📙 *पोट का सुटतं ?* 📙
""""""""""""""""""""""""""""""""""
आपल्या शरीरातील शरीर क्रिया सतत चालुच असतात. आपण कोणतेही काम न करता विश्रांती घेत असतो तेव्हाही शरीर क्रियांना विश्रांती नसते. कारण आपला स्वत:चा श्वास चालूच असतो. हृदयाचा ठोका चुकत नाही. शरीराच्या कानाकोपऱ्यात रक्त खेळवण्याचं काम ते करतच असतं. शरीराच्या सर्वांगाचं नियंत्रण करण्याचं काम मेंदू करतच असतो. निरनिराळ्या ज्ञानेंद्रियांकडून येणारे एक संदेश मेंदू ग्रहण करतच राहतो. त्यांचा अर्थ लावण्याचं काम तो करतच असतो. आपण वाचत असतो तेव्हाही समोरच्या अक्षरांची ओळख पटवून त्यांचा अर्थ लावण्याचं कामही मेंदू करतच असतो. थोडक्यात जेव्हा आपण शारीरिक मेहनत करत असतो तेव्हाच आपल्याला ऊर्जेची गरज असते असं नाही. चोवीस तास आपल्याला ऊर्जेची गरज भासत असते. ती पुरवण्यासाठी आपल्याला आहाराची गरज असते. त्या आहारातील अन्नाचं पचन होऊन त्यातून मिळणारी ऊर्जा रासायनिक रूपात साठवून ठेवली जाते. त्या अन्नातील उष्मांक किती ऊर्जा मिळणार आहे याची कल्पना देतात. बहुतेक वेळा तीन ग्लुकोजच्या रूपात साठवला जाते. ग्लुकोजच्या रेणूंचं ज्वलन होऊन त्यातून ऊर्जा उपलब्ध होते. जोवर शरीराची ऊर्जेची गरज भागवण्याइतका आहार आपण घेतो तोवर या प्रक्रिया चालूच असतात. त्यामुळे घेतलेल्या आहारातून मिळणारी ऊर्जा संपूर्ण खर्च केली जाते. शरीराचा ऊर्जेचा ताळेबंद व्यवस्थित जुळतो. काहीही शिल्लक राहत नाही.
पण जेव्हा आपण गरजेपेक्षा जास्त आहार घेतो तेव्हा त्या अन्नापासून मिळणारी सगळी ऊर्जा खर्च होत नाही. बरीच शिल्लक राहते. अशी अतिरिक्त ऊर्जा मग चरबीच्या किंवा मेदाच्या रूपात साठवली जाते. ज्यावेळी गरज असतानाही आहाराच्या अभावी ऊर्जा मिळत नाही त्यावेळी या चरबीचं ज्वलन होऊन त्यातून ऊर्जा उपलब्ध करून दिली जाते. शिवाय तितक्याच वजनाच्या प्रथिनापेक्षा चरबीतुन अधिक उष्मांक मिळतात. त्यामुळेही अतिरिक्त ऊर्जा मेदाच्या रूपात साठवून ठेवली जाते. ही चरबी ज्यांच्यामध्ये साठवली जाते त्या मेदपेशी पोटाच्या जवळ असतात. शरीराच्या आतल्या अवयवांच्या संरक्षणाचं काम जिथे हाडं नसतात तिथं मेदाच्या पेशींकडून केलं जातं. त्यामुळेही पोटाजवळच्या भागात या मेदपेशींचं प्रमाण जास्त असतं. साहजिकच अतिरिक्त उष्मांकाच्या सेवनामुळे निर्माण होणारी चरबी पोटाजवळच्या भागातच साठुन राहते. त्याचं आकारमान वाढवते. त्यामुळंच मग पोट सुटतं. कमरेपेक्षा पोटाचा घेर जास्ती होऊ लागतो.
उतारवयात एकंदरीतच चयापचयाचा वेग कमी होतो. म्हणजेच नेहमीच्या शरीरक्रियांसाठी लागणार्या ऊर्जेची गरजही कमी होत जाते. पण आपली भुक त्याच प्रमाणात मंदावत नाही. त्यामुळे आपला आहार कमी होत नाही. साहजिकच मग मिळणारी ऊर्जा गरजेपेक्षा जास्त होते. ती चरबीच्या रूपात साठवली जाते. आहारातलं चरबीचं प्रमाण कमी करणं हा यावर उपाय असत नाही. कारण अतिरिक्त उष्मांक चरबीच्या रूपातच साठवून राहतात. उतारवयात पोट थलथलीत होऊ लागतं, सुटतं त्याचं कारणही हेच आहे. त्या वयात जर आहारही कमी केला किंवा व्यायाम करून अतिरिक्त ऊर्जा खर्च करत राहिलो तर मात्र गरज आणि पुरवठा यांचा ताळेबंद व्यवस्थित राहून शरीरही आटोक्यात राहते. पोट सुटत नाही.
*बाळ फोंडके यांच्या 'का ?' या पुस्तकातून*

Nice post.
ReplyDelete