळे उकडून त्यावर मीठ, काळी मिरी व लिंबाचा रस रस पिळून खाऊ शकता. आरोग्यदायी त्वचा मिळवण्यासाठी रताळे खावे. रताळे पिकवण्यासाठी जास्त मेणाचा वापर केला असेल किंवा ते खूप चमकदार दिसत असेल तर त्याची साल काढून खावे.

*टोमॅटो*

फायदे –
टोमॅटोमध्ये लायाकोपीन नामक अँटिऑक्सिडेंट असते. त्यामुळे तुमची त्वचा आरोग्यदायी राहण्यास मदत होते. तसेच टोमॅटो सनस्क्रीन लोशन म्हणूनही काम करतो. टोमॅटो आम्लधर्मीय (अॅसिडीक) असल्याने त्याचा गर त्वचेतील छिद्रे बुजवून मुरुमांपासून संरक्षण करतो.
उपाय –
भारतीय लोकांच्या दररोजच्या आहारात टोमॅटोचा समावेश असतो. काही पदार्थांमध्ये त्याचा गरही वापरला जातो. कच्चा टोमॅटो खाणे आरोग्यदायी असते. टोमॅटोचा गर तुम्ही चेहऱ्यालाही लावू शकता.

No comments:

Post a Comment