भारतात विम्याची परस्तिथी काय आहे व आपण भारतीय कोणत्या गोष्टीला जास्त महत्व देतो.थोडक्यात *1) आपण आपल्या पाल्यांकरीता सोनं घेऊन ठेवतो त्यांचे शिक्षण आणि लग्न याचा विचार करतो पण मुलांच्या साठी विमा घेत नाही ? 2)आपण फक्त विमा एजंट नाव ऐकून घाबरतो किंवा त्याला टाळण्यासाठी प्रयत्न करतो व आपण स्वतः चे व आपल्या परिवाराचे प्रोटेक्षण(कवच) कशात आहे ते पहात नाही. 3)भारताची लोकसंख्या 130कोटी आणि फक्त 20कोटी लोकांनी विमा घेऊन स्वतःचे व कुटुंबातील सदस्यांचे संरक्षण केले आहे. 4)आपण भारतीय आपल्या 10 हजाराच्या मोबाईल फोनसाठी स्किन कवच(screen guard) बसवतो पण आपली स्वतःची 10 कोटी पेक्षा ही जास्त असलेल्या किमतीला समजून घेत नाही . 5) आपण आपल्या लाडात वाढवलेल्या मुलीचे लग्न अनोळखी माणसासी लावुन देतो ओळखीच्या विमा प्रतिनिधी कडून स्वतःचे विमा संरक्षण किती पाहिजे हे साध ऐकून घेत नाही हे खरे दुर्दैव आहे. 6) आपण सर्वजन मग तो धर्माचा असो भगवत गीता,कुराण ,बायबल ....ह्या सर्वांवर डोळे झाकून विश्वास ठेवतो . पण आयुष्यात एक सत्य आहे व ते अटळ आहे ते म्हणजे आपण ह्या विश्वाचा एक दिवस निरोप घेणार ह्यावर आपला विश्वास नाही. 7)आपण कोठे मंदिरात गेलो तर 5 रूपये देऊन आपले चपल किंवा बुट सुरक्षित ठेवतो, पण स्वतःचे व आपल्यावर अवलंबून असणाऱ्या संपुर्ण कुटुंबासाठी दिवसाला 50रुपये ठेवू शकत नाही .म्हणजे आपले आयुष्य पादत्राना एवढी देखिल नाही. 8)आपण बाबा, बुवा याच्यावर लगेच डोळे झाकून विस्वास ठेवतो पण एखादा विमा सल्लागार तुमच्या कुटुंबासाठी भविष्यात येणाऱ्या परस्थितीची जाणीव करून द्यायला व तुम्हाला विम्याची किती गरज आहे व तो किती असावा हे सांगावयास आलेला असतो. 9)आपण सरकारी नोकरदाराना त्यांच्या मिळणाऱ्या पेन्शनचा हेवा करतो पण आपण तरुणपणी किंवा पैसे कमवत असताना दर महिन्याला जर थोडे थोडे पैसे पेन्शन पॉलिसीमधे गुंतवणूक करीत गेलो तर आपण आपल्या आयुष्यभराची पेन्शनची तरतूद करू शकतो. 10)जागतिक सरवेनूसार दर दिवशी रात्री झोपी गेलेली 10 हजार लोकं सकाळी गजर ऐकू शकत नाहीत ह्या 10 हजारामधे कोणाचा नंबर हे आपल्याला माहीत नाही हे लक्षात ठेवा की आगीचा बंब घंटा वाजवत येतो पण वाईट वेळ कधी व कोणावर हे कधी सांगुण येत नाही. 11) आपण आपल्या घरी विज (लाईट)गेली तर इनव्हरटरची सोय करून ठेवतो किंवा मेणबतीची सोय करतो कमीत कमी घरात थोडा प्रकाश होईल विमा पॉलिसी हे सुध्दा तुमच्या कुटुंबाला आयुष्याच्या येणाऱ्या अंधारात मेणबतीची जागा घेवू शकत . 12)जेंव्हा आपण ह्या जगात नसनार त्या वेळी मी घेतलेला विमा माझ्या कुटुंबासाठी त्यांच्या पुढील आयुष्यात ऊपयोगी येईल. 13)तुम्हाला तुमच्या मोबाईलचा बँलस माहिती आहे तुमच्या बँकेचा बँलस माहिती आहे, डेबिट ,क्रेडीट कारड्चा पण बँलस माहिती आहे*, पण तुमच्या स्वतःच्या आयुष्याचा बँलस माहिती नाही म्हणून विमारुपी बँलसचा रिचार्ज करा आणि बिंधास्त जगा ....
No comments:
Post a Comment