महासत्तेच्या आकांक्षांना *अविवेकाचं ग्रहण!*
🌜🌚🌝🌞🌛
परवा मध्यरात्री *भारत गाढ झोपी जाताना* तिथे अमेरिकेत सूर्यग्रहण सुरू झालं होतं. इंटरनेटच्या माध्यमातून आपल्यातल्या काही लोकांनी ते इथे बसून पाहिलं. पण, या गेल्या दोन तीन दिवसांत अमेरिकन लोकांनी सोशल मीडियावर ज्या पद्धतीने या ग्रहणाची चर्चा सुरू केलीये ते पाहून खरंच त्यांचा हेवा आणि कौतुक वाटतं.
अमेरिकेच्या बऱ्याचश्या भागांतून हे ग्रहण पाहिलं गेलं. काही ठिकाणी या ग्रहणाची कंकणाकृती दिसली. रस्त्यांवर, इमारतींवर, विमानांतून, पहाडांवरून... जिथे असेल तिथे लोकांनी खऱ्या अर्थाने ग्रहण एन्जॉय केलं. काही ठिकाणी तर ग्रहण काळात बियर पार्ट्याही झाल्या. शेकडोंनी लोक तिथे ग्रहणाचा आस्वाद घ्यायला जमले. काही कंपन्यांनी तर त्यांच्या कामगारांना ग्रहणकाळात बाहेर जाऊन ग्रहण पाहण्याची सूट दिली. मॅक्डोनाल्डसारख्या कंपन्यांनी "आमच्या कामगारांना ग्रहण पाहता यावं म्हणून या या वेळेत कोणत्याही ऑर्डर स्वीकारल्या जाणार नाहीत" अशी सूचना लावली. त्यावर कोणीही आक्षेप नोंदवला नाही. अमेरिकन राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी व्हाईट हाऊस मध्ये उभं राहून विनाचश्मा ग्रहण पाहिलं म्हणून त्यांच्यावर टीका झाली, त्यांचे मिम्स बनले. नासाने तर काल प्रसिद्ध केलेल्या काही फोटोजने इंटरनेटवर धुमाकूळ घातलाय.
हे रामायण इथे लिहिण्याचं कारण काय? तर आपल्याकडे निसर्गाच्या या आश्चर्यादरम्यान असलेली अक्षम्य उदासीनता. मला आठवतंय मी शाळेत असताना साधारण दुपारच्या वेळेस भारतात खग्रास ग्रहण झालं होतं. मुंबईत त्याची खंडग्रास आकृती दिसणार होती. माझ्या मनात त्याविषयी प्रचंड उत्सुकता होती. पण, एकंदरच शाळेत आजूबाजूच्या कोणालाही त्याची काहीच पडली नव्हती. वर्गातून काहीतरी एक्स्क्यूज देऊन मी टॉयलेटमध्ये गेलो होतो. खिशातला रुमाल डोळ्यासमोर पकडून पाहिलेली सूर्याची ती आकृती आजही आठवते. दुःखद बाब अशी की भूगोलात शिकलेल्या या घटना प्रत्यक्षात पाहण्याची संधी असूनही आम्हाला दाखवण्याची तसदी कोणी घेतली नाही.
पण ती घेणार तरी कशी? आमच्याकडे ग्रहण आलं की टीव्हीवर येणाऱ्या बातम्यांमध्ये आमची मानसिकता दिसते. "आजच्या ग्रहणाचा कोणत्या राशीला धोका?", कोणत्या काळात भाज्या कापू नयेत?", "गरोदर महिलांनी ग्रहण काळात घरात बसावं की नाही बसावं, याविषयी दा. कृ. सोमण काय म्हणतात?", "बाई देवळात किंवा घरात बसणार असेल, तर तिने कोणत्या देवाची आराधना करावी?", "ग्रहण संपल्यावर कशी आंघोळ करावी?" या आणि अश्या अनेक प्रश्नांनी आमच्या टेलिव्हिजन स्क्रीन्स गोंगाट करत असतात. पूर्वीच्या काळात तर म्हणे ग्रहण संपल्यावर महापालिका लोकांना पाणीपुरवठा करत असे. आजही ग्रहण संपलं की घरातलं 'जुनं पाणी' फेकून देऊन 'नवीन पाणी' भरणारे काही लोक माझ्या परिचयात आहेत. हे असे अविवेकी विचार करणारे अत्यंत सधन आणि सुशिक्षित लोक आमच्या देशात आजही खोऱ्याच्या संख्येने आहेत. अश्या देशात ग्रहण पाहण्यासाठी सूट देणे, हा विचार तरी कोणाच्या मनाला कसा शिवेल?
मुंबईत नेहरू तारांगण नावाची एक अत्यंत विलोभनीय जागा आहे. अगदी माफक दरात तिथे अवकाश या विषयावर माहिती देणारे तीन भाषांमधील शोज आहेत. पण, मुंबईकरांची पावलं मात्र तिथे क्वचितच वळतात. मुंबई दर्शन बसेसची कृपा म्हणून तिथे आणि मागच्या सायन्स सेंटर मध्ये माणसं दिसतात. आणि आलेली माणसं सुद्धा हाहा हुहु करण्यात मशगुल असतात. "ए वो देख तारा फुटा", "क्या पकाव गिरी है!" असे अनेक डायलॉग तिथल्या निवेदनासोबत आजूबाजूच्या प्रेक्षकांकडून ऐकायला मिळतात. ही आमच्या देशातील खगोलशास्त्राविषयीची उत्सुकता.
आर्यभट्टाने शून्याचा शोध लावला, असं आम्ही अभिमानाने सांगतो. कॅथलिक चर्च पृथ्वी सपाट आहे असं मानत असताना आम्ही ती नेहमीच गोल मानली हा आमचा इतिहास. करोडो मैलांवर असणाऱ्या ग्रहांचा आमच्या पूर्वजांनी शास्त्रोक्त अभ्यास केला; त्यासाठी जगाने आम्हाला गौरवलं. ज्या देशाच्या वर्तमानातील संविधानात "वैज्ञानिक दृष्टिकोन वाढावा" असं मार्गदर्शन केलं जातं, त्याच देशात विज्ञानाविषयी असलेली अनास्था ही उदासीनता निर्माण करणारी आहे. एकविसाव्या शतकात महासत्ता होऊ पाहणाऱ्या देशाच्या महत्वाकांक्षांना विज्ञानाच्या *उदासीनतेचं असलेलं हे ग्रहण खरंच खेदजनक आहे.*

No comments:
Post a Comment