Saturday, 10 June 2017

संपूर्ण आयुर्वेद थोडक्यात

*संपूर्ण आयुर्वेद लिहिलंय शॉर्ट मध्ये,*
हे वाचल्यावर अक्षरशः काही वाचायची गरज नाही!
वाचा आणि पालन करा.

|| शरीराला आवश्यक खनिजं ||

*🔺कॅल्शिअम*
कशात असतं?
शेंगदाणे, तीळ, दूध, खोबरं, मुळा, कोबी. ज्वारी, राजगिरा, खरबूज, खजूर
कमतरतेमुळे काय होतं?
हृदयरोग, ऑस्टियोपोरोसिस, दंतरोग, केस गळणे
कार्य काय असतं?
शरीरातील सर्वात मुख्य खनिजं असून ते हाडांची मजबुती आणि शरीराच्या निर्मितीसाठी आवश्यक असतं.
🌺🌺🌺े

*🔺लोह*
कशात असतं?
खजूर, अंजीर, मनुका, सफरचंद, डाळिंब, पालक, सीताफळ, उस, बोर, मध, पपई आणि मेथी
कमतरतेमुळे काय होतं?
शरीरात रक्ताची कमतरता भासते. अशक्तपणा, कावीळ किंवा पोटात मुरडा येतो.
कार्य काय असतं?
शरीराच्या वाढीसाठी अतिशय आवश्यक असतं.
🌺🌺🌺े

*🔺सोडिअम*
कशात असतं?
मीठ, पाणी, बटाटा, आलं, लसूण, कांदा, मिरची, पालक, सफरचंद, कारलं
कमतरतेमुळे काय होतं?
रक्तदाबाशी निगडित समस्या, निद्रानाश, अंगदुखी, अपचन, मूळव्याधीसारखे आजार, मोतीबिंदू, बहिरेपणा, हात अणि पाय कडक होणे.
कार्य काय असतं?
शरीराला आवश्यक असणारी पाचक रसायनाची निर्मिती करतात, त्याचप्रमाणे शरीरात होणारा गॅस नष्ट होतो.
🌺🌺🌺े

*🔺आयोडिन*
कशात असतं?
शिंघाडा, काकडी, कोबी, राजगिरा, शतावरी, मीठ आणि लसूण.
कमतरतेमुळे काय होतं?
थायरॉइडची समस्या, केस गळणे, डिप्रेशन किंवा बैचेनी येणे.
कार्य काय असतं?
शरीरात उत्पन्न होणाऱ्या विषारी पदार्थापासून मेंदूला बचावण्याचं काम करतो.
🌺🌺🌺े

*🔺पोटॅशिअम*
कशात असतं?
सर्व प्रकारची धान्य, डाळ, संत्र, अननस, केळं, बटाटा, लिंबू, बदाम.
कमतरतेमुळे काय होतं?
अ‍‍ॅसिडिटी, त्वचेवर सुरकुत्या किंवा मुरुमं येणं, त्वचा रोग, केस पिकणे.
कार्य काय असतं?
शरीरात तंतू आणि यकृत यांना सुरळत ठेवण्याचं कार्य करतं.
🌺🌺🌺े

*🔺फॉस्फरस*
कशात असतं?
दूध, पनीर, डाळी, कांदा, टोमॅटो, गाजर, जांभळं, पेरू, काजू, बदाम, बाजरी आणि चणे.
कमतरतेमुळे काय होतं?
ऑस्टिओपोरोसिस, गतिमंद होणे, मानसिक थकवा, दंत रोग.
कार्य काय असतं?
मेंदूला ताजंतवानं ठेवण्याचं काम हे खनिजं करतं.
🌺🌺🌺े

*🔺सिलिकॉन*
कशात असतं?
गहू, पालक, तांदूळ, कोबी, काकडी, मध,
कमतरतेमुळे काय होतं?
कॅन्सर, त्वचारोग, बहिरेपणा, केस गळणे.
कार्य काय असतं?
जननेंद्रियांची कार्यक्षमता वाढवून शरीरातील तंतूना मजबूत करतात.
🌺🌺🌺े

*🔺मॅग्नेशिअम*
कशात असतं?
बाजरी, बीट, खजूर, सोयाबीन, दूध, लीची, कारलं.
कमतरतेमुळे काय होतं?
उदास होणे, आळस येणे, तणाव असणे, झोप न लागणे, बैचेनी, सोरायसिस, फोडं, नपुंसकता किंवा वांझपणा.
कार्य काय असतं?
पेशीचं कार्य सुधारतं. रेचक म्हणून काम करतं.
🌺🌺🌺े

🔺सल्फर
कशात असतं?
दूध, पनीर, डाळ, टोमॅटो, बटाटा, आलं, मिरची, सफरचंद, अननस, सुरण.
कमतरतेमुळे काय होतं?
प्रतीकारशक्ती कमी होते, केस गळतात, वजन वाढतं, मधुमेहाला आमंत्रण मिळतं.
कार्य काय असतं?
इन्सुलिनचं रेचन म्हणून कार्य करतं.
🌺🌺🌺े

*🔺क्लोरिन*
कशात असतं?
पानी, बीट, कोबी, मीठ, दूध, लिंबू, आवळा, मध.
कमतरतेमुळे काय होतं?
अ‍‍ॅसिडिटी, अल्सर, कॅन्सर, आणि अ‍‍ॅलर्जी.
कार्य काय असतं?
सोडिअम आणि पोटॅशिअमला पाचक बनवण्यासाठी सहायता करतं, त्याचप्रमाणे शरीरातील आम्लक्षाराचं संतुलन राखलं जातं.
🌺🌺🌺े

*🔺खाद्यपदार्थामधील खनिजं शरीराला मिळावीत म्हणून काय केलं पाहिजे.🔺*
» फळं किंवा भाज्या कापल्यानंतर कधीच धुवू नयेत. असं केल्याने त्यातील खनिजं पाण्यावाटे नष्ट होतात.
» डाळ, तांदूळ किंवा धान्यदेखील उकडण्यापूर्वीच स्वच्छ धुऊन घ्यावेत.
» काही धान्य, फळं तसंच भाज्यांच्या सालींमध्ये खनिजांचा मोठा प्रमाणावर साठा असतो. त्यामुळे अशा सालींचा आहारात समावेश करावा.
» दुधात खनिजांचा भरपूर स्रेत असतो म्हणूनच दूध जास्त प्रमाणात उकळू नये. दूध जास्त प्रमाणात उकळल्याने त्यातील खनिजं नष्ट होतात.
» फळं कापून खाण्याऐवजी शक्यतो आहे तशीच खावीत. उदाहरणार्थ, चिकू किंवा सफरचंद ही फळं संपूर्ण खावीत.
🌺🌺🌺े

*▫ब्लड प्रेशर  आणि  नियंत्रण▫*
*============================*

ब्लडप्रेशर असलेल्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. धकाधकीच्या जीवनात फास्ट फूड आणि अनियमित दिनचर्या या कारणामुळे या आजाराचे रुग्ण भारतातही मोठ्या प्रमाणात दिसून येत आहेत. ब्लडप्रेशरमुळे हृदयाचे आजार, स्ट्रोक अशा समस्या निर्माण होण्याची दाट शक्यता असते. ब्लडप्रेशरच्या रुग्णाला दररोज औषध घ्यावे लागते. आज  तुम्हाला काही घरगुती उपायांची माहिती देत आहोत. तुम्हालाही ब्लडप्रेशरचा त्रास असेल तुम्ही हे घरुगुती उपाय अवश्य करून पाहा. या उपायांनी तुमचे ब्लडप्रेशर नियंत्रणात राहील.
🌺🌺🌺े

*▫लसूण -*

ब्लडप्रेशरच्या रुग्णांसाठी लसूण अमृतासमान औषधी आहे. यामध्ये एलिसीन नावाचे तत्त्व असते, जे नायट्रिक ऑक्साइडचे प्रमाण वाढवते आणि यामुळे आपल्या मासपेशींना आराम मिळतो. ब्लडप्रेशरच्या डायलॉस्टिक आणि सिस्टॉलिक कार्यप्रणालीला आराम मिळतो. यामुळे ब्लडप्रेशरच्या रुग्णांनी दररोज लसणाची एक पाकळी अवश्य खावी.
🌺🌺🌺े

*▫शेवगा -*

यामध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन आणि व्हिटॅमिन तसेच खनिज लवण आढळून येतात. एका संशोधनानुसार, या झाडाच्या पानांचा अर्क पिल्यास ब्लडप्रेशरच्या डायलॉस्टिक आणि सिस्टॉलिक कार्यप्रणालीवर सकारत्मक प्रबाव पडतो. ब्लडप्रेशरच्या रुग्णाने मसूरच्या डाळीसोबत शेवग्याचे सेवन करावे.
🌺🌺🌺े

*▫जवस -*

जवसामध्ये अल्फा लिनोनेलिक अ‍‍ॅसिड भरपूर प्रमणात असते. हे एक प्रकारचे महत्त्वपूर्ण ओमेगा-३ फॅटी अ‍‍ॅसिड आहे. विविध संशोधनामध्ये समोर आले आहे, की ज्या लोकांना हायपरटेन्शनची समस्या असेल त्यांनी जेवणात जवसाचा उपयोग अवश्य करावा. यामुळे कॉलेस्टेरॉलची मात्रा कमी होते आणि याच्या सेवनाने ब्लडप्रेशर नियंत्रणात राहते.
🌺🌺🌺े

*▫विलायची -*

एका संशोधनानुसार विलायचीचे नियमित सेवन केल्यास ब्लडप्रेशर व्यवस्थित राहते. याच्या सेवनाने शर
हळद   Turmeric
🌺🌺🌺े

*गुणधर्म  -----*

तिखट,  कडवट,  रूक्ष,  गरम,  जंतुनाशक,  रक्तशुद्धीकारक,  वात,  पित्त,  कफ  शमन  करणारी.

*उपयोग -----*

*१)*  जखमेवर  किंवा  मुका  मार  लागणे.  हळद  लावा.
*२)*  रक्ती  मुळव्याध  -  बकरीचे  दूध  +  हळद  घ्या.
*३)*  सर्दी,  कफ,  खोकला -  गरम  दूध  +  तूप  +  हळद  घ्या.
*४)*  जास्त  लघवी  -  पांढरे  तीळ  +  गुळ  +  हळद  घ्या.
*५)*  आवाज़  बसणे  -  हळद  +  गुळ  गोळ्या  करून  खा.
*६)*  काविळ  -  ताक  +  हळद.
*७)*  ताप  -  गरम  दूध  +  हळद  +  काळीमिरी  पुड.
*८)*  लघवितून  पू  जाणे  -  आवळा  रस  +  हळद  +  मध.
*९)*  मुतखडा  ( स्टोन )  -   ताक  +  हळद  +  जूना  गुळ.
🌺🌺🌺े

      #    *आरोग्य   संदेश*    #
   
हळदच  आहे  जंतुनाशक, रक्तशुद्धीकारक,
नक्कीच   आजारांना    आहे   ती   मारक.

*तोंडाचे  विकार*

*कारणे -----*

जागरण  करणे,  जास्त  तिखट  खाणे,  पोट  साफ  नसणे,  पित्त  होणे,  अपचन  होणे,  उष्णता  वाढणे,  रोगप्रतिकारक  शक्ति  कमी  होणे. व्यसन  करणे.

*उपाय -----*

*१)*  जेवणात  गाईचे  तूप  व  ताक  घ्या.
*२)*  गुलकंद  खा.
*३)* ज्येष्ठमधाची  कांडी  चघळावी.
*४)*  दुधाची  साय  आणि  शंखजीरे  मिक्स  करून  तोंडातून  लावा.
*५)*  हलका  आहार  घ्या.
*६)*  वरील  कारणे  कमी  करा. त्रिफळा  चूर्ण  घेऊन  पोट  साफ  ठेवा.
*७)*  दही  उष्ण  असल्याने  जास्त  खाऊ  नका.
*८)*  जाईची  पाने  किंवा  तोंडलीची  पाने  किंवा  पेरूची  पाने  किंवा  उंबराची  कोवळी  कांडी  चावून  थुंका.
*९)*  नियमित  प्राणायाम  करा.
*१०)*  आवळा  पदार्थ  खा.
*११)*  एकाचवेळी  सर्व  उपाय  करू  नका.
🌺🌺🌺े

*जीभेची  साले  निघत  असल्यास*

*उपाय -----*

*१)*  पुदिन्याची  पाने  आणि  खडीसाखर  मिक्स  करून  चावून  थुंकत  रहा.
*२)*  एक  केळ  गाईच्या  दूधाबरोबर  खावे.
*३)*  त्रिफळाच्या  काड्याने  गुळण्या  करा. जंतुसंसर्ग  कमी  होतो.
🌺🌺🌺े

     #     *आरोग्य  संदेश*    #

*व्यायामानेच  पचनशक्ती  वाढवा*

*उपाय -------*

*१)*  नारळाची  शेंडी  जाळून  राख  बनवा.
*२)*  ती  राख  २/३  ग्रँम  ताकातून  घ्या.
*३)*  रिकाम्या  पोटीच  घ्या.
*४)*  सकाळ  व  संध्याकाळ  घ्या.
*५)*  मुळा /  सुरण  भाजी  खा.
*६)*  अक्रोड  खाऊन  वर  दूध  प्या.
*७)*  जेवणात  कच्चा  कांदा  खा.
*८)*  श्वास  रोखू  बटरफ्लाय  व्यायाम  करा.
*९)*  हलका  आहार  घ्या.  गाईचे  तुप  खा.
*१०)*  पोट  साफ  ठेवा.
*११)*  नियमित  प्राणायाम  करा.
*१२)*  चोथायुक्त  पदार्थ  खा.
*१३)*  शाकाहारी  राहण्याचा  प्रयत्न  करा.
*१४)*  एकाचवेळी  सर्व  उपाय  करू  नका.
🌺🌺🌺े

#     *आरोग्य   संदेश*      #

पोट  राहूद्या  नियमित  साफ,
मुळव्याधीचा   चूकेल   व्याप.

*काळ्या द्राक्षांचे 10 फायदे, वाचाल तर रोज खाल*

*1. डायबिटीस, ब्लड प्रेशरवर नियंत्रण*

काळी द्राक्ष नियमित खाल्यामुळे डायबिटीस आणि ब्लड प्रेशर नियंत्रणात राहतं. काळ्या द्राक्षांमध्ये रेसवटॉल नावाचा पदार्थ असतो, ज्यामुळे रक्तात इन्सुलिन वाढतं. ही द्राक्ष खाल्यामुळे शरिरातलं रक्त वाढायलाही मदत होते, त्यामुळे ब्लड प्रेशरचा त्रास होत नाही.

*2. एकाग्रता वाढायला मदत*

काळी द्राक्ष खाल्यामुळे एकाग्रता आणि स्मरणशक्ती वाढायला मदत होते. तसंच मायग्रेनसारखा आजारही या द्राक्षांमुळे बरा होतो.
🌺🌺🌺े

*3. हार्ट ऍटेकचा धोका कमी*

काळ्या द्राक्षांमध्ये सायटोकेमिकल्स असतात जे हृदयाला स्वस्थ ठेवतात. तसंच या द्राक्षांमुळे कोलेस्ट्रॉलही नियंत्रणात राहतं, ज्यामुळे हार्ट ऍटेकचा धोका कमी होतो.

*4. वजन होतं कमी*

नियमित काळी द्राक्ष खालली तर वजन कमी होऊ शकतं. यामध्ये असणारा एँटीऑक्साईड शरिरात जास्तीचं असलेलं टॉक्सिन्स बाहेर काढायला मदत करतो. ज्यामुळे वजन कमी होतं.
🌺🌺🌺े

*5. अस्थमा होतो बरा*

काळी द्राक्ष शरिरात असलेल्या बॅक्टेरिया आणि फंगसला मारायचं काम करतात, जी इंफेक्शन तयार करतात. पोलिओविरुद्ध लढण्यासाठीही द्राक्ष हा चांगला उपाय आहे. काळ्या द्राक्षांमुळे अस्थमा बरा व्हायला मदत होते.

*6. कॅन्सरला रोखा*

काळी द्राक्ष खाल्यामुळे ब्रेस्ट, लंग, प्रोस्टेट आणि आतड्यांच्या कॅन्सरच्या धोक्यापासून वाचता येऊ शकतं.

*7. अपचन होत नाही*

काळ्या द्राक्षांमध्ये शुगर, ऑरगॅनिक ऍसिड आणि पॉलीओस जास्त प्रमाणात असल्यामुळे अपचन आणि पोटाची जळजळ होत नाही.
🌺🌺🌺े

*8. डोळ्यांसाठी गुणकारी*

दृष्टी सुधारण्यासाठीही काळी द्राक्ष गुणकारी आहेत.

*9. सुरकुत्या होतात कमी*

काळ्या द्राक्षांमुळे डोळ्यांखाली होणारा काळा भाग कमी करतो. तसंच त्वचेवर पडणाऱ्या सुरकुत्याही यामुळे कमी होतात.
🌺🌺🌺े

*10.  केस गळती थांबवायला मदत*

काळ्या द्राक्षांमध्ये असलेल्या विटॅमिन इ मुळे केस गळणं, केस पांढरे होणं यासारख्या समस्या दूर होतात. द्राक्ष खाल्यानं केसांच्या मुळापर्यंत रक्त पोहोचायला मदत होते, त्यामुळे केस मुलायम आणि मजबूत होतात.
शरीरावरील  काळे  डाग
🌺🌺🌺े

*उपाय -----*

*१)*  नियमित  प्राणायाम  करा.
*२)*  पचनशक्ती  स्ट्राँग  ठेवा.
*३)*  पोट  साफ  राहूद्या.
*४)*  पालेभाज्या  व  फळभाज्या  खा.
*५)*  सकाळी  ऊठल्यावर  तोंडातील  लाळ  सर्व  डागांवर  चोळून  लावा.  तोंड  धुण्यापूर्वीची  लाळ  पाहिजे.  हा  जबरदस्त  उपाय  आहे.
*६)*  कोरफड  पानातील  गर  लावा.
*७)*  आवळा  रस /  पदार्थ  घ्या.
*८)*  डागांवर  कच्च्या  पपईचा  रस  लावा.
*९)*  कडुलिंबाची  पाने  आंघोळीच्या  पाण्यात  टाकून  पाणी  उकळवून  घ्या.  नंतर  त्याच  पाण्याने  आंघोळ  करा.  मात्र  साबण  वापरू  नका.
🌺🌺🌺े

     #     *आरोग्य   संदेश*     #

करा  योग,  पळतील  रोग. संपतील  भोग.
🍲 आहार तज्ञ - ऋजुता दिवेकर यांच्या मते  आहाराविषयीच्या संकल्पना.

🍲  *नियोजनबद्ध आहार कोणता?*

आपला भारतीय संस्कृतीतील आहार योग्य आहे. भाजी, पोळी, भात, आमटी, पोहे, उपमा हे पदार्थ अतिशय पौष्टिक आहेत. आपण आपला आहार सोडून अन्य पदार्थांचे पर्याय शोधतो. म्हणून खाद्यसंस्कृती बदलते आहे. आपले वेगळेपण आपणच जपले पाहिजे. आपल्या चौरस आहाराची किंमत आपल्यालाच समजत नाही, याची खंत आहे.
🌺🌺🌺े

🏃 *वाढलेली चरबी कशी कमी करावी?*

आपल्या खाण्या-पिण्याला शिस्त असेल, तर चरबी वाढणार नाही. वाढली तरी कमी होण्यासही मदत होईल. सलग ३० मिनिटे एका जागेवर बसू नका. आपण शरीराचा पुरेसा वापर करीत नाही म्हणून चरबी वाढते. दरवर्षी अर्ध्या किंवा एक किलोने वजन वाढते. वजन वाढते, याचा अर्थ आपण आळशी होत आहोत, हे समजून घ्या. म्हणून गरज आहे ती `मूव्ह मोअर अँड सिट लेस` या मंत्राची.
🌺🌺🌺े

🍇 *कोणती फळे खावीत?*

आंबा, केळे, सीताफळ, चिकू आणि द्राक्ष ही फळे प्रत्येक भारतीयाच्या आहारात आवर्जून आलीच पाहिजेत. आरोग्यासाठी केळे हे सर्वोत्तम असल्याचा दुजोरा आता जगभरातून मिळत आहे. बाळाच्या आहारातही आईच्या दुधानंतर फळांमध्ये केळ्याचाच समावेश होतो.

◆ *मधुमेहासाठी आहार कसा असावा?*

खरं तर मधुमेहींनी जे पदार्थ खाल्ले पाहिजेत, तेच पदार्थ डॉक्टर टाळण्यास सांगतात. मात्र, भात, केळं आणि तुपाचा समावेश आहारात अवश्य असावा. दोन जेवणांमध्ये फार अंतर ठेऊ नये, व्यायाम भरपूर करावा आणि अगदी झोपेपर्यंत टीव्ही पाहणे टाळावे.
🌺🌺🌺े

◆ *शुगर-फ्रीचा वापर करावा का?*

शुगर फ्री आहारातून वर्ज्यच करा. आहारात जेवढी साखर आवश्यक असते, तेवढी खावी. लाडू, हलवा यासारख्या घरी बनणाऱ्या गोड पदार्थांत वापरली जाणारी साखर आरोग्यासाठी चांगली असते. ऊस आणि गूळ यांना एकमेकांशी रिप्लेस करू नये. आवश्यकतेनुसार पदार्थात साखर किंवा गुळाचा वापर करावा. शरीरातील उष्णता वाढवायला गुळाची मदत होते.
🌺🌺🌺े

◆ *वाढतं वजन आणि ताण यांचा संबंध कसा आहे?*

वाढत्या ताणामुळे वजन वाढतं. फर्गेट, फर्गिव्ह आणि फॉर्वर्ड या सूत्रानुसार जीवन जगायला सुरवात केल्यास आयुष्यातील तणाव कमी होतील.
🌺🌺🌺े

● *कडधान्य कशी खावीत..*

आपण उसळ करताना कडधान्य शिजवून घेतो. त्यामुळे मोड आलेली कडधान्ये कच्ची कशासाठी खायची? ती उकडून, उसळ करून खाणेच योग्य.

● *जेवणात कोणते तेल आणि किती वापरावे?*

शेंगदाण्याचे घाण्यावरून करून आणलेले तेल स्वयंपाकासाठी सर्वोत्तम आहे. शंभर ग्रॅम शेंगदाण्याचे २५ ते ३० टक्के तेल निघते. बाकी चोथा वाया जातो. तेल बनविण्याची पारंपरिक पद्धत अतिशय शुद्ध आहे. आहारात तेल बदलण्याची गरज नसते. पिशव्या किंवा डब्यांमध्ये मिळणारे आणि हृदयाच्या आकाराचे चित्र डब्यांवर दिसणारे तेल आरोग्याला योग्य नाही. तेल जेवढे वापरावेसे वाटते, तेवढे वापरावे. लोणचे, तळलेला पापड, भजी हे पदार्थ आहारात आलेच पाहिजेत. जास्त तेल पोटात जाईल, म्हणून ते खाणे टाळू नये.
🌺🌺🌺े

🚫 *आहारातून ड जीवनसत्त्व कमी झाल्यास काय होते?*

शरीरात हवे असलेले फॅट मिळत नाहीत, म्हणून ड जीवनसत्व कमी होते. वेळेवर त्यावर उपाय न केल्यास हाडे दुखतात, केस गळतात, त्वचेवर डाग पडतात. मधुमेह किंवा कॅन्सर होण्यापर्यंत ही पातळी जाऊ शकते.

*आजकाल बिझी रुटीनमुळे व्यायाम करणे अनेकांना शक्य होत नाही. व्यायामाला दुसरा काही पर्याय आहे का?*

आजच्या युगात आपण नवीन गाडी घेतली, तरीसुद्धा ती नियमितपणे चालवतो. बाहेरगावी गेलो, तरी शेजारी किंवा नातेवाईकांना गाडी सुरू ठेवायला सांगतो. व्यायामाचेसुद्धा तसेच आहे. व्यायामाला कोणताही पर्याय नाही, तो नियमितपणे केलाच पाहिजे. अंग दुखतं, म्हणून व्यायाम करत नाही, अशी सबब अनेक जण देतात. पण खरे तर व्यायाम करत नाही, म्हणून अंग दुखतं. व्यायाम करण्यासाठी आठवड्यात फक्त १५० मिनिटे लागतात. आठवड्याच्या व्यायामाचे नीट प्लानिंग करून ते वेळापत्रक पाळले जायला हवे. व्यायाम अनेकदा उद्यावर ढकलला जातो, त्याचं योग्य नियोजन होत नाही, त्याचं गांभीर्य लोकांच्या लक्षात येत नाही.
🌺🌺🌺े

✌ *दोन- दोन तासाने खा, असे सांगितले जाते. हे योग्य की अयोग्य?*

सकाळी उठल्या उठल्या आपण चहाने सुरुवात केली, तर दिवसभराची भूक मरते आणि दिवसभराचे रुटीन बिघडते. दोन- दोन तासाने खावे. सकाळी उठून एखादं केळ खाल्लं की, आपण नंतर नीट नाश्ता करू शकतो. सकाळी नाश्त्याला डोसा, घावन, थालीपीठ असं खावं. त्यानंतर जेवणाआधी पन्हं, कोकम सरबत यासारखं पेय घेऊन त्यानंतर आपण नियमित जेवण घेऊ शकतो. जेवताना शक्यतो पाणि पिऊ नये,जेवणाच्या अर्धा तास आधी एक ग्लास पाणि प्यावे व जेवणानंतर एक तासाने पाणि प्यावे.त्यानंतर मध्ये एखाद- दुसरं फळ, संध्याकाळी चार ते सहाच्या मध्ये पुन्हा सकाळच्या नाश्त्याप्रमाणे आहार घेतला की, आपल्याला रात्री फार भूक लागत नाही. मग रात्री पेज किंवा भात खावा, म्हणजे आपल्याला शांत झोप लागू शकते.

🍚 *घरी केलेले चिवडा, लाडू खाण्याची योग्य वेळ कोणती?*

चिवडा आणि लाडू आपण कधीही खाण्यासाठीच तयार करून ठेवतो. चिवड्यासारखी व्हर्सेटाइल गोष्ट कोणतीच नाही. चिवडा कशातही मिक्स करून खाऊ शकतो, त्यामुळे चिवडा कोणत्याही वेळी खाता येईल. लाडूसुद्धा संध्याकाळी ५-६च्या आसपास किंवा सकाळी नाश्त्यालासुद्धा लाडू चांगला.
🌺🌺🌺े

👨👩 *वाढत्या वयाबरोबर कसा व्यायाम करावा ?*

वयानुसार आपलं शरीर बदलतं, पण ते बिघडू देऊ नये. आपलं रुटीन नियमित फॉलो केलं पाहिजे. आठवड्याला १५० मिनिटे व्यायाम केला, तर ते कोणत्याही वयाला चालतं. वय वाढलं म्हणून व्यायाम कमी करण्याची गरज नाही.

💧 *सकाळी उठून गरम पाणी प्यायल्याने चरबी कमी होते, असा समज आहे. यात किती तथ्य आहे?*

सकाळी उठल्यावर आवड म्हणून गरम पाणी पिण्यास काहीच हरकत नाही. पण त्यामुळे चरबी अजिबात कमी होत नाही. सकाळी उठल्यावर साधं, माठाचं किंवा गरम कोणतेही पाणी आपण पिऊ शकतो.

🍲 *साखरेऐवजी गूळ वापरल्याने फायदा होतो का ?*

प्रत्येक गोष्टीचा एक विशिष्ट गुणधर्म असतो. त्यामुळे ज्या गोष्टीत साखर वापरण्याची गरज आहे, त्यात साखर वापरली पाहिजे आणि ज्या गोष्टीत गूळ वापरण्याची गरज आहे, त्यात गूळच वापरला पाहिजे. अन्यथा पदार्थाची चव बिघडते. साखर ही चांगलीच आहे. उगाच साखरेच नाव वाईट आहे. साखरेने उष्णता कमी होते, तर गुळाने उष्णता वाढते. त्यामुळे आपण पदार्थानुसार साखर किंवा गूळ वापरावा,
🌺🌺🌺े

🙆 *केस, त्वचेसाठी काय सल्ला.*

केस गळण्यापासून वाचण्यासाठी तसेच तजेलदार त्वचेसाठी आहारात भात, नारळ, तूप यांचा समावेश हवा. आहारामध्ये हळदीचा समावेश असण्याची गरज आहे. हळद केसांच्या वाढीसाठी फायदेशीर आहे.

🌞 *आपला दिवस कसा असतो?*
मी ज्या शहरात असेन, त्यानुसार दिवस प्लॅन करते. ऋतूमानानुसार आणि स्थानिक पदार्थांना आहारात प्राधान्य देतेत. रोज सकाळी पोहे खाते. सध्या उन्हाळ्यामुळे कोकम आणि पन्हं घेते. जे आवडतं, तेच पदार्थ खाते. जे पदार्थ शरीराला लागतात, ते आवर्जून खाते. कारण, आपण जे खातो, तेच आपल्या चेहऱ्यावर दिसते.

🍌 *फळ किंवा सुका मेव्याने दिवसाची सुरुवात करा*

🍲 *नाश्त्याला पोहे, उपमा, शिरा खा*

🍷 *जेवणापर्यंतच्या वेळेत सरबत घ्या*

🍎 *जेवणानंतर एखादे फळ खा*

🍲 *संध्याकाळी गूळ, तूप, पोळी किंवा फोडणीचा भात*

😇  *रात्री   ८.३०  च्या दरम्यान हलका आहार घ्या*

हलका आहार घेतल्याने झोप चांगली लागते आणि दुसऱ्या दिवशी व्यायाम करण्यास उत्साह राहतो.
🌺🌺🌺े

*आहारातून  उपचार*

पुढील  आजार  झाल्यास  त्यांच्या  खाली  दिलेले  अन्नपदार्थ  खा.  आजार  लवकर  बरे  होतील.

*१)  आम्लपित्त :-*
काळी  मनुका,  आलं,  थंड  दुध,  आवळा, जिरे  खा.

*२)  मलावरोध  :-*
पेरु,  पपई,  चोथा /  फायबरयुक्त  असलेले  अन्न,  दुध + पाणी,  कोमटपाणी ,  त्रिफळा  चूर्ण  घ्या.  पोटाचे  व्यायाम  करा,  टाँयलेटला  बसल्यावर  हनुवटी  प्रेस  करा.  लवकर  पोट  साफ  होते.

*३)  हार्टअटैक / ब्लॉकेज :-*
लसूण,  कांदा,  आलं  खा.  रक्ताच्या  गाठी  होत  नाहीत.  रक्ताभिसरण  उत्तम  होते.

*४)  डिसेन्टरी / जुलाब :-*
कापूर  +  गुळ  एकत्र  करून  खा.  त्यावर  पाणी  प्या.  लगेच  गुण  येतो.

*५)  खोकला :-*
२ / ३   काळीमिरी  चोखा.  दिवसातून  तीन  वेळा.  खोकला  थांबतो.

*६)  मुळव्याध :-*
नारळाची  शेंडी  जाळून  राख  ताकातून  दिवसातून  २ / ३  वेळा  घ्या.  चांगला  गुण  येतो.  रामदेव  बाबांचा  उपाय  आहे.

*७)  दारूचे  व्यसन :-*
वारंवार  गरम  पाणी  प्या.  तसेच  दारू  पिण्याची  आठवण  येईल  त्यावेळी  जरूर  गरमच  पाणी  प्या.  २ / ३  महीन्यात  दारू  सुटेल.

*८)  डोळे  येणे :-*
डोळ्यांना  गाईचे  तुप  लावा.  आराम  पडेल.  कापूर  जवळ  ठेवा.  संसर्ग  वाढणार  नाही.

*९)  स्टोन :-*
पानफुटीची  पाने  खा.  कुळीथ  भाजी  खा.  भरपूर  पाणी  प्या.

*१०)   तारूण्यासाठी :-*
भाज्यांचा  रस,  आरोग्य  पेय,  फळे  खा. गव्हांकुराचा  रस,  Green  Tea  ,प्या.
🌺🌺🌺े

    📢     *आरोग्य  संदेश*    🔔

*संतुलित  आहारात  उपचार  आहेत खरे, सर्वच    आजार    नक्कीच   होतील  बरे.*


*आर्टीकल जरा मोठे आहे ,पण जीवनावश्यक आहे*🙏🏼🙏🏼
🌺🌺🌺े

#स्रोत - आयुर्वेदाचा शोध लावणारे आणि जगातील पहिली शस्त्रक्रिया करणारे ऋषी सुश्रुत आणि वागभट्ट यांचा ग्रंथावर आधारित.

Mahiti cha adhikar kaida (RTI)2005

*माहितीचा अधिकार कायदा (RTI)२००५ म्हणजे काय-*
      सरकारी कामांमध्ये पारदर्शकता आणून भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी, तसंच लोकांना हवी ती माहिती उपलब्ध करून खरी लोकशाही राबवण्याच्या हेतूने माहितीचा अधिकार कायदा २००५ अस्तित्वात आला.

केंद्र सरकार, संघराज्य-क्षेत्र प्रशासन, राज्यप्रशासन यांच्या नियंत्रणाखालील शासकीय, निमशासकीय कार्यालय तसेच सरकारकडून प्रत्यक्ष-अप्रत्यक्षरीत्या निधी पुरवल्या जाणाऱ्या अशासकीय संस्था, मंत्रालय, महानगरपालिका, नगरपालिका, कलेक्टर, रेल्वे, न्यायालये, एस.टी., वीज वितरण कंपनी, रेशनिंग कार्यालय, ग्रामपंचायत, तहसील, पोलीस, शाळा, महाविद्यालय, पासपोर्ट, इन्कम टॅक्स, प्रॉविडण्ट फंड, म्हाडा, पोर्ट ट्रस्ट, पोस्ट इत्यादी कार्यालयांतून या कायद्यांतर्गत माहिती मागवता येते.

*माहिती म्हणजे काय?*

माहिती म्हणजे कोणत्याही सरकारी विभागातील सर्व प्रकारचे दफ्तर, कागदपत्रे, टिपण, ई-मेल, एखाद्या अधिकाऱ्याने स्वत: नमूद केलेले मत, लिखित स्वरूपातला आदेश, वर्तमानपत्राद्वारा प्रसिद्ध केलेली माहिती, परिपत्रक, अध्यादेश, नोंदवही, कोणताही लिहिलेला कागद, कच्चे टिपण, मेमो, पत्रव्यवहार तसंच खासगी संस्थ- कंपन्यांकडून सरकार मिळवू शकणारी माहिती.

वरील माहिती आपण नागरिक छायांकित प्रतीच्या स्वरुपात, इलेक्ट्रॉनिक स्वरूपात अथवा छापील स्वरूपात मिळवू शकतो. तसंच सरकारी कामाची, अभिलेखांची, कागदपत्रांची पाहणी व तपासणी करू शकतो.

*या कायद्याचा सामान्य लोकांना उपयोग काय?*

सजग नागरिक म्हणून या अधिकाराचा वापर करून अनेक सामाजिक तसेच वैयक्तिक बाबींमधील भ्रष्टाचार उघडकीस आणण्यास योग्य ती माहिती मिळविता येते. या अधिकारातंर्गत आपल्या घरी गॅस सिलेंडर वेळेवर येत नसेल तर हिंदुस्तान पेट्रोलियमलाच- आमच्या भागातील डीलरला किती गॅस सिलेंडर देता? आमचे बुकींग कधी झाले? घरी गॅस कधी दिला? इतर लोकांना गॅस कधी आणि किती दिले? हे प्रश्न विचारू शकता. यातून सिलेंडरची अनाधिकृत विक्री कोठे व कशी केली जात आहे याचा सुगावा लागतो. तसेच या महितीद्वारे तक्रार नोदंवून अशा प्रकारचा भ्रष्टाचार रोखण्यास मदत होते.                                                                                                 *माहिती म्हणजे नक्की काय?*

माहिती म्हणजे नोंदी, कागदपत्रे, शेरे, मेमो, ई-मेल्स, सल्ले, मते, प्रसिद्धीपत्रके, आदेश,परिपत्रके, रोजनिशी, करारनामा, अहवाल, कागद, उदाहरणे, नमुने या आणि अशा स्वरूपातील कोणतेही साहित्य तसेच ईलेक्ट्रॉनिक माध्यमात असलेली कोणत्याही स्वरूपाची खासगी माहिती, जी प्रचलित कायद्यातील तरतूदीनुसार सार्वजनिक प्राधिकरणास जाणुन घेण्याचा अधिकार आहे.
 मात्र यांत फाईलींवर मारलेल्या शेर्‍यांचा समावेश होत नाही.

*माहितीचा अधिकार म्हणजे काय ?*

*या अधिकारात खालील बाबींचा समावेश आहे:*

• काम, कागदपत्रे, नोंदी यांची तपासणी करणे • कागदपत्रे किंवा नोंदी यांच्या प्रमाणित प्रती मिळवणे तसेच त्यांची टिपणे काढणे. • साहित्याच्या प्रमाणित प्रती मिळवणे • माहिती छापील प्रत (प्रिंटआऊटस्), सीडी, फ्लॉपी, टेप्स, व्हिडिओ रेकॉर्डस् किंवा इतर कोणत्याही ईलेक्ट्रॉनिक माध्यमाद्वारे मिळवणे.

*या कायद्यात माहिती नेमकी कोणत्या स्वरुपाची घेता येते ?*

 माहितीचा अधिकार म्हणजे कोणत्याही कार्यालयाकडे असलेली किंवा त्यांच्या नियंत्रणात असलेली व या नियमानुसार मिळवता येण्याजोगी माहिती ! माहिती जाणून घेणे, आवश्यक कागदपत्रे मिळवणे हा प्रत्येक नागरिकाचा हक्क असून तो मूलभूत अधिकार आहे. असा हा अधिकार २००५ या वर्षामध्ये सर्वांनाच मिळाला आहे. या अधिकाराचा वापर करुन परिसरात सुरु असलेल्या कामांची माहिती घेता येते. *उदा. कार्यालयाचे नाव, पत्ता, दूरध्वनी क्रमांक, कार्यालयाची वेळ, जनमाहिती अधिकार्‍यांची नावे, कार्यालयाची कामकाजाची पद्धत, उद्दिष्टे, कार्यालयात उपलब्ध असलेली माहिती, विविध अर्जांचे नमुने, कर्मचार्‍यांची नावे व इतर माहिती, उपलब्ध निधी, लाभार्थ्यांची यादी, योजनांची माहिती, योजनांवर अथवा लाभार्थ्यांवर झालेला खर्च, परिपत्रके, उपलब्ध प्रकाशने व त्याची किंमत, कर्मचार्‍यांचे वेतन, अंदाजपत्रक अशा प्रकारची माहिती घेता येते.*

*जन माहिती अधिकारी म्हणजे कोण?*

 हे अधिकारी सर्व प्रशासकीय खात्यांत किंवा कार्यालयांत सार्वजनिक अधिकार्यांद्वारे नेमण्यात आलेले असतात. ते नागरीकांना त्यांनी मागितलेल्या माहितीनुसार माहिती देण्याचे काम करतात. या कामासाठी जर ते सहाय्यकाची मदत घेत असतील तर अशा व्यक्तीसही जन माहिती अधिकारी म्हणुन वागवले जाते.

*कोणा कडून माहिती घेता येणार नाही ?*

*राष्ट्राच्या संरक्षणाच्या दॄष्टीने संवेदनाशील क्षेत्र, व्यक्तीगत स्वरुपाची, खाजगी कंपनी, विनाअनूदानीत संस्था,खाजगी विद्यूत पुरवठादार कंपनी इ. कडून या कायद्याच्या आधारे माहिती मागता येत नाही.*

1 ज्यामुळे भारताची सार्वभौमता आणि एकात्मता, सुरक्षा,वैज्ञानिक किंवा आर्थिक बाबी,परराष्ट्रीय संबंध आदींना धोका पोहोचणार असेल किंवा ज्यामुळे एखाद्या गुन्ह्याला प्रोत्साहन मिळू शकते अशी कोणतीही माहिती.

2 कोणत्याही न्यायालयाने जी माहिती प्रसिद्ध करण्यास नकार दिला आहे किंवा जी माहिती दिल्याने न्यायालयाचा अवमान होईल अशी कोणतीही माहिती.

3 जी माहिती उघड केल्याने संसद किंवा विधीमंडळाच्या स्वातंत्र्याला बाधा येईल अशी माहिती.

4 व्यावसायिक गोपनीयता,व्यापारी गुपिते किंवा बुद्धीजीवी मालमत्ता यांचा समावेश,असणारी माहिती जी उघड केल्याने तिसर्या पक्षाच्या स्पर्धात्मक स्थानाला धक्का पोहोचू शकतो. अर्थात सदर माहिती उघड करण्यास प्रतिस्पर्धी पक्षाची हरकत नसल्यास ही माहिती उघड केली जाऊ शकते.
5 एखाद्या व्यक्तीच्या विश्वसनीय नात्यांमधुन मिळालेली माहिती. मात्र माहिती उघड करण्यास प्रतिस्पर्धी पक्षाची हरकत नसल्यास ही माहिती उघड केली जाऊ शकते.

6 परराष्ट्र सरकारकडून मिळवलेली माहिती. जी माहिती उघड केल्यामुळे एखाद्या व्यक्तीच्या जीवितास धोका निर्माण होऊ शकतो अथवा ज्यामुळे एखाद्या कायद्याची अंमलबजावणी करण्यास गुप्तपणे मदत करणार्या व्यक्तीवे नाव उघड होऊ शकते किंवा सुरक्षेच्या कारणांस्तव असलेली माहिती.

7 ज्यामुळे शोधकार्यात किंवा आरोपींवरील कारवाईत अडथळा निर्माण होऊ शकतो अशी माहिती.

8 मंत्रीमंडळ,सचिव आणि इतर अधिकारी यांच्यात होणार्या चर्चेचे तपशील व इतर कॅबिनेट कागदपत्रे.

9 जिचा सामाजिक कार्याशी अथवा जनहिताशी काहीही संबंध नाही अशी वैयक्तीक माहिती किंवा जी उघड केल्याने एखाद्या व्यक्तीच्या एकांताचा भंग होऊ शकतो किंवा त्याच्या खाजगी आयुष्यावर आक्रमण होऊ शकते अशी कोणतीही माहिती.

10 मात्र एखाद्या घटनेत व्यक्तीला अथवा पक्षाला होणारा त्रास जनहिताच्या तुलनेत कमी महत्त्वाचा असेल तर अशी माहिती उघड केली जाऊ शकते.

*अर्ज कसा करावा?*

• जनमाहिती अधिकार्याकडे इंग्लिश, हिंदी किंवा त्या राज्याच्या अधिकृत भाषेत लेखी किंवा ईलेक्ट्रॉनिक माध्यमाद्वारे आपल्या हव्या असलेल्या माहितीचा तपशील असणारा अर्ज सादर करावा • माहिती मिळवण्या मागील कारण स्पष्ट करणे अर्जदारावर बंधनकारक नाही. • ठरवून दिलेली फी भरावी.

*माहिती मिळवण्यासाठी काही खर्च येतो का ?*

 होय, माहितीसाठीच्या कागदपत्रांचा खर्च पुढील प्रमाणे येतो. मात्र अर्जदार दारिद्र्यरेषेखालील असेल तर- खर्च लागत नाही.
कागदपत्रांचा खर्च :- दस्तऐवजाचे वर्णन खर्च
विविध कागदपत्रांची झेरॉक्स एका पानास रु. २
आवश्यक माहितीची सीडी किंवा फ्लॉपी प्रत्येकी ५० रु.
कार्यालयातील कागदपत्रे पहायची असल्यासपहिल्या तासासाठी खर्च नाही.
तासाभरापेक्षा अधिक वेळ पहायची असल्यास-प्रत्येक तासासाठी ५ रु.
आवश्यक माहिती पोस्टाने हवी असल्यास -पोस्टाचा खर्च द्यावा लागतो.
अर्जदार या फीचे पुर्नतपासणी करण्यासाठी योग्य त्या समितीकडे अपील करू शकतो.
 • जर जनमाहिती अधिकारी ठरवून दिलेल्या वेळेत माहिती देण्यास अयशस्वी ठरल्यास त्याने ती माहिती अर्जदारास विनामुल्य देणे बंधनकारक आहे.

*अर्जदाराने अपील कसे करावे?*

१)अर्जदाराने मागितलेली माहिती अपूर्ण, चुकीची, दिशाभूल करणारी असेल किंवा माहिती नाकारल्यास संबंधित अर्जदारास जनमाहिती अधिकार्‍याविरुद्ध अपिलीय अधिकार्‍यांकडे अपील करता येते. हे अपील ३० दिवसांच्या आत करता येते. हा अपिलीय अधिकारी जनमाहिती अधिकार्‍यापेक्षा अधिक अनुभवी असणारा, कामाच्या सर्व बाबी माहिती असलेला असतो. त्याने अनुभवाचा व अधिकाराचा वापर नि:पक्षपातीपणे करावयाचा असतो. अपील असे करावे :
1) अपिलासाठी अर्ज सादर करताना कागदावर २० रुपयांचा न्यायालय मुद्रांक चिकटवावा.
2) अर्जावर नांव, पत्ता, जनमाहिती अधिकार्‍याचा तपशील द्यावा. त्यात कोणती अपेक्षित माहिती मिळाली नाही याचा उल्लेख करावा. एकूणच तक्रारीचे स्वरुप/अपिलाचे कारण स्पष्टपणे लिहावे.
3) शेवटी सही करुन अर्ज दाखल करावा.
4) अर्जाची पोच घ्यावी.
अपिलीय अधिकार्‍याकडे अपील दाखल केल्यावर अर्ज केल्याच्या दिनांकापासून ४५ दिवसांच्या आत माहिती मिळू शकते.

*दुसरे अपील कसे करावे ?*

अर्जदाराने मागितलेली माहिती अपिलीय अधिकार्‍याकडूनही न मिळाल्यास किंवा चुकीची, अर्धवट मिळाल्यास, समाधान न झाल्यास अर्जदार हा दुसरे अपील राज्य माहिती आयुक्तांकडे ९० दिवसाच्या आत करु शकतो. दुसरे अपील असे करावे :
*1) अपिलासाठी अर्ज सादर करताना कागदावर २० रुपयांचा न्यायालय मुद्रांक चिकटवावा.*
*2) अर्जावर नांव, पत्ता, जनमाहिती अधिकार्‍याचा तपशील द्यावा. त्यात कोणती अपेक्षित माहिती मिळाली नाही याचा उल्लेख करावा. एकूणच तक्रारीचे स्वरुप/अपिलाचे कारण स्पष्टपणे लिहावे.*
*3) शेवटी सही करुन अर्ज दाखल करावा.*
*4) अर्जाची पोच घ्यावी.*
*--------------------------------------------*

        *जोडपत्र-"अ"                                                                                  .(नियम 3 पहा)*

   *माहितीचा अधिकार अधिनियम,2005अन्वये*

*माहिती मिळवण्यासाठीच्या अर्जाचा नमुना*

*प्रति,*
   *राज्य जन माहिती अधिकारी,*

*(कार्यालयाचे नाव व पत्ता) :*
  *ग्रामपंचातय कार्यालय*

*(1) अर्जदाराचे पुर्ण नाव :*______________________________

*2)पत्ता :*________________________________

*3)हव्या असलेल्या माहितीचा तपशिल :*_______________________________

*(एक) माहीतीचा विषय :*________________________________

*(दोन)ज्या कालावधी संबंधात माहीती हवी असेल तो कालावधी :*______________________________

*(तीन)हव्या असलेल्या माहीतीचे वर्णन :*______________________________

*(चार)माहीती टपालाद्वारे हवी की व्यकतीश: हवी आहे:*___________________________________

*(प्रत्यक्ष टपालखर्च अतिरीक्त फी मध्ये समाविष्ठ करणेत येईल.)*______________________________

*(पाच) टपालाद्वारे हवी असल्यास*____________________________

*(4) अर्जदार दारीद्रयरेषेखालील आहे किंवा कसे :*____________________________
*(असल्यास त्याबाबतच्या पुराव्याची छायांकित प्रत जोडावी.)*
"ही माहीती नक्की वाचा" आपणा सर्वांना भारतीय असण्याचा अभिमान वाटावा अशी माहिती या मेसेज मधून मिळाली. ती आवडली म्हणून आपणास शेअर करीत आहे.
1. भारताने लावलेले शोध 
------------------------------
A. बुद्धिबळ
-----------------------------
B. शून्य
-----------------------------
C. आयुर्वेद - २५०० वर्षांपूर्वी चरकाने लावला
-----------------------------
D. जलपर्यटन (Navigation)- ६००० वर्षांपूर्वी, Navy हा शब्ददेखील
संस्कृत शब्द ‘नौ’ ने तयार झाला आहे.
------------------------------
E. पृथ्वीला सूर्याभोवतीची प्रदक्षिणा पूर्ण करण्यासाठी ३६५ दिवस लागतात
हा शोध खरा भास्कराचार्यांनी शेकडो वर्षांपूर्वी लावला होता.
-------------------------------
F. सर्जरीचा शोध २५०० वर्षांपूर्वी सुश्रुताने लावला होता. त्याकाळी सुश्रुत
आणि त्याचा संघ, मोतीबिंदू, ब्रेन सर्जरी, प्लास्टिक सर्जरी, कृत्रिम अवयव
यासारख्या सर्जरी करायचे.
-----------------------------
G. योग - ५००० वर्षांपूर्वी
-----------------------------
H. मर्शिअल आर्टचा शोध बौध भिक्षुकांनी प्रथम भारतात लावला होता
आणि त्यानंतर तो उत्तर आशियात गेला.
------------------------------
I. IEEE ने सिद्ध केलं आहे की wireless communication चा शोध
डॉ जगदीश बोस यांनी लावला होता, मार्कोनीने नव्हे.
----------------------------
J. जगातील पहिले विद्यापीठ (university) इ.स. पूर्व ७०० वर्षं – तक्षशीला
विद्यापीठ जिथे जगभरातून १०,५०० हून अधिक विद्यार्थी शिक्षण घ्यायचे
आणि ६० हून अधिक विषय शिकवले जायचे.
------------------------------
K. ब्रिटीश राजवट येण्यापूर्वी इ.स. १७१८ ला भारत हा जगातील सर्वात
श्रीमंत देश होता.
------------------------------
L. भारताच्या १०,००० वर्षांच्या इतिहासात, भारताने कोणत्याही इतर
देशावर विनाकारण हल्ला केला नाही.
------------------------------
M. भारताबाहेर:
i. अमेरिकेतील ३८% डॉक्टर भारतीय आहेत.
ii. अमेरिकेतील १२% वैज्ञानिक भारतीय आहेत.
iii. NASA तील ३६% कर्मचारी भारतीय आहेत.
iv. Microsoft चे ३४% कर्मचारी भारतीय आहेत.
v. IBM चे २८% कर्मचारी भारतीय आहेत.
vi. Intel चे १७% कर्मचारी भारतीय आहेत.
vii. Xerox चे १३% कर्मचारी भारतीय आहेत.
-------------------------------
N. अमेरिका, रशिया आणि चीनला स्पर्धा देणारी भारत ही जगातील
एकमेव उत्कृष्ट स्पेस एजेन्सी आहे. पहिल्याच प्रयत्नात मंगळावर यान
यशस्वीरीत्या पोहचवणारा भारत पहिला देश आहे आणि या यात्रेचा
एकंदरीत खर्च हा हॉलीवूड चित्रपट Gravity च्या खर्चापेक्षाही कमी
होता. २००८ मध्ये एकाच प्रयत्नात १० उपग्रह अंतराळात स्थिर करून भारताने
वर्ल्ड रेकॉर्ड केला होता.
------------------------------
O. Satelite मध्ये भारताचा जगात दुसरा क्रमांक लागतो.
-------------------------------
P. दुध, काजू, नारळ, चहा, आलं, हळद आणि काळीमिरी उत्पादनात
भारताचा पहिला तसेच गहू, तांदूळ, शेंगदाणे, साखर आणि
मत्सोत्पादनात भारताचा जगात दुसरा क्रमांत लागतो.
-------------------------------
Q. जगातील सर्वाधिक गुराढोरांची संख्या भारतात आहे.
------------------------------
R. जगातील सर्वाधिक पोस्ट ऑफिस भारतात आहेत (१.५० लाख)
-------------------------------
S. जगातील सर्वाधिक वैज्ञानिक आणि इंजिनिअर भारतात आहेत.
-------------------------------
T. हॉटमेल आणि प्लेटीअम चीप चे निर्माते भारतीय आहेत.
------------------------------
U. भारतीय रेल्वे ही जगातील सर्वाधिक रोजगार पुरवणारी संस्था असून १६ करोड ५० लोकांना ती रोजगार पुरवते. १ लाख ९००० किमी इतका विस्तार, ७,००० स्टेशन, दररोज धावणाऱ्या १३,००० ट्रेन, १ लाख वीस हजार पूल असलेली आणि करोडो प्रवाशांची ने आण करणारी जगातील सर्वात मोठी यंत्रणा म्हणजे भारतीय रेल्वे.
------------------------------
M. एक वर्षाला ४०० हून अधिक चित्रपट निर्माण करणारी, ७२ लाख
लोकांना रोजगार पुरवणारी आणि ६,००० करोड हून अधिक वार्षिक
मिळकत असलेली बॉलीवूड ही जगातली एकमेव फिल्म इंडस्ट्री आहे.
------------------------------
V. मुंबई डबेवाल्यांच्या अचूकतेच प्रमाण ९९.९९९९९९ टक्के इतकं आहे.
दररोज ३,५०० डबेवाले १.५ लाख ऑफिस कर्मचार्यांना अचूकपणे डबे
पुरवतात. असं उदाहरण जगात दुसरं नाही.
o.१३ लाख खाडी फौज आणि १८ लाखाची राखीव इतकी मोठी फौज
असलेलं भारतीय लष्कर हे जगातील एकमेव लष्कर आहे.
-------------------------------
W. स्टेट बँक ऑफ इंडिया ही जगातील सर्वाधिक शाखा असलेली एकमेव बँक आहे.
----------------------------
X. टाटा, SBI, इन्फोसिस या जगातील उच्च २०० कंपन्यातील यादीत पहिल्या ५० मध्ये आहेत.
------------------------------
Y. डुंगारपुरच्या स्वयंसेवकांनी २४ तासात ६ लाख झाडे लावण्याचा
विश्वविक्रम नोंदविला आहे.
------------------------------
Z. भारतीय BCCI ही जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेट संस्था आहे.
------------------------------
 जगातील सगळ्यात मोठी बुद्धिमान तरुण लोकसंख्या भारतात आहे. ही लोकसंख्या अमेरिकेच्या एकूण लोकसंख्येपेक्षा जास्त आहे.
------------------------------
B. प्रचंड गड-किल्ले, स्मारके आणि नैसर्गिक सौंदर्याने नटलेला
भारत हा जगातील एकमेव देश आहे.
-----------------------------
सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे
१८ प्रमुख भाषा,
१,६०० द्वितीय भाषा,
२९ प्रमुख सण,
६,४०० जाती आणि उपजाती
 ७ संघराज्य,
२९ राज्य,
६ मोठे धर्म,
५२ मोठ्या जमाती
इतकी प्रचंड विविधता असून एकात्मता जपणारा भारत हा जगातील एकमेव देश आआपणा सर्वांना भारतीय असण्याचा अभिमान वाटावा अशी माहिती या मेसेज मधून मिळाली.
ती आवडली म्हणून आपणास शेअर करीत आहे.
Be Pround To Be Indian......
प्रतिकारशक्ती

आज आपण प्रतिकारशक्ती चांगली कशी ठेवता येईल या विषयी थोडी माहिती घेऊ.

काही छोटय़ा गोष्टी नियमित केल्या तर आपण आपली प्रतिकारशक्ती त्यातल्या त्यात चांगली ठेवू शकतो.

तुळस



रोगप्रतिकारशक्ती वाढवायची असेल तर  तुळशीची आठ ते दहा पानं रोज चावून  खावीत. यामुळे शरीरात जंतूसंसर्गाला अटकाव होतो.



तूप



कोणत्याही वयोमानात शरीराचं पोषण करायचं असेल तर अर्धाचमचा तूप आवजरून खावं. तुपामुळे शरीराला वंगण मिळतं. अनेकजण कौतुकानं आपल्या आहारात चीज, बटर असल्याचं सांगतात. पण जी कमाल अर्धा चमच तूप करतं ती या पदार्थाना जमत नाही.



आवळा-लिंबू



लिंबामध्ये मोठ्या प्रमाणात क जीवनसत्त्वं असतं. एक अख्खं लिंबू आपण खावू शकत नाही. पण लिंबाची एक फोड मात्र सहज खावू शकतो. पण लिंबू खावं म्हणजे लिंबूचं खावं. लिंबाचं लोणचं नव्हे.

आवळा हा प्रामुख्यानं हिवाळ्यात मिळतो. पण मुरंबा, मोरआवळा,  कॅंण्डी या स्वरूपात वर्षभर आवळा उपलब्ध असतो. रोज थोडा तरी आवळा पोटात गेला तरी आपली रोगप्रतिकारशक्ती उत्तम राहण्यास मदत होते.



पाणी



आरोग्याच्यादृष्टीनं पाण्याचं महत्त्वं वेगळं सांगण्याची गरज नाही. पाण्याची तहान लागली तर ती पाण्यानंच भागेल याची काळजी घेतल्यास शरीरात योग्य प्रमाणात पाणी जाईल. तहान लागली पाणी नाही म्हणून मिल्क शेक/ नारळपाणी/ज्यूस प्यायलं म्हणून तहान भागत नाही. उलट शरीराची पाण्याची गरज पूर्ण झाली नाही तर पाण्याला पर्याय म्हणून पोटात टाकलेले पदार्थ शरीर उलटवून टाकण्याचीच शक्यता जास्त. पाणी  आवश्यकतेपेक्षा कमी प्यायलं किंवा जास्त प्यायलं तरी अपाय होतो.


नाचणी सत्वं



दिवसभर शरीरातली ऊर्जा टिकवून धरायची असेल तर रोजच्या न्याहारीत नाचणीचं सत्त्व हवंच. नाचणीच्या सत्त्वामध्ये सर्व मुख्य जीवनसत्त्वं असतात. हे नाचणी सत्त्वं दिवसातून एकदा तरी शरीरात जाणं आवश्यक असतं.

नाचणीची भाकरी खावी .



बीट



दुपारच्या जेवणात कोशिंबीर असावी. पण ती काकडी, टोमॅटो नाहीतर मुळयाचीच हवी असं नाही. उलट रोजच्या जेवणात बीटाची कोशिंबीर खाल्ल्यास एकाचवेळेस शरीराला जीवनसत्त्वं, खनिजं, अॅंन्टिऑक्सिडंटस मिळतात. बीट हे उत्तम शक्तीवर्धक आहे त्यामुळे  वृध्दांच्या आहारात तर बीटाचा समावेश असायलाच हवा.




दूध-हळद



रात्री जेवल्यानंतर एक कपभर दुध उकळून त्यात एक चमचा हळद घालावी. आणि ते दूध रोज प्यावं. या दुधात चव म्हणून अनेकजण साखर घालतात. पण तसं करू नये.

लहान मुलांना दूध-हळद ऐवजी दूधात थोडं केशर आणि एखादा बदाम भिजवून,  वाटून   ते दूध द्यायला हवं.  दुधात केशराच्या एक-दोन काडय़ाच वापराव्यात.



 दही आणि ताक



रोजच्या जेवणात कोणी दही खावं आणि कोणी ताक घ्यावं याबाबतही काही नियम आहेत. प्रौढ स्त्रिया-पुरूष आणि वृध्दांनी रोजच्या जेवणात ताक घ्यावं. ताक म्हणजे दह्यात पाणी घालून घुसळून केलेलं ताक नव्हे. तर लोणी घुसळल्यानंतर शिल्लक राहणा:या अंशाला आहारशास्त्रात  ताक म्हणतात. आणि या ताकाच्या सेवनानं शरीराला फायदा होतो. लहान मुलांना ताक देवू नये. त्याऐवजी रोज दुपारच्या किंवा  संध्याकाळच्या जेवणात त्यांना दोन चमचे ताजं दही द्यावं.  मुलांना दही देतांना त्यात साखर घातली जाते. त्याऐवजी दह्यामध्ये खडीसाखर घालावी.

 

गुळाचा खडा आणि खडीसाखर.



घरात वृध्द आणि लहान मुलं असले की आपल्या डब्यातला गूळ आणि खडीसाखर कधीही संपू देवू नये. वृध्दांना दिवसभर तरतरी राहण्यासाठी गुळाचा खडा खूप उपयुक्त असतो. शिवाय चक्कर आल्यास, तोल जात आहे असं वाटल्यास, घसा कोरडा पडल्यास गुळाचा खडा किंवा खडींसाखर तात्काळ शरीरात ऊर्जा निर्माण करतं.

लहान मुलं एका जागी कधीच बसत नाही. दिवसभर त्यांच्या अॅक्टीव्हीटी चालूच असतात. यामुळे त्यांच्या शरीराला ऊर्जेची गरज असते. ही ऊर्जा खडीसाखरेतून मिळू शकते. मुलांना शाळेच्या डब्यात एक छोट्या डब्बीत खडीसाखर घालून आवश्य द्यावी.

   🌷आरोग्यम् धनसंपदा 🌷
कढीपत्ता : भारतीय वनांमध्ये आणि भारतीय स्वयंपाक घरातले एक महाऔषध
:::::::::::::::::::🐚🐋🌾
कढीपत्ता हा भारतीय आहारातला एक अविभाज्य घटक असून ते एक सुंदर आणि साधे औषध आहे ...पोह्यातला किंवा उपम्यातला कढीपत्ता वेचून बाहेर काढणारे लोक पाहिले त्यांच्या अज्ञानाची भयंकर कीव येते ....
:::::::::::::::::::🐚🐋🌾
कढीपत्त्याचे झाड बर्यापैकी मोठे आणि भारतीय सदाहरित वनांमध्ये सहज सापडते .. जंगलातला कढीपत्ता जास्त गडद रंगाचा आणि घमघमीत सुगंध असणारा असतो ...त्याला बर्याचदा बिया लागलेल्या सापडतात या बिया गोळा करून अंगणात लावल्या कि फार चांगल्या पद्धतीने रुजतात ....आणि झाड मोठे झाले कि त्याच्या बिया आजूबाजूला पडून नित्यनेमाने कंटाळा येईल इतकी खोलवर मुळे असलेली झाडे उगवतात .....
:::::::::::::::::::🐚🐋🌾
कढीपत्त्याचे आहार आणि औषध अशा अनुषंगाने उपयोग पाहूया :🐚🐋🌾
१) कढीपत्ता आपण आहारात एक विशिष्ट सुंगंधी चव यावी यासाठी वापरतो ... प्रत्यक्षात कढीपत्त्या मध्ये असलेले तेल हे जिभेवरच्या चवीची संवेदना वाढवते ... त्यामुळे जेवण रुचकर लागते ...
:::::::::::::::::::🐚🐋🌾
२) जुलाब लागले असता कढीपत्त्याच्या ताज्या पानांचा रस एक अर्धा कप पिला कि पोटातल्या वेदना आणि जुलाबाचे वेग वेगाने नियंत्रणात येतात ...
:::::::::::::::::::🐚🐋🌾
३) कढीपत्ता पचनास चांगली मदत करतो ज्यांना अजीरणाचा सारखा त्रास होतो , जेवल्यावर अस्वस्थ वाटते , पोटात ग्यास पकडतो ....त्यांनी जेवल्यावर कढीपत्त्याची दहा पाने चटणी करून सैंधव मीठ मिसळून खावीत ...
:::::::::::::::::::🐚🐋🌾
४) कढीपत्ता हा तारुण्य टिकवून ठेवणारा आहे .... नियमित कढीपत्ता खाणारे लोक लवकर म्हातारे होत नाहीत ...
:::::::::::::::::::🐚🐋🌾
५) मधुमेही रुग्णांनी कढी पत्त्याची दहा बारा कच्ची पाने दिवसातून तीनदा चावून खावीत याने रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित राहायला फार मदत होते ...
:::::::::::::::::::🐚🐋🌾
७) कोलेस्टेरॉल वाढले असेल कढीपत्त्याची अनशापोटी वीस पाने चावून खावीत ....
:::::::::::::::::::🐚🐋🌾
८) कढीपत्त्याची पाने वाळवून चूर्ण करून ती खोबरेल तेलात मिसळून लावावीत ...केस पांढरे होत नाहीत ...शिवाय केसांची गळती कमी होऊन केस लांब वाढायला मदत होते ...
:::::::::::::::::::🐚🐋🌾
९) कर्करोगाने पिडीत रुग्ण केमो आणि रेडियो थेरपी घेत असताना त्यांच्या शरीरातील सर्वसामान्य पेशींवर सुद्धा फार घातक परीणाम होऊन शरीराचे भयंकर नुकसान होते .... अशा रुग्णांना दिवसातून तीन वेळा कढीपत्त्याची दहा पाने खडीसाखर सोबत चावून खायला लावावीत ... रुग्णाला बराच आराम मिळतो
:::::::::::::::::::🐚🐋🌾
१०) सर्दी खोकल्या सारखे आजार सारखे होत असतील तर अशा लोकांनी सकाळी अनशापोटी कढीपत्त्याची पंधरा पाने चावून खावीत ...
:::::::::::::::::::🐚🐋🌾
११) यकृताच्या आजारात कढीपत्ता म्हणजे अमृत आहे ... कोणत्याही प्रकारच्या काविळीत कढीपत्ता चावून खाणे म्हणजे अगदी साधा घरगुती उपाय आहे ...
:::::::::::::::::::🐚🐋🌾
१२) अंगावर सारखे करट उठून त्रास होत असेल तर कढीपत्त्याची पोटातून कच्ची पाने चावून खाल्ल्यास आणि बाहेरून पानांची चटणी करून लावल्यास खूप आराम मिळतो ...
:::::::::::::::::::🐚🐋🌾
१३) पित्त वाढून सकाळी पित्ताची उलटी होत असेल तर मिरी, आले आणि सैंधव मिसळून कढीपत्त्याची पाने कुटून एकत्र करून खावे याने पित्त वाढत नाही आणि उलटी आणि मळमळ होत नाही ....
:::::::::::::::::::🐚🐋🌾
१४) कढीपत्ता नियमित सेवन केला तर डोळ्यांचे विकार कमी होतात ....
:::::::::::::::::::🐚🐋🌾
कढीपत्त्याबद्दल लिहावे तितके कमीच आहे ... असा हा बहुगुणी आणि आरोग्यसंपन्न कढीपत्ता आहारात नियमित ठेवा ... कच्चा चावून खा .... आरोग्य प्राप्ती होईलच यात शंका नाही.

Share this post.
"ही माहीती नक्की वाचा" आपणा सर्वांना भारतीय असण्याचा अभिमान वाटावा अशी माहिती या मेसेज मधून मिळाली. ती आवडली म्हणून आपणास शेअर करीत आहे.
1. भारताने लावलेले शोध 
------------------------------
A. बुद्धिबळ
-----------------------------
B. शून्य
-----------------------------
C. आयुर्वेद - २५०० वर्षांपूर्वी चरकाने लावला
-----------------------------
D. जलपर्यटन (Navigation)- ६००० वर्षांपूर्वी, Navy हा शब्ददेखील
संस्कृत शब्द ‘नौ’ ने तयार झाला आहे.
------------------------------
E. पृथ्वीला सूर्याभोवतीची प्रदक्षिणा पूर्ण करण्यासाठी ३६५ दिवस लागतात
हा शोध खरा भास्कराचार्यांनी शेकडो वर्षांपूर्वी लावला होता.
-------------------------------
F. सर्जरीचा शोध २५०० वर्षांपूर्वी सुश्रुताने लावला होता. त्याकाळी सुश्रुत
आणि त्याचा संघ, मोतीबिंदू, ब्रेन सर्जरी, प्लास्टिक सर्जरी, कृत्रिम अवयव
यासारख्या सर्जरी करायचे.
-----------------------------
G. योग - ५००० वर्षांपूर्वी
-----------------------------
H. मर्शिअल आर्टचा शोध बौध भिक्षुकांनी प्रथम भारतात लावला होता
आणि त्यानंतर तो उत्तर आशियात गेला.
------------------------------
I. IEEE ने सिद्ध केलं आहे की wireless communication चा शोध
डॉ जगदीश बोस यांनी लावला होता, मार्कोनीने नव्हे.
----------------------------
J. जगातील पहिले विद्यापीठ (university) इ.स. पूर्व ७०० वर्षं – तक्षशीला
विद्यापीठ जिथे जगभरातून १०,५०० हून अधिक विद्यार्थी शिक्षण घ्यायचे
आणि ६० हून अधिक विषय शिकवले जायचे.
------------------------------
K. ब्रिटीश राजवट येण्यापूर्वी इ.स. १७१८ ला भारत हा जगातील सर्वात
श्रीमंत देश होता.
------------------------------
L. भारताच्या १०,००० वर्षांच्या इतिहासात, भारताने कोणत्याही इतर
देशावर विनाकारण हल्ला केला नाही.
------------------------------
M. भारताबाहेर:
i. अमेरिकेतील ३८% डॉक्टर भारतीय आहेत.
ii. अमेरिकेतील १२% वैज्ञानिक भारतीय आहेत.
iii. NASA तील ३६% कर्मचारी भारतीय आहेत.
iv. Microsoft चे ३४% कर्मचारी भारतीय आहेत.
v. IBM चे २८% कर्मचारी भारतीय आहेत.
vi. Intel चे १७% कर्मचारी भारतीय आहेत.
vii. Xerox चे १३% कर्मचारी भारतीय आहेत.
-------------------------------
N. अमेरिका, रशिया आणि चीनला स्पर्धा देणारी भारत ही जगातील
एकमेव उत्कृष्ट स्पेस एजेन्सी आहे. पहिल्याच प्रयत्नात मंगळावर यान
यशस्वीरीत्या पोहचवणारा भारत पहिला देश आहे आणि या यात्रेचा
एकंदरीत खर्च हा हॉलीवूड चित्रपट Gravity च्या खर्चापेक्षाही कमी
होता. २००८ मध्ये एकाच प्रयत्नात १० उपग्रह अंतराळात स्थिर करून भारताने
वर्ल्ड रेकॉर्ड केला होता.
------------------------------
O. Satelite मध्ये भारताचा जगात दुसरा क्रमांक लागतो.
-------------------------------
P. दुध, काजू, नारळ, चहा, आलं, हळद आणि काळीमिरी उत्पादनात
भारताचा पहिला तसेच गहू, तांदूळ, शेंगदाणे, साखर आणि
मत्सोत्पादनात भारताचा जगात दुसरा क्रमांत लागतो.
-------------------------------
Q. जगातील सर्वाधिक गुराढोरांची संख्या भारतात आहे.
------------------------------
R. जगातील सर्वाधिक पोस्ट ऑफिस भारतात आहेत (१.५० लाख)
-------------------------------
S. जगातील सर्वाधिक वैज्ञानिक आणि इंजिनिअर भारतात आहेत.
-------------------------------
T. हॉटमेल आणि प्लेटीअम चीप चे निर्माते भारतीय आहेत.
------------------------------
U. भारतीय रेल्वे ही जगातील सर्वाधिक रोजगार पुरवणारी संस्था असून १६ करोड ५० लोकांना ती रोजगार पुरवते. १ लाख ९००० किमी इतका विस्तार, ७,००० स्टेशन, दररोज धावणाऱ्या १३,००० ट्रेन, १ लाख वीस हजार पूल असलेली आणि करोडो प्रवाशांची ने आण करणारी जगातील सर्वात मोठी यंत्रणा म्हणजे भारतीय रेल्वे.
------------------------------
M. एक वर्षाला ४०० हून अधिक चित्रपट निर्माण करणारी, ७२ लाख
लोकांना रोजगार पुरवणारी आणि ६,००० करोड हून अधिक वार्षिक
मिळकत असलेली बॉलीवूड ही जगातली एकमेव फिल्म इंडस्ट्री आहे.
------------------------------
V. मुंबई डबेवाल्यांच्या अचूकतेच प्रमाण ९९.९९९९९९ टक्के इतकं आहे.
दररोज ३,५०० डबेवाले १.५ लाख ऑफिस कर्मचार्यांना अचूकपणे डबे
पुरवतात. असं उदाहरण जगात दुसरं नाही.
o.१३ लाख खाडी फौज आणि १८ लाखाची राखीव इतकी मोठी फौज
असलेलं भारतीय लष्कर हे जगातील एकमेव लष्कर आहे.
-------------------------------
W. स्टेट बँक ऑफ इंडिया ही जगातील सर्वाधिक शाखा असलेली एकमेव बँक आहे.
----------------------------
X. टाटा, SBI, इन्फोसिस या जगातील उच्च २०० कंपन्यातील यादीत पहिल्या ५० मध्ये आहेत.
------------------------------
Y. डुंगारपुरच्या स्वयंसेवकांनी २४ तासात ६ लाख झाडे लावण्याचा
विश्वविक्रम नोंदविला आहे.
------------------------------
Z. भारतीय BCCI ही जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेट संस्था आहे.
------------------------------
 जगातील सगळ्यात मोठी बुद्धिमान तरुण लोकसंख्या भारतात आहे. ही लोकसंख्या अमेरिकेच्या एकूण लोकसंख्येपेक्षा जास्त आहे.
------------------------------
B. प्रचंड गड-किल्ले, स्मारके आणि नैसर्गिक सौंदर्याने नटलेला
भारत हा जगातील एकमेव देश आहे.
-----------------------------
सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे
१८ प्रमुख भाषा,
१,६०० द्वितीय भाषा,
२९ प्रमुख सण,
६,४०० जाती आणि उपजाती
 ७ संघराज्य,
२९ राज्य,
६ मोठे धर्म,
५२ मोठ्या जमाती
इतकी प्रचंड विविधता असून एकात्मता जपणारा भारत हा जगातील एकमेव देश आआपणा सर्वांना भारतीय असण्याचा अभिमान वाटावा अशी माहिती या मेसेज मधून मिळाली.
ती आवडली म्हणून आपणास शेअर करीत आहे.
Be Pround To Be Indian......
अचलपूरचा इतिहास
‘अचलपूरचा इतिहास म्हणजेच वऱ्हाडचा इतिहास’ असा अभिमानपूर्वक उल्लेख ज्या शहराबद्दल केला जातो, ते अचलपूर (आणि परतवाडा). या शहरातील ऐतिहासिक वास्तूंमुळे गतकाळातील वैभवाची साक्ष पटते. पौराणिक काळात जैन धर्मातील इल नावाच्या राजाने हे नगर वसवल्याने त्याला ‘एलिचपूर’ असे नाव पडले. आज ते अचलपूर या नावाने परिचित आहे.
एलिचपूर ते अचलपूर या शेकडो वर्षांच्या प्रवासात या नगराने इतिहासाला कलाटणी देणाऱ्या अनेक घटना अनुभवल्या. मुस्लिम राजवटीत नबाबांचा थाट या शहराने पाहिला. मराठय़ांच्या विरोधात इंग्रजांनी सैनिकी व्यूहरचना याच शहराबाहेरून आखली. कापड आणि रेशीम उद्योगाचा सुवर्णकाळ पाहणाऱ्या या शहरात नंतर या व्यवसायावर अवकळा आल्याचेही लोकांना दिसले. सुंदर बागांनी नटलेल्या शहरातील बगिचे नाहीसे झाले. अमरावती जिल्ह्य़ातील सर्वात मोठे तालुक्याचे शहर म्हणून या शहराची ओळख असली तरी अचलपूर जिल्ह्य़ाचे मुख्यालय बनावे, ही अनेक वर्षांची मागणी केव्हा तरी पूर्ण होईल, अशी अपेक्षा अचलपूरकर बाळगून आहेत.
अचलपूरच्या सभोवताली असलेला परकोट आणि चार भव्य दरवाजे या शहराच्या गतवैभवाचे दर्शन घडवतात. दुल्हा दरवाजा, तोंडगाव दरवाजा, बुंदेलपुरा दरवाजा आणि हिरापुरा दरवाजा, अशी या द्वारांची नावे आहेत. एलिचपूर ही एकेकाळी विदर्भाची राजधानी होती. त्याकाळी तब्बल ४० हजार घरे शहरात होती. मुस्लिम राजवटीत अचलपूर शहरात ५४ वस्त्या होत्या. त्या वस्तीला तेव्हा पुरा म्हणत. आजही ३५ च्या वर ‘पुरे’ अस्तित्वात आहेत. मुस्लिम नबाबांच्या नावावर या पुऱ्यांची नावे आहेत. समरसखानने (१७२४) वसवला तो समरसपुरा, सुल्तानखानने (१७२७) वसवला तो सुल्तानपुरा, सलाबतखान याची पत्नी अन्वरखातून हिच्या नावावरून अन्वरपुरा, नामदार गंज, नसीबपुरा, अब्बासपुरा, अशी या वस्त्यांना नावे देण्यात आली.
देवगिरीच्या यादवांचा कालखंड संपल्यानंतर व १३४७ मध्ये बहामनी सत्तेचा उदय होईपर्यंत नरनाळा आणि गाविलगड या किल्ल्यांसह वऱ्हाड प्रांत हा दिल्लीचा बादशहा मोहम्मद तुघलक याच्या अधिपत्याखाली होता. यावेळी बादशहाचा जावई इमाद उल मुलूकहा वऱ्हाड आणि खान्देशचा सुभेदार होता. या परिसराचा कारभार तो एलिचपूरहूनच पाहत असे, असा उल्लेख ‘गुलशने इब्राहमी’ या ग्रंथात सापडतो. त्याकाळी एलिचपूर हे महत्त्वाचे ठिकाण होते, हे लक्षात येते पण, या नगरीचा इतिहास त्यापेक्षाही जुना आहे.
बहामनी सत्ताकाळात १३९९ मध्ये आठवा सुल्तान फिरोजशहा बहामनी याला एका मोहिमेसाठी अचलपूरला यावे लागले होते. खेडल्याचा राजा नरसिंगराय आणि फिरोजशहा यांच्यातील युद्धानंतर नरसिंगराय शरण आला, तेव्हा तो सुल्तानाच्या भेटीसाठी अचलपूरच्या छावणीतच थांबला होता, यावरून त्या काळातील एलिचपूरचे महत्त्व लक्षात येते. १४२५ पर्यंत अचलपूर हे मुस्लिम सत्तेतील महत्त्वाचे ठिकाण होते. त्यानंतर इमादशाहीत म्हणजे १४९० ते १५७४ पर्यंत वऱ्हाडातील स्वतंत्र इमादशाहीचा कारभार हा गाविलगड, नरनाळा या किल्ल्यांमधून सांभाळला गेला. बरीच वर्षे अचलपूरचा ‘वास्तू इतिहास’ कोराच राहिला. तरीही अचलपूरचे महत्त्व कमी झालेले नव्हते. १५७४ ला वऱ्हाड प्रांत हा निजामाकडे आला. निजामशाहीतही हे शहर महत्त्वाच्या घडामोडींचे साक्षीदार ठरले. सुमारे २६ वष्रे निजामशाहीत राहिलेला वऱ्हाड प्रांत १५९८ मध्ये अकबराच्या स्वारीनंतर मोगल साम्राज्यात समाविष्ट झाला. अबूलफजल हा वऱ्हाडचा सुभेदार बनला. मोगलांची सत्ता संपूर्ण शतकभर होती. मोगल दरबाराच्या बातमीपत्रांमध्ये एलिचपूर व संबंधित किल्ल्यांचे उल्लेख सापडतात. २ एप्रिल १६९४ च्या नोंदीनुसार एलिचपूर हे सरकारी खजिना ठेवण्याचे ठिकाण होते. ११ मे १७०३ च्या बातमीपत्रात अजून एका महत्त्वाच्या घटनेचा उल्लेख आहे. त्यात मराठय़ांचे सैन्य वऱ्हाडची राजधानी असलेल्या एलिचपूरवर चाल करून आले व त्यांनी मोगलांचा नायब सरअंदाज खान याच्याकडे चौथाईची मागणी केली. त्यावेळी सुभेदार उमाद तुल्मुक्तखान फिरोजजंग हा होता. मोगल काळातच मराठय़ांनी वऱ्हाड जिंकण्यासाठी अनेक स्वाऱ्या केल्या.
१६९८ मध्ये शिवाजी महाराजांचे वंशज राजाराम यांनी वऱ्हाड प्रांत जिंकला. नंतर शाहू महाराजांनी परसोजी भोसले अमरावतीकर यांना वऱ्हाड प्रांताची जहागिरी दिली. १७४४ ते १७५० पर्यंत हा भाग निजामांच्या ताब्यात गेला पण, नागपूरचे रघुजी राजे भोसले यांनी त्यांचे पुत्र मुधोजी यांना पाठवले होते. काही काळ एलिचपूर हे मुधोजींच्या ताब्यात होते. नंतर १८०३ मध्ये नागपूरकर भोसले आणि इंग्रजांमध्ये युद्ध झाले. या युद्धानंतर वऱ्हाड इंग्रजांच्या ताब्यात गेला, हा इतिहास आहे.
मोहम्मद तुघलकाचा पुतण्या सुल्तान इमाद-उल-मुलूक याने १३४७ मध्ये इदगाह उभारली. या इमारतीच्या पायऱ्यांवरून त्यावेळी गाविलगडचा किल्ला दिसत होता, असा इतिहासात उल्लेख आहे. १०८ खांबांची आणि १५ मीटर उंचीची जुम्मा मशीद ही पारंपरिक पद्धतीने बांधण्यात आली, ही भव्य मशीद उभारण्याचे श्रेय औरंगजेबच्या काळातील नवाब अलीवर्दीखान याच्याकडे जाते.
शहराच्या बाहेरील परकोट हा सुल्तानखानचा मुलगा नवाब इस्माईलखान याने बांधला. नबाबाचा महाल आणि देवडी ही बहिलोलखान व सलाबतखान याने बांधली. बालाजी तसेच, श्रीरामाचे देऊळ, शहा इस्माईलखाँ या फकिराचे थडगे नागपूरचे माधोजी भोसले यांनी बांधले. अचलपूरपासून तीन किलोमीटर अंतरावरील हौज कटोरा ही वैशिष्टय़पूर्ण षट्कोणी इमारत अहमद शहावली बहामनी याने बांधली. सुमारे १०० मीटर व्यासाच्या तलावात ८१ फूट उंचीची तीन मजली इमारत उभारण्यात आली. पूर्वी ही इमारत पाच मजली होती. त्यातील तिसरा आणि चौथा मजला पाडून त्याच्या दगडांपासून नबाबाने त्याचा राजवाडा बांधला, असे सांगितले जाते पण, ही आगळी वेगळी जीर्ण अवस्थेतील वास्तू आडवाटेने येणाऱ्या पर्यटकांचे आजही लक्ष वेधून घेते. गुलाम हुसैन खान याने इमामवाडा बांधला. त्याच्याच काळात बेबहा बाग बांधण्यात आली. या ठिकाणी इस्माईल खान याचे थडगे आहे. या परिसरात अनेक छोटी मोठी थडगी आहेत पण, या वास्तूचे सौंदर्य वेगळेच आहे. जाळीदार खिडक्या, नक्षीकाम केलेले दरवाजे यामुळे ही वास्तू प्रेक्षणीय बनते पण, सध्या ही वास्तू भकास बनली आहे. नावालाच ही बाग उरली आहे. या बागेत केवळ झुडपे, काही इमारतींचे भग्नावशेष आणि आत प्रवेश केल्यानंतर जाणवणारे भकासपण. ही वास्तू खाजगी मालमत्ता असल्याचा एक फलक दरवाजावर लावण्यात आला आहे.
अचलपूर आणि परतवाडा या दोन शहरांना पिण्याचे पाणी पुरवण्यासाठी अजूनही योग्य ते नियोजन झालेले नाही पण, शेकडो वर्षांपूर्वी बहामनी सत्ताकाळात खापरी नळ बांधून शहरभर पाणी पुरवण्याची व्यवस्था करण्यात आली होती. बिच्छन नदीवर त्यासाठी एक धरणही बांधण्यात आले होते, असा उल्लेख ‘गॅझेटियर’मध्ये आहे. आता हे नळ बंद असले तरी त्याचे अवशेष आणि जागोजागी टाक्या अजूनही कायम आहेत. त्याला ‘सातभुळकी’ म्हणतात.