Friday, 15 September 2017

आस्तिक किंवा नास्तिक हा प्रत्येकाच्या वैयक्तिक विषय आहे,
तरी डोळसपणे विचार पुर्वक सत्य काय आहे हे जाणून घ्या....
~~~~~~~~~~~~~
👇 👇 👇 👇 👇 👇 👇 👇 👇
०१) माणुस सोडुन एकही प्राणी देव मानत नाही.

०२) जिथ माणुस नाही पोहचला तेथे मंदिर, मस्जिद किंवा चर्च नाही सापडले.

०३) वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या देवता आहेत याचाच अर्थ मानवाला जसी कल्पना सुचली तसा देव तयार झाला.

०४) जगात अनेक धर्म व पंथ व स्थानीक देवता आहेत याचाच अर्थ देव सुद्धा एक नाही.

०५) सातत्याने नव नवीन देव तयार होत आहेत......

०६) वेगवेगळ्या प्रार्थना आहेत....

०७) "मानला तर देव नाही तर दगड" ही म्हण उगीचच नाही तयार झाली.

०८) "तीर्थी धोंडा पाणी देव रोकडा सज्जनी" हे संत वचन

०९) जगातील देवतांचे वेग वेगळे आकार व त्यांना प्रसन्न करण्याच्या वेगवेगळ्या पुजा

१०) आतापर्यंत ठाम पणे मला देव भेटला असे कुणी सांगु शकला नाही आणि याचा प्रत्यक्ष पुरावाही देऊ शकला नाही.

११) देव मानणारा व न मानणारा ही सारखेच आयुष्य जगतो

१२) देव कुणाचेच काहीही भले वा वाकडे करू शकत नाही

१३) देव कोणताही भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचार, चोरी, बलात्कार, आतंकवाद, अराजकता रोखू शकत नाही.

१४) लहान, निष्पाप बालकांवर गोळ्या घालणाऱ्यांचे हात धरू शकत नाही.

१५) मंदिर, मठ, आश्रम, प्रार्थना स्थळे व देवांचे वास्तव्य ज्या ठिकाणी मानले जाते त्या ठिकाणी सुद्धा बालके, स्त्री सुरक्षीत नाहीत.

१६) मंदीर मस्जिद व चर्च पाडताना देव एकदाही आडवा आला नाही की बांधताना नगर पालीकेची परवानगी घेतली नाही.

१७) अभ्यास न करता एकाही देवाने विद्यार्थ्याला पास केल्याचे आठवत नाही.

१८) केदारनाथ मध्ये एकाच वेळी १०००० लोक मेली, वर्षानुवर्षे मक्का मदिनेत चेंगरा-चेंगरी होऊन हजारो लोक मेलेत. एकालाही त्याने वाचवले नाही.

१८) ब-याच देवांचा २५ वर्षापुर्वी मागमुसही नव्हता ते प्रख्यात देव झाले आहेत.

१९) स्वतःस भगवान म्हणून घेणारे सध्या जेलची हवा घेत आहेत, का त्यांना भगवान बाहेर काढत नाहीत ?

२०) जगात २५० कोटी लोक देवच मानत नाहीत तरी ते समाधानाने व आनंदाने रहात आहेत.

२१) हिंदु अल्लाला मानत नाही, मुस्लीम देवाला मानत नाही, ईसाई देव व अल्लाला मानत नाही, हिंदू मुस्लिम गॉड मानत नाही तरीही कोणत्याही देवाने एकमेकांला विचारले नाही की असं का ?

२२) एक धर्म म्हणतो त्याला आकार नाही दुसरा त्या देवाला आकार देवुन फॅन्सी कपडे घालतो तिसरा वेगळच काही तरी सांगतो म्हणजे नेमके चाललय तरी काय या देशात ?

२३) देव आहे तर लोक धाक का पाळत नाहीत ?

२४) समाजात घातक गोष्टी का करतात ?

२५) जो मांसाहार करतो तोही जगतो, नाही करत तोही जगतो, आणि जो
दोन्हीही खातो तोही जगतोच की....

२६) निरपराधांची हत्या होते , स्त्रीयांचे - मुलींचे बलात्कार होतात तेव्हा देव कुठे असतात ?

२७)आपल्या कडे ३३ कोटी पेक्षा अधिक देवी - देवता, आधिक महाराज आधिक अल्लाह आधिक गॉड अधिक संत, महंत यांचा अक्षरशः ऊत आला आहे तरी पाऊस नाही,गरीबीपासुन मुक्ती नाही, शेतक-यांच्या आत्महत्या कमी नाहीत, बलात्कार कमी नाही, रोगराई कमी नाही, भ्रष्टाचार कमी नाही.
'देव-देवतांच्या पुजा करण्यापेक्षा महापुरुषांचे  विचार मनात रुजवले पाहिजेत.'
या सर्व बाबी वरून लक्षात येते की माणसाला देवाचा धाक नाही उलट देवच घाबरलेले आहेत कारण देवाचा निर्माता मानवच आचारसंहिता पाळत नाही. बिच्चारे देव तरी काय करणार,

यावर उपाय एकच....

प्रयत्नवादी बना, विज्ञानवादी बना.
आणि
सर्वांत महत्वाचे....
नेहमी सत्यावर विश्वास ठेवा
🙏🏻सत्यमेव जयते🙏🏻

No comments:

Post a Comment