Sunday, 20 May 2018

*भारतातील प्रमुख नद्या*


*भारतातील प्रमुख नद्यांची थोडक्यात माहिती…*

1. *गंगा*- 
*गंगा नदीची लांबी तब्बल २५१० किलोमीटर असून ती हिमालयात गंगोत्री येथे उगम पावते.* उत्तराखंड, उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड आणि पश्चिम बंगाल या राज्यांतून वाहणारी गंगा नदी बांगलादेशात बंगालच्या उपसागराला मिळते.

2. *ब्रह्मपुत्रा* - 
*बह्मपुत्रा नदीची लांबी तब्बल २७०० किलोमीटर असून ती मानसरोवरात उगम पावते.* भारतातील आसाम व अरुणाचल प्रदेश या राज्यांतून वाहणारी ब्रह्मपुत्रा नंतर चीन आणि बांगलादेशात जाऊन अखेर बंगालच्या उपसागराला मिळते.

3. *गोदावरी*- 
*गोदावरीची लांबी १४५० किलोमीटर असून ती महाराष्ट्रात नाशिकजवळ त्र्यंबकेश्वर येथे उगम पावते.* महाराष्ट्र व आंध्र प्रदेश या राज्यांतून वाहणारी गोदावरी आंध्र प्रदेशात राजामुंद्री येथे बंगालच्या उपसागराला मिळते.

4. *यमुना*- 
*यमुना नदीची लांबी १३९६ किलोमीटर असून ती यमनोत्री येथे उगम पावते.* उत्तराखंड, उत्तर प्रदेश, व हरयाणा या राज्यांतून वाहणारी यमुना गंगेची उपनदी असल्याने अलाहाबाद येथे गंगेला मिळते.

5. *नर्मदा*- 
*नर्मदा नदीची लांबी १३१० किलोमीटर असून ती मध्य प्रदेशात अमरकंटक येथे उगम पावते.* मध्य प्रदेश, महाराष्ट्र आणि गुजरात या राज्यांतून वाहणारी नर्मदा नदी पश्चिमवाहिनी असून गुजरातमध्ये भडोचजवळ अरबी समुद्राला मिळते.

6. *सिंधू*- 
*सिंधू नदीची लांबी २८८० किलोमीटर आहे. हिमालय पर्वतारांगात मानसरोवरात उगम पावते.* काश्मीर- पंजाब- हिमाचल प्रदेशातून यांच्या काही भागातून वाहत ही नदी पाकिस्तानामध्ये प्रवेश करते. सिंधू नदी पाकिस्तानमधील प्रमुख नदी म्हणून ओळखली जाते.

7. *गंडक*- 
*गंडक नदीची लांबी १३१० किलोमीटर असून ती हिमालयात उगम पावते.* उत्तर प्रदेश व बिहारमधून वाहणारी गंडक नदी गंगेची उपनदी असल्याने गंगेला मिळते.

8. *कृष्णा* - 
*कृष्णा नदीची लांबी १२९० किलोमीटर असून ती महाराष्ट्रात महाबळेश्वर येथे उगम पावते.* महाराष्ट्र, कर्नाटक आणि आंध्र प्रदेशातून वाहणारी कृष्णा नदी आंध्र प्रदेशात बंगालच्या उपसागराला मिळते.

9. *चंबळ* - 
*चंबळ नदीची लांबी ९६६ किलोमीटर असून ती मध्य प्रदेशात इंदूरजवळ उगम पावते.* मध्य प्रदेश, राजस्थान व उत्तर प्रदेशातून वाहणारी चंबळ नदी उत्तर प्रदेशात यमुनेला मिळते.

10. *चिनाब* (चंद्रभागा)-
*चिनाब नदीची लांबी ९६० किलोमीटर असून ती हिमाचल प्रदेशात उगम पावते.* हिमाचल प्रदेश, पंजाब आणि जम्मू-काश्मीरमधून वाहणारी चिनाब नदी नंतर पाकिस्तानात जाऊन सिंधू नदीला मिळते.

11. *तापी*-  *तापी नदीची लांबी ७२४ किलोमीटर असून ती मध्य प्रदेशात बेतूलजवळ उगम पावते.* मध्य प्रदेश, महाराष्ट्र व गुजरातमधून वाहणारी तापी नदी पश्चिम वाहिनी असल्याने गुजरातमधील सुरत जिल्ह्यात अरबी समुद्राला मिळते.

12. *कावेरी*-  *कावेरी नदीची लांबी ८०५ किलोमीटर असून ती कर्नाटकात उगम पावते.* कर्नाटक व तामिळनाडूतून वाहणारी कावेरी बंगालच्या उपसागराच्या एका खाडीला मिळते.

13. *कोशी*-  *कोशी नदीची लांबी ७२९ किलोमीटर असून ती नेपाळमध्ये हिमालय पर्वतात उगम पावते.* नेपाळमधून बिहारमार्गे कोसी नदी भारतात गंगा नदीला जाऊन मिळते.

14. *घाघरा*- 
*घाघरा नदीची लांबी ९७० किलोमीटर असून ती हिमालय पर्वतात उगम पावते.* उत्तर प्रदेश- बिहारमधून वाहत जाऊन पुढे ती बिहारच्या सारण जिल्ह्यात गंगा नदीत विलीन होते.घाघरा नदी शरयू नदी म्हणूनही ओळखली जाते.

15. *झेलम*-
*झेलम नदीची लांबी ८१३ किलोमीटर आहे. ही नदी उत्तर प्रदेशातील बेरीनाग येथे उगम पावते.* उत्तर प्रदेशमधून जम्मू काश्मीर- पंजाब मार्गे ती सिंधू नदीला जाऊन मिळते.

16. *महानदी*-
*महानदी ८८५ किलोमीटर लांबीची आहे. ही नदी छत्तीसगडच्या रायपूर जिल्ह्यात सिहावा पर्वतात उगम पावते.* छत्तीसगड-मध्य प्रदेश-ओदिशा अशी वाहत ही नदी बंगालच्या खाडीत जाऊन मिळते.

17. *रावी*-
*रावी नदीची लांबी ७२० किलोमीटर आहे. ही नदी हिमाचलप्रदेशातील चंबा जिल्ह्यात उगम पावते.* ही नदी हिमाचल प्रदेश- पंजाबमधून वाहत भारत पाकिस्तान सिमेवर चिनाब नदीला जाऊन मिळते.

18. *सतलज*-
*सतलज नदी विंध्य पर्वत रांगात उगम पावते.* पंजाबमधून वाहणा-या प्रमुख नद्यांपैकी एक म्हणून या नदीची ओळख आहे...

No comments:

Post a Comment