Wednesday, 21 June 2017

सामान्य जाणकारी

🌷🌷Biology for Ssc cgl🌷🌷

** मनुष्य का हृदय कितनी बार धड़कता है ?
- 72 बार/मिनट
** मानव खोपड़ी [Human Skull] में हड्डियाँ पाई जाती है ?
- 8
** स्वस्थ्य मनुष्य की श्वसन गति कितनी होती है ?
- 16 से 18 बार
** मनुष्य की मस्तिष्क [Human Brain] का वजन कितना होता है ?
- 1350 ग्राम
** मस्तिष्क का सबसे बड़ा भाग है ?
- प्रमस्तिष्क (सेरेब्रम)
** वृक्क (किडनी) [Kidney] का वजन ?
- 150 ग्राम
** शरीर की सबसे बड़ी हड्डी [Big Bone] होती है ?
- फीमर (जाँघ में)
** मनुष्य शरीर की सबसे छोटी हड्डी होती है ?
- स्टेपीज (कान में)
** शरीर में सबसे मजबूत हड्डी ?
- जबड़े की
** शरीर की सबसे कठोर तत्व होती है ?
- एनामिल
** सामान्य मनुष्य का रक्त चाप [Blood Pressure] ?
- 120/80 मि.मी.
** मानव शरीर में जल की मात्रा पाई जाती है ?
- 65 से 80 प्रतिशत
** रक्त की मात्रा शरीर के भार का होता है ?
- 7 प्रतिशत
** मनुष्य में रक्त [Blood] की मात्रा पाई जाती है ?
- 5 से 6 लीटर
** मानव रक्त (क्षारीय) [Human Blood (Alkaline)] का PH मान होता है ?
- 7.4
** रक्त को शुद्ध करता है, वह ?
- किडनी [Kidney]
** लाल रक्त कण [Red Blood Cells] का निर्माण होता है ?
- अस्थिमज्जा में
** लाल रक्त कण का जीवन काल ?
- 120 दिन
** श्वेत रक्त कण [White Blood Cell] का जीवन काल ?
- 1 से 4 दिन
** श्वेत रक्त कण [White Blood Cell] को कहा जाता है ?
- ल्यूकोसाइट [Leukocytes]
** लाल रक्त कण [Red Blood Cells] को कहा जाता है ?
- एरिथ्रोसाइट [Erythrocytes]
** शरीर का ताप नियंत्रक होता है ?
- हाइपोथैलमस ग्रंथि [Hypothalamus Gland]
** मनुष्य [Human] की सर्वदाता रक्त समूह (Universal Donor) ?
- O
** मनुष्य की सर्वग्राही रक्त समूह (Universal Receptor) ?
- AB
** रक्तचाप [Blood Pressure] मापने की यंत्र को कहा जाता है ?
- स्फिग्मोमैनोमीटर [Sphygmomanometer]
** ‘ब्लड बैंक [Blood Bank] ‘ कहलाता है ?
- प्लीहा (Spleen)
** भोजन का पाचन प्रारंभ होता है ?
- मुख से
** पचे हुए भोजन का अवशोषण होता है ?
- छोटी आँत [Small Intestine] में
** पित (Bile) स्त्रावित होता है ?
- यकृत [Liver] द्वारा
** विटामिन ‘ए‘ [Vitamin 'A'] संचित होता है ?
- यकृत में
** शरीर की सबसे बड़ी ग्रंथि [Largest Gland] ?
- यकृत (लीवर)
** सबसे छोटी ग्रंथि [Small Gland] (मास्टर ग्रंथि) ?
- पिट्यूटरी
** मनुष्य में पसलियाँ [Ribs] की संख्या होती है ?
- 12 जोड़ी
** शरीर में हड्डियों [Bones] की कुल संख्या है ?
- 206
** शरीर में मांसपेशियों [Muscles] की कुल संख्या ?
- 639
** लार [Saliva] में पाया जाने वाला एन्जाइम [Enzyme] होता है ?
- टायलिन [Taylin]
** लिंग निर्धारण कहां से होता है ?
- पुरूष क्रोमोसोम [Men Chromosomes] पर
** मनुष्य का हृदय [Human Heart] होता है ?
- चार कोष्ठीय
** शरीर में गुणसूत्रों (Chromosomes) की संख्या पाई जाती है ?
- 46
** शरीर का सबसे बड़ा अंग [Largest Organ] ?
- त्वचा
** शरीर की सबसे बड़ी कोशिका ?
- तंत्रिका तंत्र
** शरीर में अमीनों अम्ल [Amino Acids] की संख्या ?
- 22
** शरीर में प्रतिदिन मूत्र [Urine] बनता है ?
- 1.5 लीटर
** मूत्र दुर्गंध देता है, क्योंकि ?
- यूरिया [Urea] के कारण
** मानव मूत्र (अम्लीय) का PH मान है ?
- 6
** शरीर का सामान्य तापमान होता है ?
- 98.6 डिग्री फेरेनहाइट 'या' 37 डिग्री सेल्सियस 'या' 310 केल्विन
संकलन छगन शेटे

स्वस्थ बिमा


MATH FOR


मराठी एक वैज्ञानिक भाषा आहे.

कदाचित माहीत नसेल, पण मराठी  एक वैज्ञानिक भाषा आहे.
आणी तिचं कोणतंही अक्षर असं का आहे, त्यामागे ही काही कारण आहे.
इंग्लीश मधे ही गोष्ट नाही दिसत.
__________________
क, ख, ग, घ, ङ - यांना  *कंठव्य* म्हणतात.कारण यांचा उच्चार करताना ध्वनि कंठातून निघतो.एकदा करून बघा.

च, छ, ज, झ,ञ- यांना *तालव्य* म्हणतात.कारण यांचा उच्चार करताना जीभ टाळू ला लागते.
एकदा करून बघा

ट, ठ, ड, ढ , ण- यांना  *मूर्धन्य* म्हणतात.कारण यांचा उच्चार  जीभ मूर्धा ला लागल्याने होतो.एकदा म्हणून बघा.

त, थ, द, ध, न- यांना *दंतव्य* म्हणतात.यांचा उच्चार करताना जीभ दातांना लागते.
एकदा म्हणून बघा.

प, फ, ब, भ, म,- यांना *ओष्ठ्य* म्हणतात.कारण यांचा उच्चार ओठ जुळल्याने  होतो. एकदा म्हणून बघा .
________________________

आपल्याला आपल्या भाषेचा अभिमान  वाटतो पण तो का , ते पण लोकांना सांगा.एवढी वैज्ञानिकता इतर कुठल्या ही भाषेत नसेल.

जय मराठी !
क,ख,ग काय म्हणतात बघू जरा ....
••••••••••••••••••••••••••••••••••••
क - क्लेश करू नका
ख- खरं बोला
ग- गर्व नको
घ- घमेण्ड करू नका
च- चिँता करत राहू नका
छ- छल-कपट नको
ज- जवाबदारी निभावून न्या
झ- झुरत राहू नका
ट- टिप्पणी करत  राहू नका
ठ- ठकवू नका
ड- डरपोक राहू नका
ढ- ढोंग  करू नका
त- तंदुरुस्त रहा
थ- थकू नका
द- दिलदार बना
ध- धोका देऊ नका
न- नम्र बना
प- पाप करू नका
फ- फालतू कामे करू नका
ब- बडबड कमी करा
भ- भावनाशील बना
म- मधुर बना
य- यशस्वी बना
र- रडू नका
ल- लालची बनू  नका
व- वैर करू नका
श- शत्रुत्व करू नका
ष- षटकोणा सारखे स्थिर रहा
स- सत्य बोला

ह- हसतमुख रहा
क्ष- क्षमा करा
त्र- त्रास देऊ नका
ज्ञ- ज्ञानी बना  !!

कृपया सर्व मराठी लोकांना पाठवा.

*मराठी बोला अभिमानाने*
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🙏🙏

Jack Ma

एक शिक्षक ते चीनचा सर्वात श्रीमंत माणूस - अचंबित करणारा प्रवास
----------------------------------------
सक्सेस स्टोरीज आपल्या सर्वाना आवडतात. हलाखीच्या परिस्थितीवर मात करून यश मिळवणाऱ्या व्यक्तींच्या एकदम “लार्जर दॅन लाइफ” गोष्टी आपल्याला नेहमीच मोहात पाडतात. खरं तर अनेक उपदेशांपेक्षा या खऱ्याखुऱ्या सत्यकथाच आपल्याला जास्त प्रेरित करतात. मित्रांनो आज मी तुम्हाला एका अशाच व्यक्तीबद्दल आणि त्याच्या स्वप्नवत वाटणाऱ्या यशोगाथेबद्दल सांगणार आहे.

मित्रांनो, आज आपण बोलणार आहोत एका अशा माणसाबद्दल ज्याने चीनसारख्या मोठ्या देशाची अर्थव्यवस्था आणि इंटरनेट उद्योगाची बाजारपेठ एकहाती बदलवून टाकली. त्याचे पूर्ण आयुष्य हे एखाद्या चित्रपटकथेला लाजवेल इतके थक्क करणारे आहे.

ही कथा आहे जॅक मा (Jack Ma) याची !!

जॅक मा हा अलिबाबा.कॉम (Alibaba.com) या जगप्रसिद्ध ई-कॉमर्स कंपनीचा आणि अलीपे (Alipay) या ई-पेमेंट कंपनीचा संस्थापक आहे. सध्या तो अधिकृतरीत्या चीनमधील सर्वाधिक श्रीमंत माणूस आहे. जॅक मा ची संपत्ती तब्बल २५०० करोड अमेरिकी डॉलर्स इतकी महाप्रचंड आहे. जॅक मा च्या अलिबाबा या कंपनीने २०१४ मध्ये  अमेरिकेच्या शेअरमार्केट मध्ये प्रवेश केला आणि त्यात अमेरिकेच्या (आणि जगाच्या) इतिहासातील सर्वात मोठी गुंतवणूक (तब्बल १५००० करोड अमेरिकी डॉलर्स) नोंदवण्यात आली. अलीबाबा या कंपनीचे केवळ 7.8% शेअर्स हाती असताना जॅक मा एवढा श्रीमंत आहे, याहून अधिक शेअर्स असते तर जॅक मा ची संपत्ती किती वाढली असती याचा विचार न केलेलाच बरा..

हे सर्व आकडे पाहून तुमच्या डोळ्यासमोर एखादया गर्विष्ठ आणि गर्भश्रीमंत माणसाचा चेहरा आला असेल ना... परंतु हीच खरी कथा आहे... जॅक मा हा एका गरीब घराण्यातून आलेला साधासुधा मनुष्य आहे. अलिबाबा.कॉम सुरु करण्याआधी जॅक एक इंग्लिश शिक्षक म्हणून काम करत होता. पण शिक्षक म्हणून स्थिरावण्याच्या आधीही जॅकने बऱ्याच खचता खाल्या आहेत. इतक्या की ‘जॅक = अपयश’ हे एक समीकरणच बनून गेले होते.

जॅक चे खरे नाव आहे "मा युन". चीनमधील Hangzhou या प्रांतात मोठा भाऊ आणि धाकट्या बहिणीसोबत जॅक लहानाचा मोठा झाला. त्याचा जन्म १९६४ सालचा. आई-वडील जागोजागी संगीतातून कथाकथनाचे खेळ करायचे. घराची परिस्थिती मध्यमवर्गाहून थोडी कमी म्हणता येईल अशी. लहानपणापासून जॅकने नापास होण्याचा सपाटाच लावलेला. प्राथमिक शाळेत तो दोनदा नापास झाला. माध्यमिक शाळेत तीन वेळा नापास झाला. महाविद्यालयात प्रवेश मिळविण्यासाठीच्या पूर्वपरीक्षेत तीन वेळा नापास झाला तेव्हा कुठे त्याचा कॉलेजप्रवास सुरु झाला. हे झालं शिक्षणाचं !
पुढे नोकरीच्या बाबतीत तर जॅकने आणखीनच अपयश पाहिलं. तीन वर्षे प्रवेशासाठी वाट पाहिल्यानंतर तीन वर्षानी जॅकने पदवी प्राप्त केली खरी पण पहिली नोकरी मिळवण्याआधी जॅकला ३० वेळा नकार ऐकावा लागला. त्यापैकीच एक नकार होता जगप्रसिद्ध KFC चा. जेव्हा KFC चीन मध्ये नुकताच आली होती तेव्हा जॅक राहायचा त्या भागातील २४ जणांनी तेथे जॉबसाठी प्रयत्न केला होता. त्यापैकी जॅक वगळता इतर २३ जणांना नोकरी मिळाली होती. जॅकने पोलिसात भरती होण्याचा देखील प्रयत्न केला मात्र तिथेही त्याच्या पदरी निराशाच आली.

कॉलेजचे शिक्षण इंग्लिशमधून झाले असल्याने जॅकचे इंग्रजी थोडेफार बरे होते म्हणून त्याने काही दिवस "टुरीस्ट गाईड" म्हणून देखील काम केले. तेथेच त्याला एका परदेशी पर्यटक मुलीने जॅक हे नाव दिले. पुढे होता होता जॅक एक इंग्लिश शिक्षक म्हणून स्थिरावला. आणि त्यानंतर जॅकच्या जीवनात आमुलाग्र बदल घडवून आणणारी एक गोष्ट झाली. १९९५ मध्ये चीन सरकारच्या एका उपक्रमाअंतर्गत जॅकला अमेरिकेला जाण्याची संधी मिळाली. तेव्हा त्याचे वय होते अवघे ३१ वर्षे.

अमेरिकेमध्ये जॅकचा कम्प्युटर्स आणि इंटरनेटशी पहिल्यांदा संबंध आला. तेव्हा चीन मध्ये कम्प्युटर्स अतिशय दुर्मिळ होते. इंटरनेट आणि इमेल्स तर जवळजवळ अस्तित्वातच नव्हत्या. नेटवर त्याने चायना असं सर्च केल्यावर त्याला काहीच माहिती मिळाली नाही. आपल्या देशातही हे असावं असं जॅकला वाटू लागलं. त्याने तसं वेडच घेतलं. हे स्वप्न घेऊन जॅक मायदेशी परतला.

सर्वप्रथम काही मित्रांकडून पैसे घेऊन त्याने व्यवसायाला सुरुवात केली. प्रोग्रामिंगचे अजिबात ज्ञान नसताना, व्यवसायाचा आणि विक्रीचा काहीही अनुभव पाठीशी नसतांना आणि मुख्य म्हणजे इंटरनेट वापरणारा पुरेसा ग्राहकवर्ग नसतानाही जॅकने अलिबाबा ही ई-कॉमर्स कंपनी सुरु केली. ऑनलाईन खरेदी करणे हे सोयीचे आणि सुरक्षित आहे हे ग्राहकाना पटवून देण्यात अलिबाबाने बराच वेळ खर्ची घातला. पण हळूहळू जॅकला यश येऊ लागले. पुढे जसजसा इंटरनेटचा प्रसार वाढत गेला तसा अलिबाबाचा पसारा देखील वाढत गेला आणि बघता बघता अलिबाबा.कॉम ही चीनमधील सर्वात मोठी ई-कॉमर्स कंपनी बनली.

अलिबाबाचा पसारा केवळ चीन पुरताच मर्यादित न ठेवता जॅकने जगात इतर देशातही पाय रोवायला सुरुवात केली. इतकी की आता जगभरात सर्वाधिक विक्री असणाऱ्या कंपन्यांमध्ये अलिबाबा दुसऱ्या क्रमांकावर आहे. पहिला नंबर आहे वॉलमार्टचा. जॅक मा नावाच्या एका साध्या माणसाने केवळ २० वर्षात एक अजस्त्र कंपनी उभी केली. हे शक्य झाले ते केवळ मोठ ध्येय उराशी बाळगण्याने आणि अपयशाने खचून न जाण्याच्या जॅकच्या वृत्तीमुळे.
ध्येय ठरवणे, आपल्या ध्येयावर विश्वास असणे आणि ते पूर्ण करण्यासाठी जीवतोड मेहनत करणे ही यशस्वी उद्योगाची/उद्योजकाची मुख्य त्रिसूत्री आहे. जॅकने देखील याचा पुरेपूर प्रत्यय दिला आहे. नुकताच जॅक मा याने भारताच्या स्नॅपडील (Snapdeal) आणि पेटीएम (PayTM) या कंपन्यामध्ये गुंतवणूक करून भारतीय बाजारपेठेत प्रवेश केला आहे.

मित्रहो जॅक मा आणि त्याचा थक्क करणारा उद्योजकीय प्रवास तुम्हाला कसा वाटला ? जर यातून काही प्रेरणा मिळाली असेल तर फेसबुक आणि ट्वीटरवर हा लेख अवश्य शेअर करा. तसेच तुमच्या प्रतिक्रिया द्यायला विसरू नका.

Source : सलिल चौधरी - http://www.netbhet.com/2015/06/blog-post.html
#JackMa #Alibaba #जॅकमा #अलिबाबा #Ecommerce

नातं टिकवायचा असेल तर ...

नातं टिकवायचा असेल तर...

"सुन अशी हवी की चारचौघीत उठुन दिसावी,बायको अशी हवी संस्कारांची मुर्ती , शिक्षण तर हवच किमान पदविधर तरी ,स्वयंपाक यायलाच हवा नव्हे नव्हे माझ्या अाई सारखी सुगरणच हवी,आमच्या घरी सतत पाहुण्यांची ये जा असते तेव्हा घर निटनेटकं हवच तेव्हा होणाऱ्या  बायकोला/सुनेला घरकामाची आवड हवी, मोठ्यांचा मान राखणं कुळाचार सांभाळनं सगळं काही यायलाच हवं......
अबब !! केवढ्या ह्या अपेक्षा...मुलगी हवी की रोबोट?
अरे एखादी मुलगी चारचौघात उठुन दिसणारी नसेलही पण शिकलेली असेल तर काय हरकत आहे? एखादी घरकामात तरबेज नसेल पण इतर कला गुणांनी संपन्न असेल तर काय हरकत आहे?
दिवसभर नोकरी करून दमलेल्या तीला पाहूण्यांकडे नाही लक्ष देता आलं पण मनापासुन हसुन बोलुन वेळ प्रसंगी बाहेरून आणुन खाऊ घातलं तर काय हरकत आहे?
बरं गृहिणी म्हणुन दिवसभर घरात काम करणाऱ्या स्त्रिया घर आणि बाहेरची कामं लिलया पार पाडतात गरज असते थोडी मोकळीक आणि विश्वासाची,
रात्रंदिवस बायकोचा पान उतारा करणारे चार चार तास अमरदेवीच्या दर्शना साठी रांगेत उभे रहातात, कशासाठी हो?
कामाच्या रगाड्यातुन कधीतरी बाहेर निघालेली बायको छान साडी किंवा ड्रेस घालते तेव्हा तीच्याकडे डुंकूनही नं बघणारा नवरा ,रस्त्यावर लावलेल्या जाहीराती मधल्या मुलीचं तोंड भरून कौतुक डोळे भरून दर्शन घ्यायला आजीबातच विसरत नाहीत...
जितक्या अपेक्षा बायको कडुन करत असतो तेवढेच लायक आपणही आहोत का याचाही विचार करायला हवा... नवऱ्याने  ही करावा..
जन्मदात्याचं घर कायमचं सोडुन तुमच्या घरात येणारी मुलगी, नविन नात्यांना आपलंसं करणारी मुलगी,सासर माहेरच्या नाजुक नात्यांमधली कडी असलेली मुलगी,लाडात वाढलेली असतानाही एक उंबरठा ओलांडुन एक जबाबदार स्त्री म्हणुन नावारूपाला येणारी मुलगी,अाई वडीलांना दोष लागू नये म्हणुन स्वतःला सिद्ध करण्यासाठी धडपडणारी ही मुलगीच ,
किती रुपं किती किती रंग तीचे...
म्हणूनच की काय,निसर्गाने मातृत्वाचं वरदान तीला दिलंय,मुळात स्त्रिया सोशीक असतात,आईच्या भुमिकेत येताना त्या आणखी सहनशिल बनतात...
कोणत्याही कठिण प्रसंगी नवरा,मुलांच्या पाठीशी खंबीर पणे उभ्या रहातात,
ती कोणी चमत्कारी देवी नाही,तुमच्या सारखीच हाडामासाची बनलेलेली आहे, तीलाही वेदना होतात. मुलं जन्माला घालणं ही तर स्त्रीची शारीरिक व मानसिक पडझड होत असते..तिच्या त्रासात काळजी घ्या .दोन शब्द प्रेमाने बोला...बस् अजून काय हवंय !!
मग बघा ती वाघीण कशी उठुन उभी रहाते कुटूंबाच्या रक्षणा साठी.....

एक दार पलिकडच....!!
या लघुकथेतुन

आवडलं तर प्रतिक्रिया द्या 

पालकांसाठी

पालकांनो तुमच्यासाठी!

आय टी चे मृगजळ : काय सत्य, काय असत्य !

( प्रस्तुत लेखक स्वतः एका बहुराष्ट्रीय आय टी कम्पनी मध्ये कार्यरत असून ,या क्षेत्राचा १५ वर्षे अनुभव आहे .लेखात व्यक्त केलेली मते वैयक्तिक आहेत. काही मुद्दे कठोर भाषेत मांडले आहेत .यात कुठल्याही व्यवसायाचा अथवा व्यावसायिकाचा वैयक्तिक उपमर्द करण्याचा हेतू नाही .
आपल्या मुलाला अथवा मुलीला "आय टी " क्षेत्रात पाठवायला बघत असाल तर नक्कीच वाचा आणि आपल्या पाल्याला वाचायला द्या .लेखाचा विषय तांत्रिक असल्याने जिकडे योग्य मराठी प्रमाण प्रतिशब्द मिळाले नाहीत तिकडे मूळ तांत्रिक संज्ञा वापरल्या आहेत )

सध्या वर्तमानपत्र उघडले की आय टी क्षेत्रात मंदी आहे आणि हजारो लोकांचे रोजगार जाणार अश्या बातम्या दिसतात . अमेरिकेने आणि इतर देशांनी व्हिसा चे नियम कडक केले असल्याने भारतीय आय टी प्रोफेशनल्स च्या बऱ्याच संधी जाणार अशी ओरड सुद्धा दिसते . या दोन्ही मुद्द्यात नक्कीच तथ्य आहे .पण यासाठी सरसकट आय टी कम्पन्यांना किंवा अमेरिकन सरकार ला व्हिलन बनविण्याआधी काही बाबींचा सर्वांगीण परामर्श घेणे गरजेचे आहे .आपल्या आय टी क्षेत्रा बद्दलच्या काही भाबड्या कल्पना आणि समज तपासून पहाण्याची वेळ आलेली आहे .

१. आय टी मधले भारताचे नक्की योगदान काय ?

" भारतीय संगणक "अभियंते" ( ! ) जगभर भारताचा झेंडा फडकवीत आहेत आणि भारत आय टी क्षेत्रात महासत्ता आहे ," असा एक भाबडा समज आपल्या देशात आहे .रोजगार निर्मिती साठी दुसरे काही ठोस जमत नसल्याने या दिवास्वप्नात जनतेला मग्न ठेवणे हे बेरकी राजकारण्यांच्या सोयीचे सुद्धा आहे . प्रत्यक्षात ९९ % भारतीय आय टी कम्पन्या या केवळ परदेशातील आय टी प्रकल्पांसाठी स्वस्त मनुष्यबळ पुरविण्याचे ठेकेदार आहेत . १९९० च्या दशकात  भारतात जरी फारसे संगणकीकरण झाले नव्हते तरी  परदेशातील संगणकावर अवलंबुन असणाऱ्या हजारो उद्योगांनी Y२K  च्या भीतीने आपली दारे "जो मिळेल तो " या तत्वावर  ( भारता सारख्या स्वस्त मनुष्यबळ देणाऱ्या ,इंग्रजी बऱ्यापैकी माहित असलेल्या  देशांसाठी ) उघडली आणि आपल्याकडे ज्याला ज्याला  कॉम्पुटर चे बेसिक ज्ञान होते त्यांना जराश्या प्रशिक्षणाने परदेशी जायची संधी मिळू लागली . डॉलर मध्ये पगार आणि परदेशी नोकरी याचे टिपिकल मध्यमवर्गीय आकर्षण यामुळे आय टी बद्दल एक प्रकारचे वलय निर्माण झाले आणि जो तो आय टी /कॉम्पुटर "इंजिनियरिंग" मध्ये येण्यासाठी पळू लागला . मुळात या सर्व प्रकारात "इंजिनियरिंग" काहीच नव्हते .आवश्यक होते ते कोडिंग चे ज्ञान .आणि कोडिंग तर कोणीही शिकू शकतो .

आजही काही सन्माननीय अपवाद बदलता कॉम्पुटर /माहिती तंत्रन्यान क्षेत्रात मूलभूत संशोधन अथवा एखादे नवीनतम ( innovative ) उत्पादन याबाबतीत भारतीय लोकांची आणि कम्पन्यान्ची बोंबच दिसते . केवळ मायक्रोसॉफ्ट,गुगल अश्या कम्पन्याच्या प्रमुखपदी भारतीय मुळाची व्यक्ती (सत्या नाडेला /सुंदर पिचाई )  बसल्याने या वास्तवात तसूभरही फरक पडला नाहीये आणि नजीकच्या काळात पडण्याची चिन्ह सध्या तरी दिसत नाहीत . याउलट जगातील आज सर्व आघाडीच्या आय टी प्रणाली /उत्पादने ही अमेरिकन (उदा : ऍप्पल /मायक्रोसॉफ्ट / ओरॅकल ई  ) अथवा युरोपियन ( उदा : एस ए  पी ) कम्पन्यांनी बनवलेली दिसतात आणि या कम्पन्याची उत्पादने /प्रणाली स्वस्तात "बसवून" द्यायचे काम आमचे आय टी "कामगार" करतात . म्हणजे हा "लेबर जॉब" झाला .आणि इतिहास साक्षी आहे की असे लेबर /कामगार जॉब्स स्वस्ताई कडून अधिक स्वस्ताई कडे आणि मग यांत्रिकीकरणा ( ऑटोमेशन ) कडे जातात .भारताच्या ३००० अभियांत्रिकी विद्यालयांमधून सुमारे १५ लाख इंजिनियर्स बाहेर पडतात दर वर्षी आणि यातील ३० % मुलांना जेमतेम आज नोकरी (मग ती इंजिनीयरची असेलच असे नाही ) मिळते . याचे कारण हेच !

पूर्वी लहानपणी एक गमतीचे कोडे ऐकले  होते....राजा का आजारी पडला ? घोडा का बसला ? आणि भाकरी का करपली ? या सगळ्याचे उत्तर होते एकच : " न फिरल्याने /फिरविल्याने " ..तसेच ..इंजिनियर बेकार का झाले ? अभियांत्रिकी महाविद्यालये गोत्यात का आली ? आणि भारतीय आय टी चा फुगा का फुटला ? या सर्व पप्रश्नांचे उत्तर सुद्धा एकच "नवीन शिकण्याची क्षमता आणि कौशल्य आत्मसात न केल्याने " !

२.मग आज नक्की झालेय काय ?

भारतीय संगणक प्रशिक्षित मनुष्यबळ स्वस्त असल्याने गेली दोन दशके आपले आय टी  "कामगार" परदेशी लोकांना स्थानिकांपेक्षा सहज "परवडायचे  " .आपल्याकडे मुंबई ला जसे बिहार आणि यु पी मधले मजूर बांधकाम क्षेत्रात परवडतात तसे . पण हा काळ आपल्या देशाने फक्त "आय टी महासत्ता" म्हणून खोटी कौतुके करून घेण्यात फुकट घालवला.मागणी तसा पुरवठा म्हणून भारंभार इंजिनियरिंग कॉलेजेस निघाली आणि लाखो "अभियंते" ( ! ) या फॅक्ट्रीज मधून बाहेर पडू लागले .जो पर्यंत आय टी प्रोजेक्ट्स सुरु होते आणि मनुष्यबळ गरजेचे होते तो पर्यंत हा फुगा फुटला नाही.पण गेली ५ वर्षे हा या क्षेत्राचा संक्रमणाचा काळ ठरला .

पहिला फटका :  तंत्रज्ञान बदलले .

मशीन लर्निंग , इंटरनेट ऑफ थिंग्स ,आभासी बुद्धिमत्ता ( Artificial  Intelligence ) ,बिग डेटा ऍनालीटीक्स चे "सेल्फ सर्व्हिस" प्लॅटफॉर्मस आणि क्लाउड कॉम्पुटिंग इत्यादी नवीन गोष्टींनी तंत्रज्ञानाचे विश्व बदलून टाकले .आभासी बुद्धिमत्ता ,मशीन लर्निंग आणि रोबोटिक्स ने आय टी मधले लो लेव्हल /रिपीटेटिव्ह म्हणजे टेस्टिंग /डिबगिंग /सिम्पल  प्रोग्रामिंग / सिम्पल कोड चेंजेस असे रोजगार सम्पवले.बिग डेटा आणि ऍनालीटीक्स चे प्लॅटफॉर्म्स आता अधिकाधिक सोपे होत असल्याने बिझनेस युजर्स स्वतः सेल्फ सर्व्हिस करून वापरू शकतात आणि त्याने "अनॅलिस्ट " चे जॉब्स कमी केले .म्हणजे पहिले एक्ससेल शीट्स च्या डोंगराखाली जे काम १० लोकांची टीम एक आठवडा करायची आणि बिझनेस लीडर्स ना समजेल असे रिपोर्ट्स आणि चार्ट्स तयार करून द्यायची ,तेच काम आता स्वतः बिझनेस युजर्स स्वतः च्या आय पॅड वर ५ मिनिट्स मध्ये करू शकतात . म्हणजे जरी बिग डेटा ऍनालीटीक्स ,डेटा सायन्स हे आजही जरी "हॉट " करियर ऑप्शन्स असले तरी त्या क्षेत्रात सुद्धा लो लेव्हल अथवा एंट्री लेव्हल नोकऱ्या कमी झाल्या आहेत .

पूर्वी अजून एक क्षेत्र आय टी  मध्ये भरपूर नोकऱ्या द्यायचे ,ते म्हणजे "हार्डवेअर ,नेटवर्क आणि सिस्टिम्स म्यानेजमेंट " .म्हणजे ज्यांना सॉफ्टवेअर क्षेत्रात नोकरी मिळायची नाही त्यांना किमान हार्डवेअर म्यानेजमेंट अथवा नेटवर्क /  डेटा सेंटर म्यानेजमेंट अश्या नोकऱ्या मिळायच्या.आता क्लाउड कॉम्पुटिंग मुळे ते रोजगार सुद्धा कमी होत आहेत.कारण हल्ली प्रत्येक छोट्या मोठ्या कम्पनी ला स्वतः चे हार्डवेअर घेऊन आपल्या डेटा सेंटर मध्ये चालविण्यापेक्षा बहुराष्ट्रीय कम्पन्यांनी जगभर सुरु केलेल्या क्लाउड डेटा सेंटर्स मध्ये आपली सॉफ्टवेअर्स चालविणे सोपे आणि किफायती झाले आहे .त्यामुळे या मॉडेल मध्ये हे सर्व हार्डवेअर आणि सिस्टीम म्यानेजमेंट चे जॉब्स ऍमेझॉन ,गुगल,आय बी एम ,मायक्रोसॉफ्ट अश्या तगड्या क्लाउड कम्पन्यांकडे शिफ्ट झाले आहेत.आणि तिकडेही ऑटोमेशन झाल्याने अक्खे १०००० सर्व्हर्स चे डेटा सेंटर फक्त  ३-४ माणसे आरामात चालवू शकतात .एका डेटा सेंटर मध्ये किमान १००० ते कमाल ५००० कम्पन्या आपले वर्कलोड चालवू शकतात .त्यामुळे हेच सर्व्हर्स जर प्रत्येक ग्राहकाने ( कम्पनीनें) आपलं स्वतः विकत घेतले असते आणि चालवले असते  ,तर किमान १००० ते कमाल १००००  लोकांना विकेंद्रित रोजगार मिळाला असता . म्हणजे किती रोजगार नवीन तंत्रज्ञानानाने खाऊन टाकले हे भयावह आहे .

आपल्या देशातून हजारो इंजिनियर्स फ्रेशर्स म्हणून कम्पनी जॉईन करायचे तेव्हा त्यांना अपेक्षित ट्रेनिंग द्यायला वेळ आणि पैसे लागत असल्याने ,वाट पहाण्यापेक्षा ,त्यांना कम्पन्या अश्या लो लेव्हल कामास जुंपायच्या आणि त्यावरही बॉडी शॉपिंग करून बक्कळ पैसे कमवायच्या .म्हणजे आपला बंडू आणि बबडी जायची अमेरिकेला "इंजिनियर" म्हणून पण करायची दिवसभर सॉफ्टवेअर  टेस्टिंग चे काम जे आता रोबो आणि आभासी बुद्धिमत्ता असलेली मशिन्स करू शकतात . मूलभूत संशोधन आणि इनोव्हेशन न झाल्याने भारतीय आय टी कम्पन्या आता डायनोसॉर झाल्या आहेत . आणि त्याहून कालबाहय झाली आहेत ती आपली अभियांत्रिकी महाविद्यालये आणि त्यांचे जुनाट  अभ्यासक्रम ! आज मुलांना आय टी मध्ये डिग्री घेऊन सुद्धा आहेत त्या नोकऱ्या सुद्धा मिळत नाहीत कारण त्यांनी ४ वर्षे शिकलेले ज्ञान टाकाऊ झालेले असते . जग आज रुबी /पायथन /डॉकर  कंटेनर्स / नोड जे एस /मोंगो डीबी /कलाऊडन्ट/बिग क्वेरी /अपाचे हाडुप /स्पार्क आणि API  लायब्ररी इत्यादी कन्सेप्ट्स वापरून प्रोग्रामिंग करत असताना आपल्या अभ्यासक्रमात अजूनही शिकविले काय जाते ? तर जावा आणि C ++ ! मी व्यवसायाचा भाग म्हणून काही इंजिनियरिंग महाविद्यालयात मार्गदर्शन करण्यासाठी जातो तसेच बऱ्याच विद्यार्थ्यांशी बोलतो ,आणि ज्या पातळीवर तिकडे जे काही चालते आणि आज इंडस्ट्री ला काय हवे आहे यात जमीन अस्मानाचा फरक आहे .अर्थात काही कॉलेजेस मध्ये अपवादाने एखाद्या प्राध्यापकाच्या स्वतः च्या पुढाकारातून चांगले काही नवीन कोर्सेस सुरु झालेले आहेतही .पण ९० % कॉलेजेस अजूनही मागे आहेत .

दुसरा फटका : ग्लोबलायझेशन चा फुगा फुटला :

विसाव्या शतकाच्या अखेरीस असे म्हटले जाऊ लागले की इंटरनेट ,  आय टी आणि आऊटसोर्सिंग च्या व्यापक प्रसारामुळे जग जवळ आले आहे आणि यापुढे जग अधिकाधिक "ग्लोबल" बाजारपेठ होईल .थॉमस फ्रीडमन सारख्या प्रख्यात लेखकाने "वर्ल्ड इज फ्लॅट " सारखे बेस्टसेलर पुस्तक याच काळात लिहिले . पण आज परिस्थिती पहाता ,जागतिक पातळीवर उजव्या विचारसरणी च्या राजवटी अधिकाधिक सत्तेवर येऊ लागल्या आहेत .त्यामुळे बाहेरच्या लोकांना नोकऱ्या देणे म्हणजे अश्या राजवटी ज्या स्वप्नाळू राष्ट्रवाद आणि देशभक्ती च्या आभासी डोलाऱ्यावर उभ्या असतात त्यांना आवाहन देणे असे वाटू लागले आहे .आज जगभर विशेतः पाश्चात्य राष्ट्रात "बाहेरच्या" लोकांबद्दल तिरस्कार वाढतो आहे आणि "हे भारतीय आणि चिनी आले कमी पगारावर काम करायला आणि आपल्या पोटावर पाय द्यायला " अशी भावना वाढीस लागली आहे .अगदी महाराष्ट्रामध्ये काही राजकीय पक्ष उत्तर भारतीय आणि दाक्षिणात्य कष्टकरी जनते विरुद्ध जसा विखार पसरवतात तसेच हे . त्यामुळे आज परदेशी कम्पन्यांवर त्यांनी  आपले आय टी प्रोजेक्ट्स भारतीय आय टी कम्पन्यांना देऊ नये असा दबाव वाढतो आहे .

परदेशी व्यक्तींना देण्यात येणाऱ्या वर्क व्हिसा चे नियम सुद्धा कडक झाल्याने  नाईलाजाने भारतीय आय टी कम्पन्यांना त्या त्या देशातील स्थानिक नागरिकांना नोकऱ्या द्याव्या लागत आहेत आणि त्यामुळे आपल्या भारतीय "फॅक्टरी " मधून बी.ई .झालेल्या " इंजिनियर "कामगारांना कॅम्पस प्लेसमेंट सुद्धा मिळणे मुश्किल झाले आहे .

३.मग आता करायचे काय ?

कुठलेही क्षेत्र हे प्रवाही असते आणि त्या त्या क्षेत्रात होणाऱ्या बदलांचे आकलन आणि अंगीकार करणे हे स्पर्धेत टिकून राहण्यासाठी गरजेचे असते . आंधळेपणाने पालकांनी आपल्या मुलांना सरसकट कॉम्प्युटर आणि आय टी इंजिनियर बनवायच्या फॅक्टरी मध्ये टाकले तर भ्रमनिरास होण्याची शक्यता जास्त ! आय टी क्षेत्र बुडालेले नाही पण त्यात उपलब्ध होणाऱ्या रोजगाराचे प्रकार आणि त्याला लागणारी कौशल्य आणि लागणारी माणसांची संख्या या गोष्टी बदलल्या आहेत . तसेच केवळ परदेशी जाण्याचे तिकीट म्हणून आय टी कडे पाहू नये .आज जगात भारत ही सर्वात वेगाने वाढणारी दुसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था आहे . आपल्या देशाला प्रगती मध्ये अजून खूप पल्ला गाठायचा आहे .त्यामुळे शेती ,लघु आणि मध्यम उद्योग ,पायाभूत क्षेत्र ,डिजिटल इंडिया आणि अश्या अनेक गोष्टींसाठी संगणकीकरण आणि आय टी सोल्युशन्स ची गरज लागणारच आहे . पण पूर्वीसारखे ऑन साईट मिळणारा  "इझी डॉलर मनी " आणि इकडे देशात त्याच वेळी दणक्यात मिळणारा भारतीय रुपयामधला पगार या गोष्टी आता असणार नाहीत . थातुर मातुर खाजगी इंजिनियरिंग कॉलेज मधून पाट्या टाकून इंजिनियर झालेल्या मुलांना नोकरी लागणे सोडाच पण साधे कोणी इंटरव्हू ला सुद्धा बोलावणार नाही .

एकोणिसाव्या शतकात झालेल्या औद्योगिक क्रांती ने जुने रोजगार सम्पवले पण नवीन रोजगार सुद्धा निर्माण केले ! फक्त ज्यांनी त्याच्याशी जुळवून घेतले ते तगले .विसाव्या शतकाच्या मध्यात सुरु झालेल्या संगणकीकरणा मुळे आपले आयुष्य आमूलाग्र बदलले आणि परत काही जुने रोजगार सम्पवले पण नवीन रोजगार निर्माण सुद्धा केले .आय टी सोल्युशन्स मुळे कुठल्याही उद्योगाची  उत्पादकता आणि गुणात्मकता वाढते . म्हणजे बँकांचे संगणकीकरण झाल्याने काही लोकांच्या नोकऱ्या नक्की कमी झाल्या पण त्याच वेळी कोअर बँकिंग च्या नेटवर्क मुळे बँकाच्या शाखा सुद्धा अधिक सुरु करता आल्या आणि त्यामुळे त्या क्षेत्रात त्या प्रमाणात अधिक रोजगार निर्माण झाले . देशातील १९९१ च्या आर्थिक उदारीकरणांनंतर  तर वर नमूद केल्याप्रमाणे आपल्या देशातील एक अक्खी पिढी आय टी क्षेत्रात घुसली ! म्हणजे कालानुरूप रोजगार नष्ट होतात आणि नवीन क्षेत्र उदयास येते .

शेवटचा अतिशय महत्वाचा मुद्दा म्हणजे आय टी क्षेत्र तेव्हाच वाढू शकेल जेव्हा इतर उद्योग आणि व्यवसायांची वाढ होईल ! म्हणजे जास्त बँका वाढल्या तर त्याला लागणाऱ्या संगणक प्रणाली वाढतील,पायाभूत क्षेत्र वाढले तर स्मार्ट सिटीज साठी आय टी लागेलच  ,जास्त विमानकम्पन्या सुरु झाल्या तर एअरपोर्ट आणि एअरलाईन क्षेत्रात आय टी ची जास्त गरज लागेल ,जास्त उत्पादन उद्योग सुरु झाले तर ERP सारख्या सॉफ्टवेअर्स ना मागणी वाढेल ,जास्त मीडिया कम्पनीज सुरु झाल्या तर त्यांना लागणारे VFX /Animation इत्यादी रोजगार निर्माण होतील ...वगैरे वगैरे...त्यामुळे या सर्व क्षेत्राला सुद्धा वाढण्यासाठी प्रशिक्षित मनुष्यबळ हवे आहे ! मग आपल्या मुलाला अथवा मुलीला इंजिनियरिंग करायचेच असेल तर मेकॅनिकल /सिव्हिल/इलेक्ट्रिकल असे मूलभूत इंजिनियरिंग का करू नये ? बँकिंग/मीडिया मध्ये का त्याने करियर करू नये ? आय टी च करायचे तर चाकोरीबद्ध बी ई च्या डिग्री च्या मागे लागण्यापेक्षा  बेसिक ग्रॅज्युएशन करता करता साईड बाय साईड डेटा सायन्स /क्लाउड/मशीन लर्निंग अश्या नवीन क्षेत्रात स्पेशलाइज्ड कोर्सेस का करू नयेत ?सरकार मध्ये सुद्धा डिजिटल इंडिया मोहीम सुरु आहे मग आपल्या बबडी ने आय ए एस होऊन आय टी चा विधायक वापर करून सरकारी योजनांचे संगणकीकरण करवून घेण्याचे स्वप्न का पाहू नये ?

आणि नोकरीच का ..स्वतः चा स्टार्ट अप सुरु करण्याचे प्रयत्न सुद्धा करू नयेत ?

एव्हढे सगळे करियर ऑप्शन्स उपलब्ध असताना केवळ आय टी मध्ये नोकरी करून अमेरिकेला जाण्याचे टिपिकल मराठी मध्यमवर्गीय स्वप्न आपण का पहातोय ? मुलांना काय आवडते आणि त्यांना कशात गती आहे याचा विचार आपण कधी करणार ?

वाचा आणि विचार करा. आपली प्रतिक्रिया द्या
छगन शेटे LIC अभिकर्ता 9021374663
धन्यवाद