Wednesday, 22 March 2017

विचारवंत

२८८ आमदार आहेत सभागृहात, एक एक आमदार १०-१५ करोड रुपये ओतून निवडून येतो.

प्रत्येक आमदाराला किमान १.२५ लाख रुपये प्रती महिना पगार मिळतो,

*जर ह्या २८८ आमदारांनी प्रत्येकी १० शेतक-यांच कर्जमाफ करण्यास मदत केली तरी राज्यातील ३००० शेतकरी सहज कर्जमुक्त होतील.*

फुकट विधानसभेच्या पाय-यांन बसून घसा फाडून आपल्याला शेतक-याची किती काळजी आहे ह्याचे प्रदर्शन करू नका, घ्या १० शेतकरी कुटुंब दत्तक आणि करा कर्जमुक्ती

जर शेतकरी कर्जमाफी करायला सरकारी तिजोरीवर ताण पडत असेल तर...
विद्यमान आमदार,खासदार,मंत्री,मुख्यमंत्री माजी आमदार खासदार ते अगदी राष्ट्रपतीपर्यंत सर्वांना मिळत असलेले भत्ते ,पगारवाढ,पेन्शन सर्व बंद करून,जमलेली वार्षिक रक्कम आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाना,शेतकरी कुटुंबातील मुलांच्या शिक्षणासाठी खर्च करावेत.

सामान्य लोकांचा पैसा हा सामान्य लोकांसाठीच खर्च व्हावा.
दरवर्षी महागाई भत्ते,पगार वाढवून उधळपट्टी करू नये.

सर्वात महत्वाचे : आम्हाला शेतकऱ्यांचा कळवळा आहे ही तोंडपाटीलकी बंद करावी.

*महाराष्ट्राच्या जनतेला मूर्ख बनवू नका, नो उल्लू बनाविंग.*

No comments:

Post a Comment